कधी कधी आपल्या आहारातून मिळणारे पौष्टिक घटक त्वचेसाठी पुरेसे ठरत नाहीत. कारण हल्ली धूळ, ऊन, प्रदुषण यासारख्या गोष्टींचा आपल्या त्वचेला नेहमीच सामना करावा लागतो. शिवाय स्ट्रेस, रात्रीची अपुरी झोप आणि सतत आपल्यामागे असणारी कामाची धावपळ याचाही परिणाम आपल्या त्वचेवर होतोच. त्यामुळे मग हल्ली बऱ्याच जणींच्या बाबतीत असं दिसून येत आहे की कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या यायला सुरुवात झाली असून चेहऱ्यावरची चमकही गेली आहे. हा त्रास कमी करायचा असेल आणि त्वचा नेहमीच तरुण ठेवायची असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा..(how to get rid of pigmentation and fine lines?)
त्वचेवरच्या सुरकुत्या आणि पिगमेंटेशन कमी करण्याचा उपाय
हा उपाय करण्यासाठी आपल्याला घरच्याघरी एक क्रिम तयार करायचे आहे. त्यासाठी सगळ्यात आधी तर अर्धे बीट आणि अर्धे गाजर घ्या. ते स्वच्छ धुवून घ्या आणि किसून घ्या. नंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यात गुंडाळून त्याचा रस काढून घ्या.
हळदी, देवब्राह्मणाच्या कार्यक्रमासाठी 'असा' करा पिवळ्या साडीतला सुंदर लूक- तुमच्यावरच खिळतील नजरा
आता साधारण ४ चमचे रस असेल तर त्यात १ चमचा बदाम तेल, १ चमचा खाेबरेल तेल, १ चमचा गुलाबजल घाला.
यानंतर घरच्याघरी तयार केलेले जवसाचे जेलही त्यात घाला. जवसाचे जेल तयार करण्यासाठी पाऊण कप पाण्यामध्ये ४ टीस्पून जवस घालावेत आणि हे पाणी उकळून घ्यावे.
पाणी थोडे घट्ट व्हायला लागले की गॅस बंद करावा आणि पाणी गाळून घ्या. हे जेलही त्यामध्ये टाका.
रोपांना फुलंच येत नाहीत, पानं पिवळी पडतात? 'या' पद्धतीने बेकिंग सोडा वापरा- रोपं होतील हिरवीगार
आता सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकत्र करा. त्यानंतर ते एका एअरटाईट डबीमध्ये भरून ठेवा. रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर हे क्रिम चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मालिश करा. सकाळी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहा. त्वचेवर खूप छान परिणाम दिसून येईल.
Web Summary : Combat aging skin with a homemade cream. Mix beetroot and carrot juice with almond, coconut, rosewater, and flaxseed gel. Apply nightly for youthful, pigmentation-free skin.
Web Summary : घर पर बनी क्रीम से बढ़ती उम्र के लक्षणों से लड़ें। चुकंदर और गाजर के रस को बादाम, नारियल, गुलाब जल और अलसी के जेल के साथ मिलाएं। युवा और पिगमेंटेशन-मुक्त त्वचा के लिए रात को लगाएं।