दिवाळीचा सण जवळ आला आहे, या खास सणाच्या दिवशी आपण सुंदर दिसावे अशी प्रत्येकीची इच्छा असतेच. नवीन कपडे, आकर्षक सुंदर दागिने यासोबतच चेहऱ्यावरही एक चमकदार आणि इन्स्टंट ब्राइट ग्लो असणे आवश्यक असते. पण ऐन दिवाळीच्या तयारीच्या धावपळीत पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट्स घेण्यासाठी वेळ नसतो. अशा परिस्थितीत, चेहऱ्यावर झटपट आणि नैसर्गिक ग्लो हवा असेल, तर त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे (Homemade Alum & Curd Facemask) घरगुती फेसपॅक! केस आणि सौंदर्य क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ज्ञ जावेद हबीब (Jawed Habib) यांनी असाच एक खास आणि घरगुती फेसपॅकचे सिक्रेट शेअर केले आहे. हा फेसपॅक अगदी घरच्या घरी सहज तयार होतो आणि फक्त काही मिनिटांत चेहऱ्यावर देतो इन्स्टंट ग्लो आणि फ्रेशनेस. कोणताही (Homemade Facemask) सण किंवा फेस्टिव्ह पार्टी असो, हा जावेद हबीबचा सिक्रेट फॉर्म्युला तुम्हाला देईल नॅचरल ब्राइट आणि ग्लोइंग स्किन - तीही पार्लरशिवाय!
ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सांगितलेला खास नॅचरल फेसपॅक त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो. हा फेसपॅक स्वयंपाकघरातील साध्या साहित्यातून देखील तयार होतो आणि तुम्हाला इन्स्टंट ग्लो देतो. हा फेसपॅक त्वचेला पोषण देतो, टॅनिंग कमी करतो आणि दिवाळीच्या रोषणाईत आपला चेहराही तितकाच सुंदर व तेजस्वी दिसतो. जावेद हबीब यांनी सांगितलेला सिक्रेट फेसपॅक कोणता आहे आणि तो घरी कसा तयार करायचा ते पाहा...
स्किन ब्राइटनिंगसाठी खास फेसपॅक...
ब्यूटी एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सांगितल्याप्रमाणे, हा घरगुती फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला तुरटीची बारीक पूड आणि थोडेसे आंबट दही इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
जर आपल्याकडे तुरटीचा खडा असेल, तर तो मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. आता त्यामध्ये आंबट दही मिसळा. त्वचेसाठी इन्स्टंट स्किन ब्राइटनिंग आणि ग्लोईंग फेसपॅक वापरण्यासाठी तयार आहे. हा फेसपॅक लावण्यापूर्वी सर्वातआधी चेहरा व्यवस्थित स्वच्छ करा. चेहरा धुवून पुसल्यानंतर, तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावा. याला चेहऱ्यावर तसेच ठेवून सुकू द्या आणि मग पाण्याने स्वच्छ धुवा. हा फेसपॅक १५ दिवसांत २ वेळा लावू शकता. जावेद हबीब सांगतात की, यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिगमेंटेशन कमी होते आणि चमकदार व ब्राईट त्वचा मिळते.
मूठभर बदामाचा घरगुती हेअर डाय! पांढरे केस होतील काळेभोर - घरीच करा हा पैसा वसूल नॅचरल उपाय...
केसांसाठी वापरा जादुई चहाचे पाणी! सर्वात स्वस्त आणि सोपा उपाय - केसांच्या समस्या राहतील कायम दूर...
हा फेसपॅक लावण्याचे फायदे...
१. दही :- दह्यामध्ये असलेले नैसर्गिक फॅट्स आणि प्रथिने त्वचेला खोलवर मॉइश्चराइझ करतात आणि त्वचेचा कोरडेपणा कमी करतात. टॅनिंग आणि काळवंडलेली त्वचा ब्राईट आणि ग्लोइंग करण्यासाठी दही फायदेशीर ठरते.
२. तुरटी :- तुरटीमध्ये नैसर्गिकरित्या अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. यामुळे मुरुमांना कारणीभूत असणारे जंतू नष्ट होतात आणि मुरुमांची समस्या नियंत्रणात राहते.