Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > आप्पेपात्रात घाला चमचाभर हळद आणि चहा पावडर, ‘असा’ हेअर डाय करतो ५ मिनिटांत केस काळेभोर...

आप्पेपात्रात घाला चमचाभर हळद आणि चहा पावडर, ‘असा’ हेअर डाय करतो ५ मिनिटांत केस काळेभोर...

homemade hair dye : natural hair dye for grey hair using turmeric and tea : पांढऱ्या केसांना नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी घरगुती हेअर डाय करण्याची सोपी पद्धत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2026 15:31 IST2026-04-09T15:25:53+5:302026-04-09T15:31:24+5:30

homemade hair dye : natural hair dye for grey hair using turmeric and tea : पांढऱ्या केसांना नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी घरगुती हेअर डाय करण्याची सोपी पद्धत...

homemade hair dye natural hair dye for grey hair using turmeric and tea home remedies for grey hair | आप्पेपात्रात घाला चमचाभर हळद आणि चहा पावडर, ‘असा’ हेअर डाय करतो ५ मिनिटांत केस काळेभोर...

आप्पेपात्रात घाला चमचाभर हळद आणि चहा पावडर, ‘असा’ हेअर डाय करतो ५ मिनिटांत केस काळेभोर...

आजकाल फार लहान वयातच केस पांढरे होण्याची समस्या आपल्यापैकी बऱ्याचजणांना सतावते. बदलती लाईफस्टाईल, ताणतणाव, अपुरी झोप आणि चुकीचा आहार यामुळे केसांची नैसर्गिक रंगत कमी होत जाते. फार कमी वयातच डोक्यावर पांढरे केस दिसू लागले की, आपल्याला नकोसे वाटते. डोक्यावरील पांढरे केस लपवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. कुणी केसांना वेगवेगळ्या प्रकारचे हेअर कलारं लावतात तर कुणी मेहेंदी तर कुणी हेअर डाय... परंतु हे सगळे उपाय तात्पुरतेच असतात. केसांवरचा रंग अवघ्या काही महिन्यांतच उडून जातो आणि पुन्हा पांढरे केस वर दिसू लागतात(natural hair dye for grey hair using turmeric and tea).

पांढरे केस न लपवता त्यांना नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी घरगुती उपाय अतिशय फायदेशीर ठरतात. आपल्या किचनमध्ये असे काही नैसर्गिक पदार्थ असतात, ज्यांच्या मदतीने आपण कोणत्याही साइड इफेक्टशिवाय केसांना पुन्हा नैसर्गिक पद्धतीने काळे आणि चमकदार करु शकतो. अगदी सोप्या आणि स्वस्त (home remedies for grey hair) पद्धतीने घरच्या घरी हेअर डाय तयार करून आपण पांढऱ्या केसांची समस्या कमी करू शकता. घरगुती पद्धतीने हेअर डाय कसा तयार करायचा, कोणते पदार्थ वापरायचे आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा - ज्यामुळे केस दिसतील नैसर्गिकरित्या काळे, घनदाट आणि निरोगी....घरच्याघरीच नैसर्गिक पद्धतीने पांढऱ्या (best homemade hair dye for grey hair coverage) केसांसाठी हेअर डाय करण्याची सोपी पद्धत... 

पांढऱ्या केसांसाठी नॅचरल हेअर डाय कसा करावा ? 

घरच्याघरीच नैसर्गिक पद्धतीने पांढऱ्या केसांसाठी नॅचरल हेअर डाय तयार करण्यासाठी आपल्याला प्रत्येकी २ ते ३ टेबलस्पून हळद, चहा पावडर, एलोवेरा जेल, १/२ कप मोहरीचे तेल इतक्या साहित्याची गरज लागणार आहे. 

रोज खाते वरणभात तरी तमन्ना भाटियाची फिगर कमाल, पाहा वरणभात खाण्याची तिची पद्धत आणि प्रमाण...

