Lokmat Sakhi >Beauty > टॅनिंग, पिंपल्स जाऊन नवरात्रीपर्यंत चेहरा उजळेल! रात्री झोपण्यापुर्वी 'हे' क्रिम लावा, त्वचेवर येईल ग्लो

टॅनिंग, पिंपल्स जाऊन नवरात्रीपर्यंत चेहरा उजळेल! रात्री झोपण्यापुर्वी 'हे' क्रिम लावा, त्वचेवर येईल ग्लो

Homemade Cream For Glowing Skin: नवरात्रीला दांडिया खेळायला जाताना चेहऱ्यावर छान ग्लो हवा असेल तर आतापासूनच हा उपाय सुरू करा...(how to get rid of pigmentation and tanning?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 13:18 IST2025-09-10T12:07:32+5:302025-09-10T13:18:18+5:30

Homemade Cream For Glowing Skin: नवरात्रीला दांडिया खेळायला जाताना चेहऱ्यावर छान ग्लो हवा असेल तर आतापासूनच हा उपाय सुरू करा...(how to get rid of pigmentation and tanning?)

homemade cream for glowing skin, best cream to reduce tanning and dead skin, how to get rid of pigmentation and tanning | टॅनिंग, पिंपल्स जाऊन नवरात्रीपर्यंत चेहरा उजळेल! रात्री झोपण्यापुर्वी 'हे' क्रिम लावा, त्वचेवर येईल ग्लो

टॅनिंग, पिंपल्स जाऊन नवरात्रीपर्यंत चेहरा उजळेल! रात्री झोपण्यापुर्वी 'हे' क्रिम लावा, त्वचेवर येईल ग्लो

Highlightsयामुळे टॅनिंग, पिगमेंटेशन कमी होऊन त्वचा छान टाईट होते. त्वचेवरच्या बारीकशा सुरकुत्याही कमी होतात.

पक्ष पंधरवाडा संपला की आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे. आता नवरात्र म्हटलं की तरुणाईमध्ये विशेष आनंद असतो. कारण ९ दिवस दांडिया, गरबा म्हणजे नुसती धमाल... त्यासाठी कितीतरी जय्यत तयारी केली जाते. कपडे, दागिने, चपला, बाकीच्या ॲक्सेसरीज आणि रोजचा गेटअप वेगळा असं सगळं प्लॅनिंग ठरलेलं असतं. पण अशावेळी इतकी सगळी तयारी झालेली असताना जर नेमका तुमचा चेहराच काळवंडलेला असेल किंवा खूप पिंपल्स, टॅनिंग असं झालेलं असेल तर? (best cream to reduce tanning and dead skin) म्हणूनच आता हा एक उपाय लगेचच करायला सुरुवात करा (homemade cream for glowing skin). बघा नवरात्रीपर्यंत चेहरा अगदी छान नितळ, सुंदर आणि चमकदार होईल.(how to get rid of pigmentation and tanning?)

 

चमकदार त्वचेसाठी घरगुती क्रिम

चमकदार त्वचेसाठी आपण घरच्याघरी एक नाईट क्रिम तयार करणार आहोत. यासाठी आपल्याला खूप कोणत्या वेगळ्या साहित्याची गरज नाही. आपल्या घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करूनच एक नाईट क्रिम तयार करायचे आहे.

पैठणीचे काठ चमकदार राहण्यासाठी ४ टिप्स- पैठणी जुनी झाली तरी तिचे काठ नव्यासारखे लखलखतील

ते तयार करण्यासाठी आपल्याला २ ते ३ टेबलस्पून तांदूळ लागणार आहेत. सगळ्यात आधी तर तांदूळ २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर ते साध्या पाण्यामध्ये किंवा गुलाबजलमध्ये भिजत घाला. गुलाबजल वापरल्यास जास्त चांगले. ४ ते ५ तास तांदूळ गुलाबजल किंवा साध्या पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर ते पाणी गाळून घ्या.

 

आता गाळून घेतलेले पाणी जेवढे असेल तेवढेच त्यामध्ये ॲलोव्हेरा जेल घालावे. त्यामध्ये १ ते दिड टेबलस्पून बदाम तेल किंवा मग व्हर्जिन कोकोनट ऑईल आणि व्हिटॅमिन ई च्या दोन कॅप्सूल घालाव्या.

नजर धुसर झाली- स्क्रिन बघताना डोळे दुखतात? झेंडूचा काढा प्या- मिळतील ५ जबरदस्त फायदे 

सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्यावं. ते जेव्हा क्रिमसारखं एकजीव होईल तेव्हा ते एखाद्या काचेच्या एअरटाईट डबीमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवून द्या. ८ ते १० दिवस हे क्रिम टिकते. हे क्रिम रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहऱ्याला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. 

यामुळे हळूहळू त्वचा छान माॅईश्चराईज होते. त्वचा मऊ होण्यास मदत होते. टॅनिंग, पिगमेंटेशन कमी होऊन त्वचा छान टाईट होते. त्वचेवरच्या बारीकशा सुरकुत्याही कमी होतात. काही दिवस वापरून पाहा. 


 

Web Title: homemade cream for glowing skin, best cream to reduce tanning and dead skin, how to get rid of pigmentation and tanning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.