सुंदर, काळेभोर आणि मऊमुलायम केस कोणाला आवडत नाहीत? पण सध्याच्या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये केसांचा नैसर्गिक ओलावा हरवत चालला आहे. केस धुतले की ते अधिकच फुगतात आणि मग त्यांना सांभाळणं कठीण होतं. केसांच्या अनेक वेगवेगळ्या समस्यांपैकी 'केसांचा फ्रिजीनेस' ही अतिशय कॉमन समस्या आहे. केसांचा फ्रिजीनेस म्हणजेच, केस कितीही सेट केले तरी काही वेळातच ते फुगलेले आणि राठ दिसू लागतात, ज्यामुळे संपूर्ण लूक खराब दिसतो. केसांचा फ्रिजीनेस कमी करण्यासाठी महागड्या हेअर स्पा ट्रीटमेंट किंवा कंडिशनर वापरूनही काही तासांतच केस पुन्हा कोरडे आणि फुगलेले दिसू लागतात. यासाठीच, केसांवर सतत महागडे उपाय करण्यापेक्षा घरच्याघरीच उपलब्ध साहित्यात अगदी नॅचरल उपाय करणेच फायदेशीर ठरते(home remedy for frizzy hair).
स्वयंपाकघरात असलेले तांदळाचे पाणी आणि आपण रोज पितो त्या चहाची पावडर केसांसाठी एखाद्या महागड्या हेअर सीरमपेक्षाही जास्त फायदेशीर ठरू शकते. तांदळाच्या पाण्यातील अमिनो (how to reduce frizzy hair naturally) ॲसिड्स केसांना मजबूती देतात, तर चहा पावडरमधील अँटी-ऑक्सिडंट्स केसांना एक नैसर्गिक चमक मिळवून देतात. या दोन साध्या नेहमीच्याच पदार्थांचा वापर करून आपण घरच्या घरी 'हेअर रिन्स' कसं तयार करू शकता आणि केसांचा फ्रिजीनेस कायमचा कसा घालवू शकता, ते पाहूयात...
केसांचा फ्रिजीनेस कमी करण्यासाठी घरगुती उपाय...
केसांचा फ्रिजीनेस कमी करण्यासाठी काय करता येईल असे उपाय, डॉक्टर मनीषा मिश्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत. केस कोरडे आणि विस्कटलेले (Frizzy) दिसणे ही एक सामान्य समस्या आहे. डॉ. मनीषा मिश्रा यांच्या मते, फ्रिजी हेअर म्हणजे केवळ कोरडे केस नव्हे, तर ते केसांचे 'क्यूटिकल्स' असतात. जर हे क्यूटिकल्स स्मूद केले, तर फ्रिजीनेस सहज गायब होतो. अनेकदा शॅम्पू नंतर वापरले जाणारे रासायनिक कंडिशनर केसांचे नुकसान करू शकतात. त्याऐवजी आपण(natural remedy for frizzy hair)राईस वॉटर आणि चहा पावडरच्या पाण्याचा वापर करू शकतो.
१. तांदळाचे पाणी :- तांदळाचे पाणी केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. राईस वॉटर स्कॅल्पची pH लेव्हल संतुलित ठेवते, ज्यामुळे केस मऊ आणि स्मूद होण्यास मदत होते. हे पाणी गोड आणि पौष्टिक असते, तसेच यात थंडावा देणारे गुणधर्म असतात. एक कप तांदूळ आणि ६ कप पाणी घ्या. तांदूळ पाण्यात टाकून दोन तास तसेच ठेवा. त्यानंतर तांदूळ नीट चोळून पाणी गाळून घ्या. अधिक चांगल्या रिझल्टसाठी (जास्त सिल्की केसांसाठी) हे पाणी रात्रभर फरमेंट व्हायला ठेवा. शॅम्पू केल्यानंतर हे पाणी केसांवर ओतून त्या पाण्याने केस धुवून घ्यावेत.
सतराशेसाठ चपलांचे जोड कशाला पाहा प्रत्येक ड्रेस-साडीवर मॅच होणाऱ्या ५ चपला, टेंशनच विसरा...
२. चहा पावडरचे पाणी :- फायदे: ब्लॅक टी मधील ॲसिडिक पीएच, टॅनिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स केसांची चमक वाढवतात आणि त्यांना मऊ करतात. यामुळे केसांचा फ्रिजीनेस पूर्णपणे संपतो. २०० मिली पाण्यात एक चमचा चहाची पावडर घालूंन २ ते ३ मिनिटे उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून थंड करून घ्या. शाम्पू केल्यानंतर या पाण्याने केस धुवावेत. चहा पावडरचे हे पाणी केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
अवघ्या विशीतच केस झालेत पांढरे? तज्ज्ञांचा सल्ला, ६ सवयी बदला-म्हातारपणापर्यंत केस राहतील काळेभोर...
हा उपाय करण्याचे फायदे...
१. केसांचे क्यूटिकल्स स्मूद झाल्यामुळे केसांचा कोरडेपणा आणि विस्कटलेपणा पूर्णपणे गायब होतो.
२. हे उपाय नैसर्गिक 'लीव-इन' कंडिशनरप्रमाणे काम करतात, ज्यामुळे रासायनिक कंडिशनर्समुळे होणारे नुकसान टाळता येते.
३. राईस वॉटर स्काल्पची पीएच लेव्हल बॅलन्स ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे केस मऊ आणि स्मूद होतात.
४. तांदळाचे पाणी पौष्टिक असून त्यात थंडावा देणारे गुणधर्म असतात.
५. ब्लॅक टी मधील ॲसिडिक पीएच, टॅनिन्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स केसांची शाइन आणि मऊपणा सुधारतात. कोरड्या हवामानात केस जास्त ड्राय होत असल्यास, या पाण्याने केस धुतल्यास ते लवकर सिल्क आणि सॉफ्ट होतात. या नैसर्गिक उपायांमुळे तुमचे केस घरच्या घरी अधिक निरोगी आणि सुंदर दिसू लागतील.
