बऱ्याचदा असं होतं की आपल्याला पार्लरमध्ये जायला वेळच मिळत नाही. कधी कधी वेळ असला तरी पार्लरमध्ये जाऊन महागड्या फेशियलसाठी खूप जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसते. पण नेमकं एखाद्या समारंभाला जायचं असतं किंवा घरातच काहीतरी कार्यक्रम असतो. हल्ली तर लग्नसराईचे दिवस आहेतच. त्यामुळे प्रत्येकाच्या मागे काही ना काही कार्यक्रम आहेच.. अशावेळी जर काही कारणाने तुमचं फेशियल करणं राहून गेलं असेल तर हा एक झटपट उपाय करा (how to get naturally glowing skin in just 10 minutes?). चेहऱ्यावर गोल्डन फेशियल केल्याप्रमाणे छान सोनेरी ग्लो येईल.(Homemade Face Pack For Instant Golden Glow On Skin)
चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो आणण्यासाठी घरगुती मास्क
चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती सौंदर्यतज्ज्ञांनी mirror_salon_academy_nashik या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
पाऊस पडताच घरभर माशा आणि चिलटं? ५ साेपे उपाय- माशा, चिलटं घरातून पळून जातील
यामध्ये त्यांनी नियासिनामाईड Niacinamide या एका घटकाविषयी माहिती दिली आहे. या घटकामुळे त्वचेवर छान चमक येते. त्वचेवरचं टॅनिंग, पिगमेंटेशन, वांगाचे डाग कमी होऊन चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळे अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये ते आवर्जून वापरलं जातं. हा घटक आपल्याला एका घरगुती पदार्थामधूनही मिळतो आणि तो पदार्थ म्हणजे ओट्स.
ओट्स बऱ्याचदा आपल्या घरात असतातच. दोन ते तीन चमचे ओट्स घ्या आणि ते मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या.
ओट्स पावडर एका वाटीमध्ये घ्या आणि त्यात १ टीस्पून हळद आणि २ चमचे दही किंवा कच्चं दूध घाला.
जास्वंदाचं रोप नुसतंच वाढलं- फुलांचा पत्ताच नाही? किचनमधला 'हा' पदार्थ घाला- फुलंच फुलं येतील
आता सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करा आणि हा लेप तुमच्या चेहऱ्याला लावा. १० मिनिटांसाठी लेप चेहऱ्याला असू द्या. त्यानंतर तो अर्धवट सुकत आला की हलक्या हाताने चोळून काढून टाका.
यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. चेहऱ्यावरचं टॅनिंग, डेडस्किन कमी होऊन चेहऱ्यावर खूप छान ग्लो आलेला दिसेल. चेहरा नेहमीच चमकदार ठेवण्यासाठी आठवड्यातून एकदा हा उपाय नक्की करा.