Join us

रोज १ बायोटिनयुक्त घरगुती लाडू खा; केस तुटणं चटकन थांबेल-घनदाट, सुंदर होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 19:32 IST

Homemade Biotion Ladoo For Hair Growth : रोज एक लाडू खाल्ल्यानं हेअर ग्रोथ चांगली होते आणि केस मुळांपासून मजबूत होतात.

रोजच्या धावपळीच्या आयुष्यात अन्हेल्दी खाण्यापिण्याच्या सवयींमुळे शरीराच्या बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. ज्याचा थेट परिणाम आपल्या केसांवर होतो. काही महागड्या ट्रिटमेंट्स आहेत ज्या केल्यानंतर केस गळणं कमी होतं असा दावा केला जातो. पण इतका खर्च करण्यापेक्षा केस गळती रोखण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. (Homemade Biotion Ladoo For Hair Growth)

केसांच्या चांगल्या वाढीसाठी हेल्दी डाएट घेणं फार महत्वाचं आहे. बायोटीनयुक्त हे लाडू खाल्ल्यानं केस कमीत कमी गळतील. ड्राय फ्रुट्स आपल्या मेंदूसाठी शरीरासाठी आवश्यक असतात. यातील पोषक तत्व केसांना निरोगी ठेवतात. केसांच्या चांगल्या वाढीसाठी पोषक तत्वांनी परीपूर्ण असा आहार घेतल्यास केस चांगले आणि दाट राहण्यास मदत होईल. हे  मॅजिकल लाडू कसे तयार करायचे ते पाहूया. (Eat These Biotin Ladoo For Hair Growth)

बायोटीनयुक्त लाडू करण्याची रेसिपी 

१) सर्व ड्रायफ्रुट्स योग्य प्रमाणात घ्या. यात काजू, पिस्ता, खजूर, मनुके, भोपळ्याच्या बीया, सुर्यफुलाच्या बीया, तीळ आणि अळशीच्या बीया समान प्रमाणात ग्या. 

२) खजूराच्या बिया काढून मिक्सर ग्राईंडमध्ये बारीक करून घ्या. खजूर आपल्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता. कढईत २ चमचे तूप घाला आणि गरम होऊ द्या. 

३) तूप गरम झाल्यानंतर हलक्या गॅसवर त्यात सर्व ड्रायफ्रुट्स घालून व्यवस्थित भाजून घ्या.ड्रायफ्रुट्स थंड  झाल्यानंतर मिक्सरमध्ये  दाणेदार वाटून घ्या.  

 ४) बारीक केलेले खजूर आणि ड्रायफ्रुट्स एका भांड्यात घेऊन योग्य प्रमाणात मिक्स करून घ्या. तयार साहित्यात एक चमचा तूप घाला. सर्व पदार्थ एकजीव करून त्याला छोट्या, छोट्या लााडूंचा आकार द्या.  तयार आहेत मॅजिकल लाडू.

बायोटीनयुक्त घरगुती लाडू खाण्याचे फायदे

रोज एक लाडू खाल्ल्यानं हेअर ग्रोथ चांगली होते आणि केस मुळांपासून मजबूत होतात. त्वचा चांगली, लवचीक राहते, नखं मजबूत होतात. केसाचं तुटणं कमी होतं. स्काल्प हेल्दी राहतो, कोलोजन प्रोडक्शन वाढतं, केसांमध्ये नैसर्गिक चमक येते, एंटी एजिंग गुणांनी परीपूर्ण असलेले हे लाडू केसांच्या वाढीस उत्तेजना देतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Biotin-rich ladoos: Stop hair fall, get thick, beautiful hair.

Web Summary : Combat hair fall with homemade biotin ladoos. This recipe uses nuts, seeds, and dates for a healthy, delicious treat. Regular consumption strengthens hair roots, improves skin and nail health, and adds shine. Enjoy one ladoo daily for best results.
टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी