Join us
Daily Top 2Weekly Top 5

बर्फ-दूध-मधाचा फेस मास्क, रशियन मुलींसारखा ग्लो येईल चेहऱ्यावर! ओपन पोअर्स- पिंपल्स होतील कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2026 15:06 IST

homemade face mask for glowing skin: natural face mask for open pores: face mask for pimples: महागड्या क्रीम्सपेक्षा आपण स्वयंपाकघरातील काही पदार्थ त्वचेवर लावल्यास फायदा होईल.

आपली त्वचा सुंदर, नितळ आणि आरशासारखी चमकणारी हवी असं प्रत्येकाला वाटत असते. पण धावपळीच्या जीवनशैलीत प्रदूषण, ताणतणाव, चुकीचा आहार आणि केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांचा अतिरेक यामुळे त्वचेवर पिंपल्स, ओपन पोअर्स, डलनेस आणि डाग दिसू लागतात.(homemade face mask for glowing skin) अशावेळी आपण अनेकजण महागड्या क्रीम्स, फेशियल्स आणि ट्रीटमेंट्सवर हजारो रुपये खर्च करतो. पण हवा तसा नैसर्गिक ग्लो मिळेलच याची खात्री नसते.(natural face mask for open pores) पण रशियन मुलींकडे पाहिलं की त्यांची त्वचा इतकी चमकदार कशी हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. (face mask for pimples)रशियन महिलांची त्वचा नेहमीच तिच्या नैसर्गिक चमक, गुळगुळीत पोत आणि काचेसारख्या फिनिशसाठी ओळखली जाते. त्यांचे सौंदर्य केवळ मेकअप नाही तर काही घरगुती उपाय देखील आहे. महागड्या क्रीम्सपेक्षा आपण स्वयंपाकघरातील काही पदार्थ त्वचेवर लावल्यास फायदा होईल. 

हा खरा पागल 'लव्हर बॉय'! गर्लफ्रेंडचा वाढदिवस म्हणून त्याने पाहा काय विचित्र पराक्रम केला, व्हिडीओ व्हायरल..

रशियन महिला दररोज सकाळी बर्फाने चेहऱ्याची मालिश करतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, छिद्रे घट्ट होतात आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते. यामुळे चेहरा फ्रेश होतो. रोज सकाळी बर्फ चेहऱ्यावर चोळल्याने त्वचेवरील सूज कमी होते. 

दूध आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेला पोषण देते म्हणून ते आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. मध एक नैसर्गिक मॉइश्यरायझर म्हणून काम करते. हे दोन्ही मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मऊ, हायड्रेटेड आणि चमकदार होते. आठवड्यातून दोनदा हा मास्क लावल्याने काचेसारखे दिसू शकते. 

त्वचेवर टोनर लावणं हे त्वचेच्या काळजीचा आवश्यक भाग आहे. यासाठी फक्त महागड्या ब्रँडचे टोनर वापरणं आवश्यक नाही. टोनर म्हणून आपण काकडीचा रस वापरु शकतो. काकडी त्वचेला फ्रेश ठेवण्यासाठी मदत करते. तसेच रंगद्रव्य कमी करण्यास मदत करते. काकडीचा रस टोनर म्हणून आपण वापरु शकतो. ज्यामुळे त्वचा ताजी आणि स्वच्छ राहते. 

चेहऱ्यावरील घाण आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी केमिकल स्क्रबऐवजी ओटमील वापरु शकता.चेहऱ्यावर स्क्रब करण्यासाठी ओटमील वापरु शकतो. जे आपल्या त्वचेला आतून स्वच्छ करण्याचे काम करते. ओटमीलमुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकता येतात. ज्यामुळे नैसर्गिकरित्या त्वचा स्वच्छ आणि चमकदार राहते. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते. 

डिहायड्रेशनचा आपल्या त्वचेवर थेट परिणाम होतो. त्यासाठी नेहमीच भरपूर पाणी प्या. शरीर हायड्रेट झाल्यावर नैसर्गिकरित्या चमकते. सुंदर त्वचेचे रहस्य केवळ बाह्य काळजीमध्ये नाही तर निरोगी राहण्यात देखील आहे. भरपूर पाणी आणि ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Russian-inspired ice, milk, honey mask: Get glowing skin naturally.

Web Summary : Achieve radiant skin like Russian women with a simple homemade mask. Combine ice massage, milk, and honey for hydration and glow. Use cucumber juice as toner and oatmeal to exfoliate. Hydrate with water and green tea for overall skin health.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी