उन्हाळा सुरु झाला की, त्याचा सर्वात जास्त परिणाम आपल्या त्वचेवर होतो. (How to remove tan from feet naturally) त्वचेवर किती महागातले सनस्क्रिन किंवा इतर क्रीम लावले तरी देखील त्वचा काळी पडते.(Home remedies for tan removal on feet) कडक उन्हाचा त्रास आणि वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. उन्हामुळे आपली त्वचा टॅन पडू लागते. चेहरा, हात आणि मानेवरील टॅन घालवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. परंतु, पायावरच्या टॅनकडे नेहमीच दुर्लक्ष होते. (Summer skin care tips for feet)
अनेकदा सॅडल, शूज किंवा इतर चप्पलचे डाग आपल्या पायांवर उमटतात. पायाचे काळे घोटे आणि डागांमुळे पाय कुरुप दिसू लागतात.(Best remedies to lighten foot tan) उन्हाच्या अतिनिल किरणांमुळे मेलेनोसाइट्स नावाच्या पेशी अधिक सक्रिय होतात. ज्यामुळे आपल्या पायाची त्वचा अधिक टॅन होते.(Exfoliation tips for removing foot tan) टॅन घालवण्यासाठी आपण अनेक पॅक आणि स्क्रबचा वापर करतो. परंतु, पाय पूर्वीसारखे होत नाही. काही सोप्या घरगुती गोष्टींचा वापर करुन पायाचे घोटे आणि काळवंडलेले त्वचा उजळण्यास मदत होईल. (Natural ways to reduce foot tan)
चाळिशीतही चेहरा दिसेल विशीतल्या तरुणीइतका तुकतुकीत; आहारात ‘हे’' ७ पदार्थ नक्की खा, चेहरा चमकेल
1. बटाटा आणि लिंबाचा रस
बटाटा ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते तर लिंबू शरीरातील डाग आणि टॅन काढून टाकण्यास मदत करते. हे मिश्रण त्वचेला नैसर्गिक रंग परत मिळवून देते. बटाटा आणि लिंबाच्या रसाची पेस्ट तयार करा. ती आपल्या पायांना लावा. १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोन वेळा असे केल्याने त्वचा उजळण्यास मदत होईल.
2. संत्री, दुधाची साय आणि चंदन
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते जे त्वचेतील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. तर चंदन सूर्यप्रकाशपासून संरक्षण करते. दुधाची साय त्वचेला मॉइश्चयराझिंग करायचे काम करते. याची पेस्ट तयार करुन त्वचेला लावा. ३० ते ३५ मिनिटानंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा ही पेस्ट वापरा.
3. ओट्स आणि दही
ओट्स हे एक्सफोलिएटिंग एजंट आहे. जे त्वचेचवरील मृत पेशी काढून टाकण्याचे काम करते. दही त्वचेला मॉइश्चरायझ करते. ओटमील, लिंबाचा रस आणि दह्याची पेस्ट तयार करा. ती आपल्या पायांना लावा. ही पेस्ट १० ते १५ मिनिटे हळूवारपणे घासून घ्या आणि थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा केल्याने फरक जाणवेल.
4. टोमॅटो
टॅन झालेल्या पायांच्या त्वचेवर टोमॅटो घासल्याने त्वचेचा काळपटपणा निघून जाण्यास मदत होते. टोमॅटो नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. टोमॅटोच्या रसात थोडी साखर मिसळून स्क्रब तयार करुन पायांवर लावा. त्वचेवर घासून अर्धा तास ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने पाय स्वच्छ धुवा.
5. हळद, कॉर्नफ्लोर आणि मध
त्वचेवरील टॅन काढण्यासाठी हळद हा चांगला पर्याय आहे. एका भांड्यात १ चमचा कॉर्नफ्लोर, १ चमचा हळद आणि मध घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर लावा. अर्धा तासाने पाय स्वच्छ धुवा. त्वचेवरील टॅन कमी होईल.