आंघोळ तर आपण दररोज करतोच, पण तरीही शरीराचा एक भाग अनेकदा नीट स्वच्छ होत नाही, ती म्हणजे पाठ. चेहऱ्याची निगा राखण्यासाठी आपण तासंतास खर्च करतो परंतु जिथे आपला हात सहज पोहोचत नाही त्या पाठीकडे मात्र आपण सहज दुर्लक्षच करतो. हात सहजपणे पाठीमागे पोहोचत नसल्यामुळे त्या भागात मळ साचतो, त्वचा निस्तेज दिसू लागते आणि कधी कधी पिंपल्स किंवा काळपटपणाही वाढतो. विशेषतः बॅकलेस ब्लाऊज, ड्रेस घालताना पाठ स्वच्छ आणि उजळ दिसत नसेल तर आत्मविश्वास कमी होतो आणि चारचौघात लाजिरवाणे देखील वाटू शकते(home remedies to remove back pimples and dark spots).
पाठीची त्वचा स्वच्छ, मऊ आणि उजळ ठेवण्यासाठी नेहमी महागडी ट्रीटमेंट घेण्याची गरज नसते. काही सोपे, नैसर्गिक आणि घरगुती उपाय रोज केले तर पाठीवरील मळ, टॅन आणि मृत त्वचा कमी होण्यास मदत होते. योग्य पद्धतीने एक्सफोलिएशन, मॉइश्चरायझिंग आणि काही घरगुती स्क्रब्स वापरून आपण सहजपणे पाठीच्या त्वचेची वेळीच चांगली निगा राखू शकता. रोज अंघोळ करताना पाठ व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे, आपल्या आवडीचा बॅकलेस ब्लाऊज किंवा ड्रेस घालताना आपल्याला संकोच वाटू नये म्हणून वेळीच या समस्येकडे लक्ष देणं गरजेचे असते. स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून आपण घरच्याघरीच पाठीचा मळ काढून त्वचा मऊमुलायम करुन उजळवू शकता. यासाठी (dark spots removal on back) नेमकं करायचं काय ते पाहूयात...
पाठीवरील स्किन टॅनिंग, पिंपल्स आणि डेड स्किन काढून टाकण्यासाठी उपाय...
१. बेसन आणि हळदीचा पॅक :- त्वचा स्वच्छ करण्यासाठी आणि उजळवण्यासाठी बेसन आणि हळदीचा वापर खूप पूर्वीपासून होत आला आहे. ३ चमचे बेसन, अर्धा चमचा हळद आणि थोडे गुलाबपाणी एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. हे तयार मिश्रण पाठीवर व्यवस्थित लावा आणि १५ ते २० मिनिटांनंतर हलक्या हाताने स्क्रब करत धुवून टाका. यामुळे पाठीवरील मृत त्वचा निघून जाईल आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येईल.
२. लिंबू आणि मध :- लिंबाचा रस त्वचेला टॅनिंग होण्यासपासून बचाव करतो. याचबरोबर, मध त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. एका लिंबाचा रस आणि १ चमचा मध एकत्र करून पाठीवर लावा. हे मिश्रण १० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास पाठ स्वच्छ आणि चमकदार होईल.
३. ओटमील आणि दही स्क्रब :- जर तुमच्या पाठीवर पिंपल्स किंवा रॅशेस असतील, तर ओटमील आणि दह्याचा स्क्रब अत्यंत फायदेशीर ठरेल. २ चमचे ओट्स जाडसर वाटून घ्या, त्यात २ चमचे दही आणि थोडे मध मिसळा. हे मिश्रण पाठीवर लावून हलक्या हाताने मसाज करा. हा स्क्रब त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासोबतच तिला मऊ आणि मुलायम बनवतो.
४. खोबरेल तेल आणि साखरेचे पॉलिशिंग :- पाठीवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आणि त्वचेवर चमक आणण्यासाठी खोबरेल तेल आणि साखरेचे मिश्रण फायदेशीर आहे. २ चमचे खोबरेल तेलात १ चमचा ब्राऊन शुगर (किंवा साधी साखर) मिसळा आणि पाठीवर गोलाकार पद्धतीने मसाज करा. ५ मिनिटे मसाज केल्यानंतर साध्या पाण्याने पाठ धुवून टाका. यामुळे त्वचा मऊ, गुळगुळीत आणि हायड्रेटेड राहते.
५. कोरफडीचा कूलिंग टच :- उन्हात बाहेर फिरून आल्यावर किंवा टॅनिंग झाल्यावर कोरफडीचे जेल पाठीला लगेच थंडावा आणि ओलावा देते. ताज्या कोरफडीचे जेल पाठीवर लावा आणि १५ मिनिटे तसाच राहू द्या. यामुळे त्वचेची आतून दुरुस्ती होते आणि टॅनिंग दूर करण्यास मदत होते.
इतरही टिप्स लक्षात ठेवा...
१. आठवड्यातून किमान एकदा पाठीच्या त्वेचेचे 'डीप क्लीनिंग' नक्की करा.
२. जर पाठीवर पिंपल्स असतील, तर जास्त घट्ट कपडे घालणे टाळा, जेणेकरून त्वचेला मोकळी हवा मिळेल.
३. बॅकलेस ब्लाऊज किंवा ड्रेस घालण्याच्या एक दिवस आधी पाठीला स्क्रब आणि मॉइश्चराइज करायला विसरू नका.
Web Summary : Clean your back with these easy home remedies! Use natural scrubs like gram flour, turmeric, lemon, or oatmeal to remove tan, dead skin, and pimples. Regular exfoliation and moisturizing will reveal brighter, smoother skin.
Web Summary : इन आसान घरेलू उपायों से अपनी पीठ को साफ़ करें! टैन, मृत त्वचा और पिंपल्स को हटाने के लिए बेसन, हल्दी, नींबू या ओटमील जैसे प्राकृतिक स्क्रब का उपयोग करें। नियमित एक्सफोलिएशन और मॉइस्चराइजिंग से चमकदार, चिकनी त्वचा मिलेगी।