Join us  

लग्नाच्या २० दिवस आधी 'हा' घरगुती उपाय करा; चेहऱ्यावर तेज येईल-सुंदर आकर्षक दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 3:46 PM

Homemade Face Mask For Glowing Skin : चेहऱ्यावर  तात्पुरता परिणाम दिसतो पण पुन्हा चेहरा काळा पडू लागतो. चेहऱ्याचा काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय देखिल करू शकता.

आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते (Glowing Skin Tips)  पण चेहऱ्यावर मनासारखा ग्लो (Glowing Skin Tips) येण्यासाठी नेहमी  पार्लरला जायला हवं असं काही नाही. घरच्याघरी काही वस्तूंचा वापर करून तुम्ही पार्लरसारखा ग्लो मिळवू शकता. अनेकदा बाहेरच्या क्रिम्समध्ये केमिकल्सयुक्त घटकांचा वापर केला जातो. (How To Get Glowing Skin At Home)

ज्याचा चेहऱ्यावर  तात्पुरता परिणाम दिसतो पण पुन्हा चेहरा काळा पडू लागतो. चेहऱ्याचा काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय देखिल करू शकता. (Homemade Face Mask For Glowing Skin) जसं की त्वचेचं टॅनिंग घालवणारे घटक बेसन हे आपल्या सर्वांच्याच घरी उपलब्ध असते. याचा वापर त्वचेवर करून त्वचेचा ग्लो वाढवता येईल. (How To Use Turmeric For Face)

बेसनाचा होममेड फेसपॅक कसा तयार करावा? (Homemade Face Pack For Skin)

जर तुमचं लग्न असेल किंवा घरात कोणाचंही लग्न असेल तर त्वचेचा पोत सुधारण्यासाठी चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी १० ते २० दिवस आधी तुम्ही हा होममेड फेस मास्क लावू शकता. चेहऱ्यावरचे काळे डाग, पिग्मेंटेशन निघून जाण्यासाठी हा मास्क प्रभावी ठरतो. त्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात बेसन घ्या. बेसनात २ ते ३ चिमूट हळद घाला, त्यात कॉफी पावडर आणि लिंबू, दही घाला. हे मिश्रण एकजीव करून चेहऱ्याला लावा यामुळे  चेहऱ्यावर ग्लो येईल आणि सुंदर दिसाल. 

एक्सपर्ट्सच्यामते बेसनापासून तयार झालेला होम मेड फेस मास्क  त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. ज्यामुळे त्वचा चमकदार राहते आणि त्वचेचा ग्लो वाढतो. याशिवाय पिंपल्सही कमी होतात. बेसनाचा फेस फॅक रोज लावू नका. ज्या लोकांची नॉर्मल ड्राय  स्किन असते त्यांनी हा  फेसपॅक रोज लावू नये कारण यामुळे त्वचा अजून ड्राय होऊ शकता.

घरी लावलेले दही खूपच आंबट झाले? पाणी न घालता करा १ युक्ती, दही होईल मस्त चविष्ट-घट्ट

तेलकट त्वचा असलेल्यांसाठी हा उत्तम उपाय आहे. आठवड्यातून ३ ते ४ वेळा तुम्ही हा उपाय करू शकता नॉर्मल स्किन टोन असल्यास आठवड्यातून एकदा हा उपाय करा.  कोरडी त्वचा असलेल्यांनी १० दिवसातून एकदा हा उपाय करावा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी