Join us
Daily Top 2Weekly Top 5

दात पांढरेशुभ्र आणि हिरड्या मजबूत करणारं दंतमंजन, खिशाला परवडणारा घरगुती सुरक्षित उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2026 14:58 IST

homemade dantamanjan powder : how to make dantamanjan powder at home : पिवळे दात, तोंडाची दुर्गंधी होईल गायब! घरच्याघरीच फुकटात करा औषधी दंतमंजन पावडर - दात होतील पांढरेशुभ्र...

आजकाल दातांच्या एक ना अनेक समस्या आपल्यापैकी काहीजणांना प्रचंड त्रास देतात. दातदुखी, दात किडणे, हिरड्यांना सूज येणे, हिरड्यातून रक्त येणे अशा अनेक समस्या म्हणजे डोकेदुखीच असते. आजकाल दातांची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या टूथपेस्ट आणि दंतमंजन उपलब्ध आहेत. मात्र त्यामध्ये असलेल्या केमिकल्समुळे अनेकजण आता नैसर्गिक आणि घरगुती उपायांकडे पुन्हा वापरताना दिसत आहेत. पूर्वीच्या काळात आपले आजी-आजोबा घरात उपलब्ध असणाऱ्या औषधी पदार्थांपासूनच दंतमंजन तयार करत असत आणि त्यामुळे त्यांचे दात दीर्घकाळ मजबूत व निरोगी राहत. लवंग, दालचिनी, मीठ, कडुलिंब, हळद यांसारखे अनेक औषधी गुणधर्म असलेले पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेली घरगुती दंतमंजन पावडर दात स्वच्छ ठेवण्यास, दुर्गंधी कमी करण्यास आणि हिरड्या मजबूत करण्यास मदत करू शकते(homemade dantamanjan powder).

आपल्या स्वयंपाकघरातील काही औषधी घटक केवळ स्वयंपाकाची चव वाढवत नाहीत, तर दात मजबूत ठेवण्यास, हिरड्यांना संरक्षण देण्यास आणि तोंडातील जंतू (how to make homemade dantamanjan powder naturally) कमी करण्यासही मदत करतात. विशेष म्हणजे या नैसर्गिक घटकांपासून घरच्याघरी तयार केलेली दंतमंजन पावडर पूर्णपणे केमिकल-फ्री आणि दातांसाठी सुरक्षित असते. जर आपल्याला देखील नैसर्गिक पद्धतीने दातांची काळजी घ्यायची असेल, तर घरच्याघरीच औषधी दंतमंजन पावडर कशी तयार करायची (how to make dantamanjan powder at home) हे जाणून घेणं नक्कीच फायदेशीर ठरेल.

दातांसाठी घरगुती दंतमंजन पावडर कशी तयार करावी ? 

साहित्य :- 

१. कडुलिंबाची पाने - ५० ते ६० पाने
२. हळद - १ टेबलस्पून 
३. मीठ - १ टेबलस्पून 
४. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून  
६. लवंग काड्या - ८ ते ९ काड्या 
७. दालचिनी - १ छोटा तुकडा

दंतमंजन पावडर कशी तयार करावी ? 

दंतमंजन पावडर तयार करण्यासाठी सर्वात आधी कडुलिंबाची पाने ३ ते ४ दिवस व्यवस्थित ऊन्हात वाळवून ती पाने मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यावी. आता मिक्सरच्या भांड्यात हळद, मीठ, बेकिंग सोडा घालावा. सोबतच यात दालचिनीचा छोटा तुकडा आणि लवंग काड्या देखील बारीक कुटून घालाव्यात. सगळे मिश्रण एकत्रित मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पावडर तयार करून घ्यावी. ही पावडर बारीक जाळीच्या गाळणीने व्यवस्थित चाळून घ्यावी. तयार दंतमंजन पावडर एका हवाबंद डब्यात भरून स्टोअर करावी. 

शहाळ्याची मलई खाल्ल्याने खरंच कोलेस्टेरॉल वाढतं का ? डाएटिशियन सांगतात, दिवसाला किती आणि कशी खावी मलई... 

याचा वापर कसा करावा ? 

रोज सकाळी दात घासताना टूथपेस्ट ऐवजी आपण या घरगुती, औषधी दंतमंजन पावडरचा वापर करू शकता. ब्रशने दंतमंजन पावडर दातांवर लावून दात स्वच्छ घासावेत. बोटांच्या मदतीने आपण हिरड्यांवर देखील हळुवारपणे दंतमंजन लावून हिरड्या देखील स्वच्छ करून घेऊ शकता. 

स्टिल - पितळ की माती...कोणत्या भांड्यात दूध तापवावं ? 'या' भांड्याचा करा उपयोग - साय येईल जाडजूड...

हे घरगुती औषधी दंतमंजन वापरण्याचे फायदे.... 

१. दंतमंजनामध्ये असलेल्या लवंगामध्ये 'युजेनॉल' नावाचे घटक असतात जे जंतूनाशक म्हणून काम करते. कडुलिंब दातांमधील बॅक्टेरिया नष्ट करतो, ज्यामुळे दात किडण्याची समस्या दूर होते.

२. हळद ही नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी आहे. यामुळे हिरड्यांना येणारी सूज कमी होते आणि हिरड्यातून रक्त येण्याची समस्या थांबून हिरड्या मजबूत होतात.

३. यातील मीठ आणि बेकिंग सोडा हे 'नॅचरल क्लिन्झर' म्हणून काम करतात. चहा, कॉफी किंवा अन्नामुळे दातांवर साचलेला पिवळा थर हळूहळू निघून जातो आणि दात मोत्यासारखे पांढरे शुभ्र दिसू लागतात.

४. दालचिनी आणि लवंगामुळे तोंडातील दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात, हे मंजन वापरल्यानंतर तासंतास फ्रेशनेस जाणवतो.

५. जर तुमचे दात थंड किंवा गरम पाणी प्यायल्यावर शिवशिवत असतील तर यातील दालचिनी आणि लवंगेचे मिश्रण दातांच्या नसांना शांत करण्यास मदत करते.

घरात उपलब्ध असणाऱ्या औषधी पदार्थांपासून दातांसाठी गुणकारी दंतमंजन तयार करण्याची पद्धत इंस्टाग्रामवरील masalakitchenbypoonam या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. 


English
हिंदी सारांश
Web Title : Homemade Tooth Powder for Sparkling Teeth and Strong Gums: A Safe Remedy

Web Summary : This article details how to make homemade tooth powder using natural ingredients like neem, turmeric, and cloves. This chemical-free dantamanjan helps to clean teeth, reduce bad breath, strengthen gums, and prevent dental problems effectively and safely.
टॅग्स :ब्यूटी टिप्सहोम रेमेडीघरगुती उपाय