Sticky Hair Problem Home Remedy : आपण टीव्ही किंवा सोशल मीडियावर बघत आहोच की, अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे तर अनेक ठिकाणी उन्हाचा पाराही वाढत आहे. ज्यामुळे तब्येती तर बिघडत आहेच, सोबतच केस आणि त्वचेचं नुकसानही होत आहे. खासकरून गरमीमुळे केसांचं अधिक नुकसान होतं. डोक्यात घाम येतो आणि घामामुळे केसांमध्ये चिकटपणा वाढतो. हवेमुळे त्यात धूळ-माती चिकटते. ही समस्या काही केवळ महिलांना होते, असं नाही तर पुरूषांना देखील होते. त्यामुळे अशा वातावरणात केसांची काळजी घेणं खूप महत्वाचं ठरतं.
अशात आज आपण केसांची काळजी घेण्यासाठी ३ अतिशय उपयुक्त असे उपाय पाहणार आहोत. या ट्रिक्समुळे केवळ केसांमधील चिकटपणा नाहीसा होणार नाही, तर टाळू स्वच्छ होईल, केसांना पोषण मिळेल आणि ते हेल्दी तसेच चमकदार राहतील.
तेल कमी वापरा
बर्याच लोकांची सवय असते की ते दररोज भरपूर तेल केसांना लावतात. ही सवय चुकीची आहे. त्यामुळे हेअर फॉलिकल्स ब्लॉक होतात आणि डोक्याच्या त्वचेमध्ये कोंड्याचा जाड थर जमा होतो. त्यामुळे शक्यतो केसांना तेल लावायचं असल्यास आंघोळीच्या ३० मिनिटं आधी लावा आणि नंतर केस धुवा.
जास्त वेळ केस धुवू नका
पुरुष रोज केस धुतात, पण महिला साधारण आठवड्यातून फक्त २ किंवा तीन वेळा केस धुतात. त्यामुळे टाळूवर बराच वेळ धूळ-माती-कोंडा साचलेला राहतो. ज्यामुळे टाळूमध्ये खाज येते, जळजळ होते आणि फोडही येतात. म्हणून एक दिवसआड केस धुवा आणि टाळू स्वच्छ ठेवा. रोज धुणं टाळा, पण आठवड्यातून किमान ३ वेळा हेअर वॉश गरजेचं आहे.
घरगुती उपाय वापरा
- केस धुण्याआधी केसांवर अॅलोव्हेरा जेल लावा
- आवळ्याचा हेअर मास्क लावा
- केसांवर तांदळाच्या पाण्याचा स्प्रे करू शकता
- दही आणि लिंबाच्या रसाचा मास्क वापरणं
हे उपाय केस निरोगी ठेवण्यासाठी, टाळू स्वच्छ करण्यासाठी आणि उकाड्याच्या दिवसात केसांची योग्य काळजी घेण्यासाठी फायदेशीर ठरतात.
इतरही काही नॅचरल उपाय
- रात्री एक चमचा मेथी भिजवून ठेवा. सकाळी ही भिजवलेली मेथीची पेस्ट तयार करा आणि त्यात दही आणि लिंबाचा रस मिश्रित करा. ही पेस्ट १० ते १५ मिनिटांसाठी केसांवर लावा. नंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ करा आणि केसांना टॉवेलनं बांधून ठेवा. हेही लक्षात ठेवा की, भिजलेल्या केसांवर कंगवा फिरवू नका.
- चहा पावडरच्या पाण्यात लिंबाचा रस मिश्रित करून केसांवर हे पाणी टाका. याने केसांना एक नवी चमक मिळेल, सोबतच केस मुलायम होतील. तसेच याने केसगळतीची समस्या देखील दूर होईल.
- केसांची हरवलेली चमक परत मिळवण्यासाठी मधाचा वापर करा. याने ना केवळ केसांना चमक मिळेल, तर केस मुलायम देखील मिळेल. मधात केसांसाठी आवश्यक असणारे पोषक तत्त्व असतात.
- आठवड्यातून कमीत कमी एक वेळा केसांना स्टीम द्या. स्टीम घेतल्यानंतर केस कापडाने बांधून ठेवा. तसेच केस मोकळे केल्यावर लगेच कंगवा फिरवू नका. केस कोरडे झाल्यावर त्यात कंगवा फिरवा.