ताणामुळे, खाण्यापिण्यात पौष्टीक पदार्थांचा अभाव असणं यामुळे केस गळण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. काहीजणांचे तरूण वयातच केस पांढरे होत आहेत तर काहींची केसगळती थांबतच नाही. याव्यतिरिक्त हिवाळ्याच्या दिवसांत केसांमध्ये कोंडासुद्धा होतो. (Home Remedy By Ayurvedic Doctor To Make Hair Long And Shiny)
यावर उपाय म्हणून बाजारात मिळणाऱ्या केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करण्याऐवजी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. आयुर्वेदीक डॉक्टर शोभना यांनी आपल्या इंस्टाग्रामपेजवर एक व्हिडिओ शेअर केली आहे. यात त्यांनी लांबसडक दाट केस व्हावेत यासाठी काही उपाय सांगितले आहेत. ( Mix these Thing In Shampoo to Get Thick Hairs)
डॉक्टर सांगतात एक वाटी किंवा ग्लास घेऊन त्यात तुम्ही वापरत असलेला शॅम्पू घाला. त्यात 2 चमचे एलोवेराल जेल, 1 चमचा ग्लिसरिन, 2 व्हिटामीन ई कॅप्सूल आणि 2 रूपयांचे कॉफीचे पाकीट घाला. नंतर त्यात थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार आहे घरगुती उपाय.
याचा वापर कसा करावा?
या घरगुती उपायाचा वापर केस धुण्यासाठी करा. केस धुताना शॅम्पूऐवजी हे द्रावण केसांवर घालून केस स्वच्छ धुवून घ्या. नियमित हा उपाय केल्यास १५ दिवसांत केसांमध्ये चांगला परिणाम दिसून येईल. ज्यामुळे केस लांबसडक, दाट दिसतील.
केस गळून कपाळ रुंद झालं-भांग मोठा झाला? ‘हे’ घरगुती तेल लावताच केस वाढतील-शहनाज यांचा उपाय
फायदे
एलोवेरा जेल केसांचा फ्रिजीनेस दूर करण्यास प्रभावी ठरतो. ग्लिसरिन केसांमध्ये दीर्घकाळ मॉईश्चर टिकवून ठेवते. व्हिटामीन ई केसांना हेल्दी आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. कॉफी पावडर स्काल्पमध्ये ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित करते ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केस व्यवस्थित वाढतात.
शॅम्पूमध्ये आणखी काय मिसळता येईल?
तुम्ही पाण्यात चहा पावडर उकळवून ते पाणी थंड करून शॅम्पूमध्ये मिसळू शकता. चहामधील एंटी ऑक्सिडेंट्स केसांची गळती कमी करतात. जर तुमच्याकडे टी ट्री ऑईल असेल तर त्याचे २ ते ३ थेंब शॅम्पूत घातल्यानं कोंडा कमी होतो आणि केसांची मुळं मजबूत होतात.
जेवणानंतर लगेच चालायला गेल्यानं वजन पटकन घटतं? पाहा कसं-किती चालावं..
जर तुमचे केस खूपच कोरडे झाले असतील तर शॅम्पूमध्ये गुलाब पाणी मिसळा. यामुळे केसांची पीएच लेव्हल संतुलित राहील आणि केसांना नैसर्गिक चमक येण्यासही मदत होईल.
