फार पूर्वीपासून बेसन पीठ हे त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आणि गुणकारी मानले जाते. खरंतर, बेसन पीठ हे त्वचा स्वच्छ, मऊमुलायम आणि उजळ करण्यासाठी वापरलं जातं. अनेकदा (Homemade Besan Soap) आपण त्वचेसाठी काही घरगुती उपाय करायचा म्हटलं की सर्वातआधी बेसन पिठाचाच वापर करतो. कोणताही (Besan Soap) घरगुती फेसमास्क, स्क्रब करताना आपण त्यात हमखास बेसन पीठ घालतोच. बेसन सगळ्यांच्याच घरात अगदी सहज उपलब्ध असत आणि ते कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी वापरणं फायदेशीर ठरत म्हणून आपण अगदी बिनधास्तपणे बेसन पीठ वापरतो(How To Make Besan Soap At Home).
बेसनामध्ये नैसर्गिक क्लिन्झिंग गुणधर्म असतात, जे त्वचेला खोलवर आतून स्वच्छ करतात, अतिरिक्त तेल काढून टाकतात आणि चेहऱ्याला नैसर्गिक उजाळा व चमक देतात. बेसन पीठ वापरुन तयार केलेला साबण केमिकल- फ्री, सॉफ्ट आणि नैसर्गिक व घरगुती असल्याने त्वचेसाठी अतिशय उत्तम असतो. हा साबण त्वचा कोमल ठेवण्यासाठी, मुरुमं कमी (Homemade Besan & Haldi Soap With Aloevera) करण्यासाठी आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी मदत करतो. बाजारात मिळणाऱ्या हार्श केमिकल्सयुक्त साबणांपेक्षा घरगुती बेसन पिठाचा साबण त्वचेसाठी कधीही सुरक्षित आणि सर्वोत्तम असा पर्याय ठरतो. कोणत्याही केमिकल्स शिवाय आणि घरातील उपलब्ध पदार्थांपासूनच हा साबण तयार करता येतो. कपभर बेसन पिठाचा साबण कसा करायचा ते पाहूयात.
बेसन पिठाचा साबण तयार करण्यासाठी लागणारं साहित्य...
बेसन पिठाचा साबण तयार करण्यासाठी, ४ टेबलस्पून बेसन पीठ, १ टेबलस्पून आंबेहळद, ५ ते ६ टेबलस्पून गुलाबपाणी, १/२ टेबलस्पून बदामाचे तेल, ४ टेबलस्पून एलोवेरा जेल, १/२ टेबलस्पून ग्लिसरीन, २ व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल्स, २०० ग्रॅम सोप बेस इतकं साहित्य लागणार आहे.
बेसन पिठाचा साबण कसा तयार करायचा ?
बेसन पिठाचा साबण तयार करण्यासाठी सर्वातआधी, एक बाऊलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात आंबेहळद, गुलाबपाणी, बदामाचे तेल, एलोवेरा जेल, ग्लिसरीन, व्हिटॅमिन 'ई' कॅप्सूल्स फोडून घालाव्यात. आता हे सगळे मिश्रण एकत्रित चमच्याने कालवून एकजीव करून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी.
स्वयंपाक घरातील 'या' पदार्थाने करा मसाज! डार्क सर्कल्स गायब - डोळे दिसतील सुंदर,आकर्षक...
१ चमचा खोबरेल तेल-१ चिमूट तुरटी, चेहरा इतका चमकेल की मैत्रिणी विचारतील फेशियलचं नाव...
आता एका भांडयात सोप बेस घेऊन तो व्यवस्थित वितळवून घ्यावा. वितळलेल्या सोप बेसमध्ये बेसनाची तयार पेस्ट घालावी आणि ती पेस्ट सोप बेसमध्ये एकजीव करून घ्यावी. त्यानंतर तयार मिश्रण हलके गरम असतानाच सोप मोल्डमध्ये ओतून ५ ते ६ तासांसाठी सेट होण्यासाठी तसेच ठेवून द्यावे. ६ तासांनंतर आपण हा बेसन पिठाचा साबण मोल्डमधून बाहेर काढू शकतो. आपला घरगुती आणि नॅचरल असा बेसन पिठाचा साबण वापरण्यासाठी तयार आहे.
दिसाल इतक्या सुंदर की बघत राहिल प्रत्येकजण! ‘या’ घरगुती सीरमचे फक्त २ थेंब करतात जादू...
बेसन पिठाचा साबण वापरण्याचे फायदे...
१. बेसनाचा साबण त्वचेला आतून खोलवर स्वच्छ करतो.
२. त्वचेमधील अतिरिक्त तेल नियंत्रित करून चेहरा कायम फ्रेश ठेवतो.
३. त्वचेला नैसर्गिक उजाळा आणि चमक मिळवून देतो.
४. मुरुमं आणि ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते.
५. टॅनिंग कमी करून त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.
६. त्वचा मऊ, कोमल आणि हेल्दी बनते.
७. डेड स्किन काढून टाकून नव्या पेशींची संख्या वाढवतो.
८. त्वचेला कोणतीही हानी होऊ न देता त्वचेची स्वच्छता व काळजी घेतली जाते.