सुंदर, घनदाट, काळेभोर केस असावेत अशी प्रत्येकीची इच्छा असते. केस हा आपल्या सौंदर्याचा अविभाज्य असा भागच आहे, परंतु सध्याच्या बिझी आणि सतत बदलत्या लाईफस्टाईलमध्ये केसांची काळजी घेणं खूपच कठीण होत जात आहे. केसांचे सौंदर्य आणि आरोग्य टिकवून ठेवणे अनेकींना फारच अवघड वाटते, केसांच्या समस्याच इतक्या वाढत आहेत की नेमकी केसांची काळजी कशी घ्यावी हाच प्रश्न पडतो. केसांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी शक्यतो पारंपरिक आणि घरगुती उपायच फायदेशीर ठरतात. अशावेळी आपल्या आजी - पणजींच्या काळातील नैसर्गिक घरगुती उपायच उपयुक्त ठरतात(homemade hair oil for hair growth).
घरच्याघरी नैसर्गिक घटक वापरून तयार केलेले हेअर ऑईल फक्त केसगळती थांबवत नाही, तर केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना नैसर्गिक चकाकी देखील देते. केसगळती, कोंडा आणि अकाली पांढरे होणारे केस यांवर उपाय शोधण्यासाठी आपण अनेकदा पार्लर किंवा महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतो. आपल्या स्वयंपाकघरात आणि बागेत उपलब्ध असलेल कडीपत्ता, कोरफड, आणि मेथी दाण्यांसारख्या पदार्थांमध्ये केसांच्या सर्व समस्यांचे उत्तर दडलेले आहे. या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं घरगुती तेल केसांच्या मुळांशी जाऊन केसांना मजबूत करते आणि कोणताही दुष्परिणाम (natural hair oil for thick and long hair) न होता केसगळतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
साहित्य :-
१. कांदा - ३
२. लसूण - १
३. मोहरीचे तेल - २५० ग्रॅम
४. मेथी दाणे - १ टेबलस्पून
५. कलोंजी - १ टेबलस्पून
६. कडीपत्त्याची पाने - २० ते २५ पाने
७. कोरफडीचे पान - १ ते २ (छोटे तुकडे करून घालावेत)
८. व्हिटॅमिन ई कॅप्सूल - ३ कॅप्सूल
केसांची ग्रोथ वाढवणारे घरगुती हेअर ऑईल कसं तयार करायचं ?
केसांची नैसर्गिक पद्धतीचे वाढ होण्यासाठी घरगुती हेअर ऑईल तयार करण्यासाठी सर्वातआधी एक मोठ्या कढईत सालीसहित ठेचून घेतलेला लसूण आणि कांदे घालावेत. त्यानंतर या मिश्रणात मोहरीचे तेल घालावे. मग या तेलात मेथी दाणे, कलोंजी, कडीपत्त्याची पाने, कोरफडीचे पान असे सगळे घटक घालून तेलात व्यवस्थित मंद आचेवर शिजवून घ्यावे. त्यानंतर हे तेल गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. गाळून घेतलेलं तेल थंड झाल्यावर त्यात व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल फोडून घालावी. तयार तेल व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यावे. एक रात्रभर हे तेल नीट सेट होण्यासाठी तसेच झाकून किंवा एअर टाईट कंटेनरमध्ये भरुन स्टोअर करावे. केसांच्या नैसर्गिक वाढीसाठी खास घरगुती औषधी, पारंपरिक असे' हेअर ग्रोथ ऑईल' वापरण्यासाठी तयार आहे.
केसांसाठी हे घरगुती हेअर ग्रोथ ऑईल वापरण्याचे फायदे...
१. कांदा :- कांद्यामध्ये असलेल्या सल्फरमुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस गळणे कमी होते.
२. लसूण :- लसणामधील औषधी गुणधर्म स्काल्पवरील संसर्ग दूर करून रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात.
३. मोहरीचे तेल :- हे तेल नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते आणि केसांना मुळापासून मजबुती देते.
४. मेथी दाणे :- मेथीमधील प्रथिनांमुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केस चमकदार होतात.
५. कलोंजी :- कलोंजी केसांच्या फोलिकल्सला मजबुती देऊन नवीन केस उगवण्यास मदत करते.
६. कडीपत्त्याची पाने :- कडीपत्त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवतात आणि केस अकाली पांढरे होण्यापासून रोखतात.
७. कोरफड :- कोरफड स्काल्पला थंडावा देते, कोंडा दूर करते आणि केसांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करते.