पांढऱ्या केसांसाठी घरगुती हेअर डाय तयार करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एक तवा किंवा आप्पे पात्र घेऊन ते मंद आचेवर ठेवून व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. या गरम आप्पे पात्रात किंवा तव्यात हळद घालून ती चांगली भाजून घ्यावी मग यात चहा पावडर घालावी. चहा पावडर आणि हळदीचा रंग भाजून पूर्णपणे काळा होत नाही तो पर्यंत मंद आचेवर भाजून घ्यावं. मग व्यवस्थित भाजल्यानंतर चहा गळायच्या गाळणीच्या मदतीने हे मिश्रण गाळून घ्यावं. जी बारीक पूड तयार होईल त्यात एलोवेरा जेल घालून मिश्रण व्यवस्थित कालवून घ्यावे. सगळ्यांत शेवटी यात मोहरीचे तेल घालावे आणि चमच्याच्या मदतीने सगळे मिश्रण कालवून घ्यावे. पांढऱ्या केसांना नैसर्गिक पद्धतीने काळे करण्यासाठी घरगुती हेअर डाय वापरण्यासाठी तयार आहे. 

हेअर डाय वापरण्याची योग्य पद्धत... 

हा तयार घरगुती हेअर डाय केसांसाठी वापरण्यासाठी सर्वात आधी ब्रशच्या मदतीने हेअर डाय केसांवर पूर्णपणे लावून घ्यावा. केसांच्या मुळांपासून ते खालच्या टोकांपर्यंत हेअर डाय केसांवर लावून घ्यावा. तासभर केसांवर तो हेअर डाय तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर केस सौम्य शाम्पूने स्वच्छ धुवून घ्यावेत. हा उपाय महिन्यांतून किमान २ वेळा केल्यास चांगला फरक दिसेल. 

कायम खुश राहणाऱ्या लोकांच्या ७ सवयी! नेहमी आनंदी राहण्यासाठी असं वेगळं काय करतात - पाहा सोपं गणित... 

हा नॅचरल हेअर डाय वापरण्याचे फायदे... 

१. हळद :- हळदीमध्ये अँटी - बॅक्टेरियल आणि अँटी - ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जेव्हा आपण हळद भाजतो, तेव्हा ती गडद काळा रंग देते. हळदीमुळे स्काल्पवरील इन्फेक्शन कमी होते, कोंडा दूर होतो आणि केसांच्या मुळांना मजबूती मिळते.

२. चहा पावडर :-  चहा पावडर हा नैसर्गिक रंगाचा एक उत्तम स्रोत आहे. यात असलेल्या टॅनिनमुळे पांढऱ्या केसांना गडद रंग मिळतो. तसेच, चहा पावडर केसांना एक नैसर्गिक चमक देते आणि केस मऊ करण्यास मदत करते.

३. एलोवेरा जेल :- एलोवेरा जेल हे नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते. हेअर डाय लावल्यामुळे केस कोरडे पडू नयेत यासाठी एलोवेरा जेल ओलावा टिकवून ठेवते. हे केसांच्या पीएच (pH) पातळीचे संतुलन राखते आणि केस गळणे कमी करून वाढीस मदत करते.

४. मोहरीचे तेल :- मोहरीच्या तेलात ओमेगा - ३ फॅटी ॲसिड्स आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हे तेल नैसर्गिकरित्या उष्ण असल्याने स्काल्पचे रक्ताभिसरण सुधारते. मोहरीचे तेल केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकवून ठेवण्यास आणि पांढरे होणारे केस रोखण्यास अत्यंत फायदेशीर ठरते.


Web Title : प्राकृतिक हेयर डाई: हल्दी और चाय पाउडर से पाएं काले बाल

Web Summary : हल्दी, चाय पाउडर, एलोवेरा और सरसों के तेल से घर पर डाई बनाकर सफेद बालों से छुटकारा पाएं। एक घंटे लगाएं, फिर धो लें। बेहतर परिणाम के लिए महीने में दो बार दोहराएं।

Web Title : Natural Hair Dye: Turmeric and Tea Powder for Black Hair

Web Summary : Combat gray hair naturally with a homemade dye using turmeric, tea powder, aloe vera, and mustard oil. Apply for an hour, then wash. Repeat bi-monthly for best results.