आपल्यापैकी बऱ्याचजणी त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी दर महिन्याला ब्लिच किंवा फेशियल अशा अनेक स्किन ट्रिटमेंट करतात. त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी वेळच्यावेळी त्वचेची योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते. त्वचा उजळ आणि स्वच्छ दिसावी म्हणून अनेकजणी महागड्या, केमिकलयुक्त ब्लिचचा वापर करतात. ऊन, धूळ, माती किंवा प्रदूषणामुळे रापलेली, काळवंडलेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी अनेकजणी ब्लिचचा सोपा पर्याय निवडतात. परंतु त्वचेसाठी वारंवार अशाप्रकारे ब्लिचचा वापर करणे हानिकारक ठरू शकते. ब्लिचमुळे त्वचेवर जळजळ, कोरडेपणा, रॅशेस किंवा त्वचा काळवंडण्याची समस्या त्रासदायक ठरु शकते(bleach alternative for face at home).
आपल्या स्वयंपाकघरातच असे काही नैसार्गिक पदार्थ आहेत, ज्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग एजंट्स असतात. लिंबू, बटाटा, दही आणि टोमॅटो यांसारख्या साध्या पदार्थांचा योग्य वापर करून तुम्ही घरच्या घरी 'नॅचरल होममेड ब्लिच' तयार करू शकता. यामुळे कोणत्याही साईड इफेक्ट्सशिवाय तुमची त्वचा नैसर्गिकरित्या उजळते, डाग कमी होतात आणि चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो. घरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पदार्थांपासून तयार करता येणारे होममेड ब्लिच त्वचेसाठी अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरू शकते. आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. किरण गुप्ता यांनी चेहऱ्याचे तेज वाढवण्यासाठी घरगुती ब्लिच बनवण्याची खास पद्धत (homemade bleach remedy to enhance facial glow) सांगितली आहे. त्वचेसाठी केमिकल्सयुक्त महागडे ब्लिच वापरण्यापेक्षा घरगुती नैसर्गिक पदार्थांचे ब्लिच कसे तयार करावे ते पाहूयात.
घरगुती नैसर्गिक पदार्थांचे ब्लिच कसे तयार करावे...
घरगुती नैसर्गिक पदार्थांचे ब्लिच तयार करण्यासाठी आपल्याला बेसन २ टेबलस्पून, हळद पावडर १ टेबलस्पून, लिंबाचा रस १ टेबलस्पून, मध १ टेबलस्पून, दही किंवा गुलाबपाणी २ टेबलस्पून इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
एका वाटीत २ चमचे बेसन घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद, एक चमचा मध, लिंबाचा रस, दही आणि थोडे गुलाबपाणी मिसळून एक घट्ट पेस्ट तयार करा. ही तयार झालेली पेस्ट चेहरा आणि मानेवर व्यवस्थित लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटे किंवा पेस्ट पूर्णपणे सुकेपर्यंत तशीच राहू द्या. पॅक सुकल्यानंतर हात थोडे ओले करा आणि हलक्या हाताने गोलाकार मसाज करत हे ब्लिच चेहऱ्यावरून काढा. शेवटी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी चांगल्या मॉइश्चरायझरचा वापर करा.
हे घरगुती नैसर्गिक ब्लिच वापरण्याने नेमकं होत काय ?
१. बेसन :- बेसन त्वचेवरील साचलेली घाण आणि डेड स्किन काढून टाकण्यासाठी एक उत्तम नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते.
२. हळद :- हळदीमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यास आणि नैसर्गिक उजळपणा देण्यास मदत करतात.
३. लिंबाचा रस :- लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग एजंट आणि व्हिटॅमिन- सी असते, ज्यामुळे त्वचेवरील काळे डाग फिकट होतात.
४. मध :- मध त्वचेला खोलवर ओलावा देते आणि त्वचा मऊ व लवचिक ठेवण्यास मदत करते.
५. दही :- दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे त्वचेचे टॅनिंग दूर करून रंग उजळवण्यास मदत करते.
६. गुलाबपाणी :- गुलाबपाणी त्वचेचा pH स्तर संतुलित राखते आणि त्वचेला थंडावा देऊन ताजेतवाने करते.
Web Summary : Ditch harsh chemicals! This homemade Ayurvedic bleach uses natural ingredients like besan, turmeric, lemon, honey, curd, and rosewater to brighten skin, reduce blemishes, and enhance your natural glow. Easy, safe, and effective!
Web Summary : कठोर रसायनों को छोड़ें! यह घर का बना आयुर्वेदिक ब्लीच बेसन, हल्दी, नींबू, शहद, दही और गुलाब जल जैसे प्राकृतिक अवयवों का उपयोग करके त्वचा को निखारता है, दाग-धब्बे कम करता है और आपकी प्राकृतिक चमक को बढ़ाता है। आसान, सुरक्षित और प्रभावी!