त्वचेच्या स्वच्छतेसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे साबण, फेसवॉश वापरतो. परंतु बाजारांत विकत मिळणाऱ्या साबणांमध्ये हानिकारक केमिकल्स असतात. त्वचेसाठी वारंवार अशा साबणांचा वापर केल्यास त्वचेला फायदे होण्याऐवजी नुकसानच होते.त्वचेची नैसर्गिक चमक आणि मऊमुलायमपणा टिकवण्यासाठी बाजारातील रासायनिक (Homemade Flaxseed Gel Soap) साबणांपेक्षा घरगुती नैसर्गिक साबण अधिक सुरक्षित आणि परिणामकारक (Flaxseed Gel Soap) ठरतो. अळशीच्या बियांपासून तयार होणाऱ्या जेल पासून बनवलेला साबण हा असाच एक त्वचेसाठी उत्तम पर्याय आहे(How To Make Flaxseed Gel Soap At Home).
अळशीमध्ये त्वचेसाठी आवश्यक असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन 'ई' भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेला पोषण देतात, कोरडेपणा कमी करतात आणि नैसर्गिक मऊपणा देतात. विशेष म्हणजे हा साबण घरी अगदी सहजरित्या तयार करता येतो आणि कोणत्याही त्वचा प्रकारासाठी वापरणे फायदेशीर ठरतो. यासाठीच घरच्याघरीच, अळशीच्या बियांच्या जेलपासून साबण कसा तयार करायचा याची सोपी कृती पाहूयात.
साहित्य :-
१. अळशीच्या बिया - २ टेबलस्पून
२. पाणी - २५० मि.ली
३. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
४. मध - १ टेबलस्पून
५. ट्रान्सपरंट सोप बेस - ४० ते ५० ग्रॅम
स्वयंपाकघरातच आहेत पिगमेंटेशन कमी करणारे ३ पदार्थ, त्वचा होते उजळ-स्पॉटलेस- वाचा एक्सपर्ट सल्ला...
अळशीच्या बियांचा साबण कसा तयार करायचा ?
सगळ्यातआधी एका मोठ्या भांड्यात २५० मि.ली पाणी घेऊन त्यात २ टेबलस्पून अळशीच्या बिया घालाव्यात. आता हे मिश्रण गॅसच्या मंद आचेवर ठेवून हलकेच उकळवून घ्यावे. मिश्रण १० ते १५ मिनिटे उकळवून झाल्यानंतर हे पाणी गाळणीच्या मदतीने गाळून घ्यावे. गाळून घेतल्यानंतर हे पाणी थंड होण्यासाठी तसेच ठेवून द्यावे. पाणी जसजसे गार होत जाते तसे त्याचे जेलमध्ये रूपांतर होऊन ते अधिक घट्ट होऊ लागते. आता हे घट्ट झालेले जेलच्या स्वरूपातील पाणी एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून लिंबाचा रस व मध घालावे. त्यानंतर यात ट्रान्सपरंट सोप बेस घालून पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मंद आचेवर गरम करून घ्यावे. चमच्याने हलवत राहून हे सगळे मिश्रण एकजीव करून वितळवून घ्यावे. त्यानंतर हे तयार मिश्रण एका ट्रे मध्ये भरून थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. ३ ते ४ तासानंतर आपण बघू शकता की आपला नैसर्गिक आळशीचा साबण वापरण्यासाठी तयार असेल.
त्वचा ते केस, त्रास काहीही असो तूप ठरते वरदान! चमचाभर तुपाची जादू करा-दिसाल सुंदर कायम...
हा साबण वापरण्याचे फायदे....
१. त्वचेला मॉईश्चराईज करतो :- अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात, जे त्वचेला नैसर्गिकरीत्या हायड्रेट करतात व कोरडेपणा दूर करतात.
२. अँटी-एजिंग गुणधर्म :- अळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे सुरकुत्या, डाग व एजिंगच्या खुणा कमी करण्यात मदत करतात.
३. मुरूम व डाग कमी करण्यासाठी :- अळशीमध्ये असलेले अँटी-इन्फ्लेमेटरी घटक त्वचेवरील मुरूम आणि डाग कमी करण्यात मदत करतात.
४. त्वचेला पोषण मिळते :- अळशीच्या बियांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे (Vitamin E), आणि खनिजे असतात, ज्यामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळते.
५. त्वचेला मऊमुलायम करण्यासाठी :- अळशीच्या बियांच्या सूक्ष्म कणांमुळे त्वचेचे सौम्य स्क्रबिंग होते, त्यामुळे डेड स्किन सहज निघते व त्वचा उजळते आणि मऊमुलायम होते.