महिला-पुरूष, मुलं-मुली सगळेच सध्या केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. प्रदूषणाचे वाढलेले प्रमाण हे एक कारण आहे. (Homemade Hair Oil 3 Types) तसेच रात्रीची जाग्रणं वाढली आहेत. अयोग्य आहार आपण खातो. त्यामुळे केस गळतात. अशी अनेक कारणं आहेत. पण मुख्य कारण म्हणजे आपण हेअरकेअरच्या नावाखाली निव्वळ रसायने केसाला लावतो.(Homemade Hair Oil 3 Types) आपण शॅम्पू विकत घेताना भरपूर विचार करतो. आणि तेल वापरातच नाही. केस चिकट होतात म्हणून तेल लावत नाही. पण केसांना तेल लावणे गरजेचे आहे. विविध कंपन्यांची नवीन तेल बाजारात मिळतात. पण जर घरीच छान तेल तयार करता आले तर, विकत घेण्याची गरजच नाही. ही तीन तेल वापरून बघा.
१. जास्वंद तेल
बाजारात जास्वंद तेल विकत मिळते. तरी घरचे जास्त शुद्ध असते. शिवाय तयार करणे फारच सोपे आहे. खोबरेल तेलात जास्वंदीची पाने , फुले उकळा. फुले पार काळी होईपर्यंत उकळा.(Homemade Hair Oil 3 Types) तेल गार झाले की गाळून घ्या. गाळलेले तेल एका बाटलीत काढून ठेवा आणि वापरा. जास्वंद केसांसाठी फार पोषक असते. जास्वंदीची पाने केसांसाठी चांगली असतात. त्यामुळे नुसती फूलं नाही तर पानेही वापरणे गरजेचे आहे.
२.कांदा-कडीपत्ता तेल
कांद्याचे तेल सध्या ट्रेंडिगमध्ये आहे. कांदा आणि कडीपत्ता केसांसाठी फार चांगला. कांदा चिरून घ्या. ताजा कडीपत्ता घ्या. दोन्ही खोबरेल तेलात उकळवा. कांद्याचा वास फार उग्र वाटत असेल तर, कडीपत्ता जास्त वापरा. कडीपत्ता पूर्ण काळा होईस्तोवर तेल उकळा. गार झाल्यावर गाळून घ्या आणि साठवून ठेवा.
३. मेथीचे तेल
मेथीचे दाणे केसांसाठी फार उपयुक्त असतात. आपण मेथीचे दाणे सहसा खात नाही. कारण ते खुप कडू असतात. त्यामुळे त्याचे तेल तयार करून वापरणे हा मस्त उपाय आहे. मेथीचे दाणे कोबरेल तेलात उकळवा. त्याचा वास जाण्यासाठी जास्वंद घालू शकता. गार झाल्यावर गाळून घ्या आणि वापरा.
तेल झोपताना केसाला लावा. तेलाने केसांच्या मुळांशी छान मालीश करा. केसांची काळजी घेताना तेल लावणे गरजेचे आहे. आठवड्यातून किमान दोनदा तरी तेल लावा.