Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > घरचे तूप म्हणजे त्वचेसाठी वरदान !!तूप लावताना मात्र या चुका टाळणे जास्त गरजेचे....

घरचे तूप म्हणजे त्वचेसाठी वरदान !!तूप लावताना मात्र या चुका टाळणे जास्त गरजेचे....

Homemade ghee is a boon for the skin!! However, it is more important to avoid these mistakes while applying ghee : त्वचेसाठी तूप ठरते फायद्याचे. पाहा कसे वापरावे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2026 16:26 IST2026-02-13T16:23:15+5:302026-02-13T16:26:26+5:30

Homemade ghee is a boon for the skin!! However, it is more important to avoid these mistakes while applying ghee : त्वचेसाठी तूप ठरते फायद्याचे. पाहा कसे वापरावे.

Homemade ghee is a boon for the skin!! However, it is more important to avoid these mistakes while applying ghee.... | घरचे तूप म्हणजे त्वचेसाठी वरदान !!तूप लावताना मात्र या चुका टाळणे जास्त गरजेचे....

घरचे तूप म्हणजे त्वचेसाठी वरदान !!तूप लावताना मात्र या चुका टाळणे जास्त गरजेचे....

तूप म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील पारंपरिक खजिना. आहारात वापरल्या जाणाऱ्या तुपाचे त्वचेसाठीही अनेक फायदे आहेत. नैसर्गिक फॅट्स, अँटी ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्वे यामुळे तूप त्वचेला पोषण देण्याचे काम करते. योग्य पद्धतीने वापरल्यास त्वचा मऊ, चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्वचेला खोलवर मॉइश्चर मिळणे. कोरडी आणि तेलकट दोन्ही प्रकारची त्वचा असल्यास थोडेसे शुद्ध तूप हलक्या हाताने त्वचेवर लावायचे. मसाज करायचा. (Homemade ghee is a boon for the skin!! However, it is more important to avoid these mistakes while applying ghee....)त्वचा मस्त मऊ होते. विशेषतः हिवाळ्यात ओठ, टाच आणि कोपर यांसारख्या कोरड्या भागांसाठी तूप उपयुक्त ठरते. ओठांवर रात्री झोपण्यापूर्वी तूप लावल्यास फुटलेले ओठ लवकर बरे होतात.

तुपामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स त्वचेची नैसर्गिक चमक टिकवण्यास मदत करतात. हलक्या मसाजमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला तजेला मिळतो. काही जण डोळ्यांखालील कोरडेपणा कमी करण्यासाठी किंवा चेहर्‍यावरील कोरडा झालेला भाग मऊ करण्यासाठी तुपाचा वापर करतात. तूप कसे वापरावे? तर अगदी सोपे आहे. चेहर्‍यासाठी वापरताना अतिशय कमी प्रमाणात तूप घ्यावे आणि स्वच्छ चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावा. आधी चेहरा अगदी छान धुणे फार गरजेचे आहे. रात्री लावून सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवावा. कोरड्या त्वचेसाठी आठवड्यातून दोन-तीन वेळा वापर पुरेसा असतो. ओठ, टाचा किंवा हातांसाठी मात्र रोजही वापरता येते.

तुपाचा वापर करताना मात्र काही गोष्टी टाळणे गरजेचे आहे. ज्यांची त्वचा खूप तेलकट किंवा मुरुमांची चांगलीच समस्या असेल तर त्यांनी चेहऱ्यावर जास्त तूप लावणे टाळावे, कारण त्यामुळे छिद्रे बंद होऊ शकतात. नेहमी शुद्ध आणि ताजे तूपच वापरावे. जास्त प्रमाणात लावल्यास त्वचा चिकट वाटू शकते आणि धूळ चिकटण्याची शक्यता वाढते. तूप फक्त रात्रीच्या वेळेतच लावावे. आणि धुताना बेसन किंवा त्रिफळा चूर्ण वापरावे. कोमट पाणी वापरावे. म्हणजे तूप निघते. एकूणच, तूप हे नैसर्गिक आणि सहज उपलब्ध असलेले त्वचेला पोषण देणारे घटक आहे. मात्र ते प्रमाणात आणि आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार वापरणे महत्त्वाचे आहे. योग्य वापर केल्यास तूप त्वचेला मृदू स्पर्श आणि नैसर्गिक चमक देऊ शकते. 

Web Title : घी: त्वचा के लिए वरदान, लगाते समय इन गलतियों से बचें!

Web Summary : घी वसा, एंटीऑक्सिडेंट और विटामिन से त्वचा को पोषण देता है। नरम, चमकदार त्वचा के लिए कम मात्रा में उपयोग करें। यह रूखी त्वचा, होंठों, एड़ी के लिए सबसे अच्छा है। तैलीय त्वचा पर अधिक उपयोग से बचें। रात में शुद्ध घी लगाएं और गुनगुने पानी से धो लें।

Web Title : Ghee: A skin boon, avoid these mistakes when applying!

Web Summary : Ghee nourishes skin with fats, antioxidants, and vitamins. Use sparingly for soft, glowing skin. Best for dry skin, lips, heels. Avoid excess use on oily skin to prevent clogged pores. Use pure ghee at night and wash with lukewarm water.