Lokmat Sakhi >Beauty > उन्हाळ्यात चेहरा चिपचिपा झाला-काळवंडला? काकडीचा ‘असा’ फेसमास्क लावा- चेहरा लगेच दिसेल फ्रेश...

उन्हाळ्यात चेहरा चिपचिपा झाला-काळवंडला? काकडीचा ‘असा’ फेसमास्क लावा- चेहरा लगेच दिसेल फ्रेश...

Homemade Cucumber Face Pack : Must Try Cucumber Face Mask for Summers : Cucumber Face Mask Benefits and Recipes : काकडी आपल्या त्वचेसाठी उन्हाळ्यातल्या सगळ्या गरजा पूर्ण करणारी अशी जादुई गोष्ट आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 18:37 IST2025-05-14T18:29:11+5:302025-05-14T18:37:15+5:30

Homemade Cucumber Face Pack : Must Try Cucumber Face Mask for Summers : Cucumber Face Mask Benefits and Recipes : काकडी आपल्या त्वचेसाठी उन्हाळ्यातल्या सगळ्या गरजा पूर्ण करणारी अशी जादुई गोष्ट आहे...

Homemade Cucumber Face Pack Must Try Cucumber Face Mask for Summers Cucumber Face Mask Benefits and Recipes | उन्हाळ्यात चेहरा चिपचिपा झाला-काळवंडला? काकडीचा ‘असा’ फेसमास्क लावा- चेहरा लगेच दिसेल फ्रेश...

उन्हाळ्यात चेहरा चिपचिपा झाला-काळवंडला? काकडीचा ‘असा’ फेसमास्क लावा- चेहरा लगेच दिसेल फ्रेश...

उन्हाळा आला की त्वचेच्या अनेक समस्या अचानक वाढतात. रणरणते ऊन, वाढती उष्णता, उकाडा यामुळे त्वचेवर मुरुम, पुटकुळ्या, टॅनिंग यांसारख्या अनेक तक्रारी सतावतात. उन्हाळ्यात (Homemade Cucumber Face Pack) त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. सतत उन्हाचा तडाखा, घाम, प्रदूषण आणि उष्णतेमुळे चेहऱ्यावर तेलकटपणा, राठपणा (Must Try Cucumber Face Mask for Summers) आणि थकवा स्पष्ट दिसायला लागतो, अशावेळी आपण त्वचेचे हरवलेले सौंदर्य पुन्हा आणण्यासाठी काकडीचा फेसमास्क त्वचेला लावू शकतो(Cucumber Face Mask Benefits and Recipes).

काकडीचा फेसमास्क हा उन्हाळ्यासाठी नैसर्गिक थंडावा देणारा रामबाण उपाय आहे. काकडीचा फेसमास्क त्वचेची होणारी जळजळ शांत करतो, सोबतच रॅशेज आणि काळे डाग कमी करतो आणि चेहऱ्याचा रंग उजळ करतो. भरपूर पाणी, अँटीऑक्सिडंट्स आणि थंड गुणधर्म असलेली काकडी आपल्या त्वचेसाठी उन्हाळ्यातल्या सगळ्या गरजा पूर्ण करणारी अशी जादुई गोष्ट आहे. उन्हाळ्यात त्वचेला आवश्यक असणारा काकडीचा फेसमास्क कसा तयार करायचा ते पाहा... 

साहित्य :- 

१. काकडी - २ ते ३ काकड्या 
२. मध - १ टेबलस्पून 
३. दही - १ टेबलस्पून 
४. गुलाबपाणी - १ टेबलस्पून

भेंडीचे पाणी केसांसाठी वरदान! कोरडेपणा- फ्रिझीनेस आणि केसगळतीवर सोप्यात सोपा असरदार उपाय...


स्वतःला लावलेल्या 'या' ६ सवयींमुळेच रेखाचं सौंदर्य आहे खास! वयाच्या सत्तरीतही सुंदरच...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी हिरवीगार काकडी स्वच्छ धुवून घ्यावी. या काकडीचे पातळ काप करुन घ्यावेत. हे पातळ काप एका डिशमध्ये पसरवून २ ते ३ दिवस उन्हांत ठेवून व्यवस्थित सुकेपर्यंत वाळवून घ्यावेत. 

२. संपूर्णपणे वाळवून घेतलेले काकडीचे काप मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर तयार करून घ्यावी. ही पावडर आपण एकदाच तयार करून स्टोअर करून ठेवू शकता व गरज लागेल तशी ही काकडीची पावडर आपण फेसपॅक तयार करण्यासाठी वापरु शकता. 
३. एका बाऊलमध्ये काकडीची पावडर घेऊन त्यात मध, दही, गुलाबपाणी घालावे. आता चमच्याने सगळे घटक एकत्रित कालवून फेसपॅक तयार करून घ्यावा. 

काकडीचा फेसमास्क कसा वापरावा ? 

हा तयार फेसमास्क चेहऱ्याला लावून १० ते १५ मिनिटे किंवा संपूर्ण वाळेपर्यंत तसाच ठेवून द्यावा. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा.

Web Title: Homemade Cucumber Face Pack Must Try Cucumber Face Mask for Summers Cucumber Face Mask Benefits and Recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.