Join us
Daily Top 2Weekly Top 5

महागडे शाम्पू-तेल नाही! केसांवर स्प्रे करा फक्त 'हेअर ग्रोथ वॉटर' - केस गळणं कमी, वाढ होईल दुप्पट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2026 16:37 IST

homemade hair growth water : natural hair growth water at home : hair growth water for fast hair growth : homemade hair tonic for hair growth : घरगुती औषधी घटकांपासून तयार केलेलं 'हेअर ग्रोथ वॉटर' केसांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतं.

आजकाल केसांच्या अनेक समस्या बऱ्यापैकी सगळ्यांनाच सतावतात. आपले केस लांब, काळेभोर आणि दाट असावेत अशी प्रत्येकीचीच इच्छा असते. आजकाल धावपळीच्या बिझी लाईफस्टाईलमुळे ताणतणाव, बदललेला आहार, प्रदूषण आणि केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सच्या वापरामुळे केसांच्या अनेक समस्या वाढताना दिसतात. केस गळणे, केसांची वाढ खुंटणे, कोरडेपणा, कोंडा किंवा केस पातळ होणे अशा एक ना अनेक समस्या त्रासदायकच ठरतात. केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी अनेक उपाय करण्यापेक्षा सगळ्या समस्यांवर एकच ठोस उपाय करणे गरजेचे असते. केसांच्या समस्यांवर उपाय करण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती उपायच फायदेशीर ठरतात(homemade hair tonic for hair growth).

आपल्या स्वयंपाकघरातील काही औषधी पदार्थांमध्ये केसांच्या सर्व समस्या दूर करण्याची ताकद असते. या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल 'हेअर ग्रोथ वॉटर' हे खास पाणी केसांच्या मुळांना नवजीवन देते, ज्यामुळे केसांची वाढ दुप्पट वेगाने होते. खास घरगुती औषधी घटकांपासून तयार केलेले हे पाणी केसांच्या मुळांना पोषण देऊन त्यांना नैसर्गिक चमक आणि मजबुती देते. घरगुती औषधी घटकांपासून तयार केलेलं 'हेअर ग्रोथ वॉटर' केसांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतं. खास औषधी घटकांपासून तयार केलेलं पाणी नियमित वापरल्यास टाळूला पोषण मिळतं, मुळं मजबूत होतात आणि केसांची वाढ दुप्पट गतीने होण्यास मदत होते. हे औषधी (hair growth water for fast hair growth) पाणी नेमकं कसं तयार करायचं आणि ते केसांच्या (homemade hair growth water) आरोग्यासाठी कसं फायदेशीर ठरतं, ते पाहा... 

केसांच्या चांगल्या वाढीसाठी 'हेअर ग्रोथ वॉटर'... 

स्वयंपाकघरातील औषधी पदार्थांपासून तयार केलेलं पाणी नेमकं केसांसाठी कसे फायदेशीर असते, याबाबतचा व्हिडिओ beautyremedies_drshobna या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. केसांसाठी 'हेअर ग्रोथ वॉटर' तयार करण्यासाठी आपल्याला ग्लासभर पाणी, १ टेबलस्पून चहा पावडर, १ टेबलस्पून मेथी दाणे, १ टेबलस्पून कलोंजी, ८ ते १० लवंग काड्या, कांद्याची सालं मूठभर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

वर्षभरात केस इंचभरही वाढत नाही? 'असा' करा पोटली मसाज - केस वाढतील भरभर, सांभाळण होईल कठीण...

 पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंदी - डाय नकोच! घरबसल्या ५ रुपयांचे ४ उपाय करतील कमाल - पन्नाशीतही केस काळेभोर... 

'हेअर ग्रोथ वॉटर' कसं तयार करायचं ? 

'हेअर ग्रोथ वॉटर' तयार करण्यासाठी सर्वातआधी एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून १ हलकीशी उकळी काढून घ्यावी. त्यानंतर या गरम पाण्यात चहा पावडर, मेथी दाणे, कलोंजी, लवंग काड्या, कांद्याची सालं असे सगळे पदार्थ घालून पाण्याला उकळी येईपर्यंत मंद आचेवर गरम करून घ्यावे. पाणी उकळवून ग्लासभर पाण्याचे अर्धे पाणी होईपर्यंत उकळवून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून हे पाणी थोडे थंड होऊ द्यावे. पाणी थंड झाल्यावर गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरून स्टोअर करून ठेवावे. 

याचा वापर कसा करावा ?

आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा तयार 'हेअर ग्रोथ वॉटर' रात्री झोपण्यापूर्वी स्काल्प आणि केसांची मुळे आणि खालची टोकं यावर स्प्रे करुन हलकेच हाताने मसाज करून घ्यावा. रात्रभर हे केसांवर तसेच राहू द्यावे आणि दुसऱ्या दिवशी केस सौम्य शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत. 

'हेअर ग्रोथ वॉटर' वापरण्याचे फायदे... 

१. चहा पावडर :- चहा पावडरीमध्ये कॅफिन असते, जे केसांच्या मुळांना उत्तेजित करते. यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो आणि केसांना एक सुंदर चमक येते.

२. मेथी दाणे :- मेथीमध्ये निकोटिनिक ॲसिड आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. हे घटक केस गळती रोखण्यास आणि कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत करतात.

३. कलोंजी :- कलोंजीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणांत असतात. हे केसांचे अकाली पांढरे होणे थांबवते आणि नवीन केसांच्या वाढीसाठी मुळांना बळकटी देते

४. लवंग काड्या :- लवंगमध्ये अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात, जे स्काल्पवरील इन्फेक्शन कमी करतात. यामुळे स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारते आणि केस दाट होतात.

५. कांद्याची सालं :- कांद्याच्या सालांमध्ये 'सल्फर' असते, जे केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते. हे केसांना तुटण्यापासून वाचवते आणि पातळ झालेल्या केसांना पुन्हा दाट बनवण्यास मदत करते.

English
हिंदी सारांश
Web Title : Hair Growth Water: Natural spray for double hair growth, less fall.

Web Summary : Struggling with hair problems? This homemade 'Hair Growth Water,' made with ingredients like fenugreek and onion peels, strengthens hair roots, reduces hair fall, and promotes faster, thicker hair growth naturally. Spray before bed for best results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय