बरेचदा स्त्रियांच्या चेहऱ्यावर, विशेषतः हनुवटीवर पुरुषांच्या दाढीप्रमाणेच जाड, राठ केस उगवू लागतात. हनुवटीवरील असे केस केवळ सौंदर्यातच बाधा आणत नाहीत, तर अनेकींचा आत्मविश्वासही कमी करतात. इतकंच नाही तर या अनावश्यक केसांमुळे आपल्या चेहऱ्याचा संपूर्ण लूक देखील खराब दिसतो. हे केस काढण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा प्लकिंग असे वेगवेगळे असंख्य उपाय करतो. परंतु वारंवार वॅक्सिंग, थ्रेडिंग किंवा प्लकिंग करूनही हे केस काही काळासाठी कमी होतात, पण पुन्हा तितकेच लवकर आणि वेगाने वाढतात देखील... अशाप्रकारे वारंवार हनुवटीवर केस पुन्हा डोकावू लागले की प्रत्येकवेळी पार्लरला जाणे म्हणजे डोकेदुखीच वाटते...(reduce chin hair naturally at home).
हनुवटीवर वारंवार केस येण्याच्या समस्येमागे हार्मोनल बदल, ताणतणाव आणि चुकीची व सतत बदलणारी लाईफस्टाईलही कारणीभूत असू शकते. अशावेळी केवळ बाह्य उपाय न करता शरीराच्या आतूनही काळजी घेणं गरजेचं ठरतं. काही नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेलं खास घरगुती ड्रिंक हार्मोनल बॅलन्स राखण्यास मदत करून हनुवटीवरील अनावश्यक केसांची वाढ (natural remedies for chin hair in women) कमी करण्यास उपयोगी ठरू शकते. हनुवटीवरील वारंवार येणाऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी घरगुती औषधी ड्रिंक नेमकं कसं तयार करायचं ते पाहूयात.
हनुवटीवरील केसांची समस्या दूर करण्यासाठी घरगुती औषधी ड्रिंक...
हनुवटीवरील वारंवार येणाऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी घरगुती औषधी ड्रिंक तयार करण्याची सोपी पद्धत डाएटिशियन नंदिनी हिने तिच्या इंस्टग्राम पेजवरुन एक व्हिडिओ शेअर करत सांगितली आहे. डाएटिशियन नंदिनी सांगते की, हे खास औषधी हेल्दी ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला ग्लासभर पाणी, दालचिनीचा १ छोटा तुकडा, १ टेबलस्पून बडीशेप, प्रत्येकी २ ते ३ पुदिना आणि तुळशीची पाने, १/२ टेबलस्पून अळशीची पावडर इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
चमचाभर बडीशेप करेल केस काळेभोर! स्वस्तात मस्त 'केमिकल-फ्री' हेअरडाय - कमी खर्चात पार्लरसारखा लूक...
औषधी घरगुती ड्रिंक नेमकं कसं तयार करायचं ?
हनुवटीवरील वारंवार येणाऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी घरगुती औषधी ड्रिंक तयार करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावं. त्यानंतर या गरम पाण्याला एक हलकी उकळी आल्यावर त्यात छोटा दालचिनीचा तुकडा, बडीशेप घालावी. मग गॅस बंद करून झाकून ठेवून द्यावं. सगळ्यात शेवटी यात तुळशीची, पुदिन्याची पाने आणि अळशीची पावडर घालावी. मग हे पाणी गाळणीच्या मदतीने गाळून ते पाणी प्यावं. हे आयुर्वेदिक घरगुती औषधी ड्रिंक किमान २ महिने नियमितपणे प्यावं.
तूप फक्त चवीसाठी नाही, तर स्त्रियांच्या 'या' ६ समस्यांवर गुणकारी! चमचाभर तूप 'असं' खाणं ठरेल अमृत...
हे घरगुती औषधी ड्रिंक नेमकं कसं फायदेशीर...
१. दालचिनी :- दालचिनी शरीरातील इन्सुलिनची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जेव्हा शरीरात इन्सुलिनचे प्रमाण बिघडते, तेव्हा हॉर्मोन्सचे संतुलन बिघडून चेहऱ्यावर केस येऊ लागतात. दालचिनी या प्रक्रियेला रोखून हॉर्मोनल बॅलन्स राखण्यास मदत करते.
२. तुळशीची पाने :- तुळशीमध्ये 'अँटी-अँड्रोजन' गुणधर्म असतात. स्त्रियांच्या शरीरात जेव्हा पुरुषांमधील 'अँड्रोजन' हे हॉर्मोन वाढते, तेव्हा हनुवटीवर जाड केस येतात. तुळशीची पाने हे हॉर्मोन नैसर्गिकरित्या कमी करण्यास आणि शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकण्यास मदत करतात.
३. पुदिन्याची पाने :- पुदिना हे या ड्रिंकमधील सर्वात महत्वाचा घटक आहे. पुदिन्याचा चहा किंवा पाने नियमित घेतल्यास महिलांमधील अतिरिक्त केसांची वाढ कमी होते. हे हॉर्मोनल असंतुलनामुळे होणारी केसांची वाढ मुळापासून रोखते.
४. बडीशेप :- बडीशेपमध्ये फायटोएस्ट्रोजेन्स (Phytoestrogens) असतात, जे महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत पोषक मानले जातात. हे पचनसंस्था सुधरवण्यासोबतच शरीरातील उष्णता कमी करतात आणि हॉर्मोन्सला शांत ठेवण्यास मदत करतात.
५. अळशीची पूड :- अळशीमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि 'लिग्नॅन्स' भरपूर प्रमाणात असतात. हे घटक शरीरातील अतिरिक्त टेस्टोस्टेरॉन कमी करण्यास मदत करतात. यामुळे केसांची जाडी कमी होऊन त्यांची वाढ हळूहळू थांबते.
