Join us
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या एका गोष्टीमुळे गळणारे केस थांबतील! ना केमिकल, ना खर्च तरीही केस वाढतील भराभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2026 15:27 IST

homemade hair growth serum : natural serum for hair growth : homemade herbal hair serum : onion & methi hair serum : hair fall control home remedy : लांबसडक आणि घनदाट केसांसाठी घरच्याघरीच तयार करा आयुर्वेदिक सिरम, केस दिसतील सुंदर...

लांबसडक, दाट आणि काळेभोर केस असणं हे प्रत्येकीचं स्वप्नं असतं. पण आजकालची धावपळीची सतत बदलती लाईफस्टाईल, प्रदूषण, केमिकल शाम्पू - कंडिशनरचा अतिवापर आणि अपुरा आहार यांमुळे केसांची वाढ खुंटणे, केस अकाली पांढरे होणे आणि सर्वात मुख्य म्हणजे 'हेअर फॉल' होणे या समस्या घराघरांत वाढल्या आहेत. बाजारात मिळणारे महागडे हेअर सिरम विकत आणून आणि केमिकल ट्रीटमेंट्स करून आपले पैसे तर खर्च होतातच, पण शेवटी हाती येत ते म्हणजे केसांचं झालेलं नुकसान...(homemade hair growth serum)

केसांच्या अनेक समस्या आपल्यापैकी अनेकींना सतावतात, अशावेळी (onion & methi hair serum) अनेक उपाय करूनही त्यातून अपेक्षित परिणाम मिळतीलच असं नाही. अशावेळी घरातील नैसर्गिक आणि औषधी गुणधर्म असलेल्या पदार्थांपासून तयार केलेलं घरगुती हेअर सिरम केसांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं. स्वयंपाकघरात असलेले काही खास अस्सल घरगुती औषधी पदार्थ वापरून तयार केलेलं मॅजिकल हेअर सिरम' (Homemade Herbal Hair Growth Serum) केसांसाठी वरदान ठरु शकते. कोणतंही केमिकल नाही, एक रुपयाचाही खर्च नाही आणि याचे परिणाम पाहिले तर बाजारातील महागडे सिरम आणणे कायमचे विसरून जाल! हे सिरम घरच्याघरी (homemade herbal hair serum) अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे, ते केसांना कसे लावायचे ते पाहूयात. 

घरगुती हेअर सिरम कसे तयार करायचे? 

केसांच्या वाढीसाठी घरगुती हेअर सिरम तयार करण्यासाठी आपल्याला १ मध्यम आकाराचा कांदा, १ टेबलस्पून मेथी दाणे आणि १ कप खोबरेल तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

नेमकं करायचं काय ? 

सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घाला. मग त्याच कांद्याच्या साली देखील घाला. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात मेथी दाणे आणि खोबरेल तेल घालावं सगळे मिश्रण एकत्रित मिक्सरच्या भांड्यात फिरवून वाटून घ्यावे. त्यानंतर एक स्वच्छ सुती कापड घेऊन त्यात हे मिक्सरमधील वाटून घेतलेले मिश्रण ओतून गाळून घ्यावे. केसांच्या वाढीसाठी खास घरगुती हेअर ग्रोथ सिरम वापरण्यासाठी तयार आहे. 

जाडजूड मांड्या आणि हिप्सवरील चरबी होईल कमी! आहारात हवेच ८ पदार्थ - सुपरफूड देतील स्लिम - फिट लूक...

साधेपणातही रॉयल रुबाब, पाहा १० कॉटन खण साड्या! परफेक्ट मॅच ब्लाऊजपिसही-लूक कमाल सुंदर...

केसांसाठी याचा वापर कसा करावा ? 

केसांसाठी कायमच फ्रेश आणि ताज हेअर सिरम तयार करून घ्यावं. तयार हेअर सिरम  ब्रश किंवा बोटांच्या मदतीने केसांच्या मुळांवर व्यवस्थित लावून मसाज करुन घ्यावा. त्यानंतर किमान २ तास हे सिरम केसांवर तसेच लावून ठेवावे. मग कोणत्याही सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवून घ्यावेत. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा हा उपाय नक्की करावा यामुळे केसांच्या वाढीस चालना मिसळू केस भराभर वाढतात आणि लांबसडक व काळेभोर, दाट होतात. 

फक्त शाम्पू करण्यापूर्वी केसांना लावा 'हे' हर्बल पाणी! उन्हाळ्यात केस कोरडे - रुक्ष होण्याच्या प्रश्नच सुटेल कायमचा... 

हा उपाय केसांच्या वाढीस कसा आहे फायदेशीर... 

१. कांदा :- कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण भरपूर असते. सल्फर केसांच्या मुळांना पोषण देऊन रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. त्यामुळे केस गळणे कमी होऊन नवीन केस उगवण्यास चालना मिळते. कांद्याचा रस केसांच्या मुळांना मजबूत करून केस अधिक दाट आणि चमकदार बनवण्यास मदत करतो.

२. खोबरेल तेल :- खोबरेल तेल हे केसांसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर मानले जाते. यामध्ये असलेले पोषक घटक केसांना आतून पोषण देऊन कोरडेपणा कमी करतात. तसेच केस तुटणे, दुभंगणे आणि रफ होणे कमी करण्यास मदत होते. नियमित वापरामुळे केस मऊ, चमकदार आणि मजबूत होतात.

३. मेथी दाणे :- मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन, आयर्न आणि निकोटिनिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असते, जे केसांच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. मेथीमुळे केसांच्या मुळांना बळकटी मिळते आणि डॅन्ड्रफची समस्या कमी होण्यास मदत होते. तसेच केसांची वाढ जलद होऊन केस अधिक घनदाट दिसू लागतात.

४. कांद्याच्या साली :- अनेकजण कांद्याच्या साली टाकून देतात, पण त्यामध्येही अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक असतात. कांद्याच्या साली केसांच्या मुळांना नैसर्गिक पोषण देऊन केस काळेभोर आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. तसेच अकाली केस पांढरे होण्याची समस्या कमी करण्यासाठीही या साली उपयुक्त ठरू शकतात.


English
हिंदी सारांश
Web Title : Stop hair fall with a thrown-away item: a homemade serum!

Web Summary : A homemade hair serum using onion, fenugreek seeds, and coconut oil can combat hair fall and promote growth. This natural remedy strengthens hair roots, reduces dandruff, and improves hair texture, offering a cost-effective alternative to chemical treatments.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय