आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर अनेक कारणांमुळे स्ट्रेच मार्क्स येतात. त्वचेवर दिसणारे हे स्ट्रेच मार्क्स दिसताना अत्यंत वाईट दिसतात तसेच यामुळे आपले सौंदर्य कमी होते. गरोदरपणानंतर किंवा वजन वाढल्याने आणि (castor oil for stretch marks) कमी झाल्याने अनेकदा आपल्या शरीरावर, विशेषतः पोट, मांड्या आणि खांद्यांवर स्ट्रेच मार्क्स (stretch marks) येतात. हे स्ट्रेच मार्क्स त्वचेवर एक प्रकारच्या रेषांसारखे दिसतात आणि त्यामुळे काहीजणींचा (home remedy for stretch marks) आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो. त्वचेवर आलेले हे स्ट्रेच मार्क्स अगदी सहजासहजी जात नाहीत. स्ट्रेच मार्क्स त्वचेवरून घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो(Ayurvedic treatment for stretch marks).
अनेक उपाय करताना आपण महागड्या क्रीम्स, लोशनचा देखील वापर करून पाहतो. परंतु प्रत्येकवेळी असे महागडे उपचार करणे शक्य होतेच असे नाही. याचबरोबर, या आर्टिफिशियल उपयांपेक्षा नैसर्गिक उपाय करणे कधीही उत्तमच. स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी नैसर्गिक आणि घरगुती असा पारंपरिक उपाय म्हणजे एरंडेल तेल. एरंडेल तेलामध्ये (Natural way to reduce stretch marks) असलेले नैसर्गिक गुणधर्म त्वचेला पोषण देतात आणि स्ट्रेच मार्क्स कमी करण्यास मदत करतात. एरंडेल तेल वापरून आपण घरच्या घरीच त्वचेवरील स्ट्रेच मार्क्स सहज कमी करु शकतो. स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर नेमका कसा करावा ते पाहा..
स्ट्रेच मार्क्स कमी कारण्यासाठी खास घरगुती उपाय...
आयुर्वेद डॉक्टर वैशाली शुक्ला यांच्या मते, जेव्हा त्वचा अचानक ताणली जाते, तेव्हा शरीरातील 'वात दोष' वाढतो. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि तत्वचेवर स्ट्रेच मार्क्स उमटतात. अशा परिस्थितीत, एरंडेल तेल सर्वात सोपा उपाय मानला जातो. एरंडेल तेल फक्त त्वचेला हायड्रेट करत नाही, तर त्वचेची लवचिकता देखील वाढवते.
गुडघेदुखीवर असरदार वडाच्या पानांचा आयुर्वेदिक उपाय! वेदना आणि सूज होते कमी-पाहा करायचे काय...
डाएटिशियन ऋजुता दिवेकर सांगतात ५ पावरफुल फूड कॉम्बिनेशन! वजन होईल कमी - रहाल कायम फिट...
एरंडेल तेलात असलेले अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म त्वचेला खोलवर पोषण देतात. एनसीबीआय (NCBI) च्या एका अहवालानुसार, हे तेल फक्त स्ट्रेच मार्क्सच कमी करत नाही, तर पिगमेंटेशन (pigmentation), डार्क स्पॉट्स (dark spots) आणि मुरुमांची (acne) समस्या देखील कमी करण्यास मदत करते.
स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर कसा करावा?
शरीराच्या ज्या भागावर स्ट्रेच मार्क्स आले आहेत तो भाग स्वच्छ धुऊन कोरडा करा. हातावर थोडेसे एरंडेल तेल (Castor oil) घ्या. हे तेल स्ट्रेच मार्क्सवर (stretch marks) हलक्या हातांनी मसाज करत लावा. रात्रभर हे तेल तसेच राहू द्या आणि सकाळी धुऊन टाका. रोज नियमितपणे ३ महिने याचा वापर केल्यास आपल्याला त्वचेवर याचे परिणाम दिसू लागतील.
स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी एरंडेल तेल अत्यंत फायदेशीर मानले जाते. यात नैसर्गिक फॅटी ॲसिटिक आम्ल आणि व्हिटॅमिन 'ई' भरपूर प्रमाणात असल्याने ते त्वचेला खोलवर पोषण देते, कोरडेपणा कमी करते आणि त्वचेची लवचिकता वाढवते. नियमितपणे एरंडेल तेलाने मालिश केल्याने स्ट्रेच मार्क्स हळूहळू फिके होऊ लागतात आणि त्वचा अधिक मऊ व गुळगुळीत दिसते.