लांबसडक, घनदाट आणि रेशमी केस स्त्रियांचं व्यक्तिमत्त्व खुलवतात. शालेय वयात आई तेल लावून, चापून-चुपून वेणी घालून द्यायची, तेव्हा केसांची योग्य निगा घेतली जायची. मात्र आता केसाला तेल-पाणी आणि आहारात पोषण मूल्यांचा अभाव निर्माण झाल्यामुळे केसांचा पोत बिघडलेला दिसतो. अनेक जणी महागड्या हेअर ट्रीटमेंट करवून घेतात. केसावर वेगवेगळे रंग, स्ट्रेटनिंग, हेअर स्प्रे वापरून नैसर्गिक गुणवत्ता घालवतात. अशा वेळी आयुर्वेदात सांगितलेले उपाय कामी येतात.
पुढे दिलेले साहित्य वापरून तुम्हाला हेअर स्प्रे घरच्या घरी तयार करायचा आहे. ज्याचा खर्च ५० रुपयांपेक्षाही कमी आहे. हे पदार्थ तुम्हाला स्वयंपाक घरातही(Home Remedy for beautiful hair) सहज मिळू शकतील. हेअर स्प्रे कसा तयार करायचा आणि कसा वापरायचा ते जाणून घेऊ.
हेअर स्प्रे तयार करण्यासाठी लागणारे चार पदार्थ :
मेथी दाणे : मेथी दाणे तुमच्या केसांना मुळापासून घट्ट करतील.
कलौंजी/ कांद्याचे बी : तुमचे केस अकाली पांढरे झाले असतील तर त्यांना नैसर्गिकरित्या काळे करेल.
लवंग : लवंग तुमची केस गळती थांबवण्यास मदत करेल.
कढीपत्ता : तुमच्या केसात वारंवार कोंडा होत असेल तर तो दूर करण्यासाठी कढीपत्ता उपयोगी पडेल.
हे चारही पदार्थ रात्रभर पेलाभर पाणी घालून भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून घ्या आणि हेअर स्प्रे बॉटल तयार करा.
हेअर स्प्रेचा वापर :
>> रोज रात्री झोपण्यापूर्वी केसाच्या मुळांवर या पॉवरफुल पाण्याचा स्प्रे करा.
>> दुसऱ्या दिवशी फक्त पाण्याने केस धुवून घ्या.
>> आठवड्यातून एक ते दोन वेळा शॅम्पूने केस धुवा.
>> नियमितपणे याचा वापर केल्यामुळे तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील आणि पाहता पाहता नैसर्गिकरित्या केसांची छान वाढ होईल.