चेहऱ्याच्या त्वचेसोबतच हातापायांच्या त्वचेची देखील तितकीच काळजी घेणं गरजेचं असतं. परंतु अनेकदा आपल्याकडून हातापायांच्या त्वचेकडे दुर्लक्षच होत. चेहऱ्याच्या त्वेचेची (Home Remedies To Lighten Dark Elbows & Knees) काळजी घेता घेता आपण हातांपायांच्या त्वचेकडे ( remove darkness from elbows and knees) पाहत देखील नाही. आपल्यापैकी बऱ्याचजणींची संपूर्ण त्वचा गोरीपान परंतु हाताचे कोपरे आणि पायांची ढोपरं मात्र तेवढीच काळीकुट्ट असतात. हातापायांच्या कोपरावर असलेले काळेकुट्ट डाग यामुळे त्वचेचा रंग असमान दिसतो(natural ways to treat dark knees and elbows).
बरेचदा हातांचे कोपरे आणि पायांच्या गुडघ्यांवरील त्वचा रूक्ष, खडबडीत आणि काळसर दिसू लागते. वेळीच या समस्येकडे लक्ष दिले नाही तर त्वचेचा रंग अधिकच काळवंडलेला दिसू लागतो. या समस्येवर उपाय म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या महागड्या क्रीम्स, लोशन यांचा अगदी सर्रास वापर करतो. परंतु याचा परिणाम हा काही दिवसांपुरताच मर्यादित असतो. अशावेळी स्वस्त, सोपा आणि घरच्याघरी उपलब्ध असलेला एक पर्याय म्हणजे टूथपेस्ट! दात घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टूथपेस्टच्या मदतीने हातापायांच्या कोपरांची काळवंडलेली त्वचा साफ करण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. टूथपेस्टमध्ये स्वयंपाक घरातील काही नेहमीच्या वापरातील पदार्थ मिक्स करुन, हातापायांच्या कोपरांची काळवंडलेली त्वचा पुन्हा पहिल्यासारखी स्वच्छ करु शकतो. यासाठी नेमकं करायचं काय ते पाहूयात.
हातापायांच्या कोपरांची काळवंडलेली त्वचा होईल गोरीपान...
हातापायांच्या कोपरांची त्वचा काळवंडलेली दिसते यासाठी घरगुती उपाय इंस्टाग्रामवरील dk_singh_797 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला चमचाभर टूथपेस्ट, १ टेबलस्पून खायचा सोडा, कॉफी पावडर, टोमॅटोचा रस आणि लिंबाचा रस इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
केस अचानकच पांढरे व्हायला लागलेत? ‘हे’ घरगुती तेल ठरते असरदार, केसांचं पांढरं होणं थांबवत...
उपाय काय करायचा ?
एका बाऊलमध्ये टूथपेस्ट घेऊन त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून खायचा सोडा, कॉफी पावडर, टोमॅटोचा रस आणि लिंबाचा रस घालावा. आता हे सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करुन घ्यावे. त्यानंतर हे तयार मिश्रण त्वचेचा जो भाग काळवंडलेला आहे त्या भागावर लावून हलकेच २ ते ४ मिनिटे मसाज करून घ्यावा. हातापायांचे कोपरे, मानेवरील काळवंडलेला भाग, हातांच्या बोटांवरील काळेपणा घालवण्यासाठी आपण याचा वापर करु शकता.
ओपन पोर्समुळे चेहरा म्हातारा दिसतोय, करा गुलाब पाकळ्यांचा हा उपाय, चेहरा दिसेल गुलाबी गुलाबासारखा...
त्वचेवरील काळेकुट्ट डाग स्वच्छ करण्यासाठी कसे फायदेशीर ?
१. खायचा सोडा :- खायचा सोडा त्वचेवरील डेड स्किन दूर करून काळेकुट्ट डाग कमी करण्यास मदत करतो.
२. कॉफी पावडर :- कॉफी पावडर त्वचेवर नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करून त्वचेला उजळवते आणि डाग कमी करते.
३. टोमॅटोचा रस :- टोमॅटोच्या रसातील लायकोपीनसारख्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि काळेपणा कमी होतो.
४. लिंबाचा रस :- लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन 'सी' काळेकुट्ट डाग फिके करुन त्वचा उजळवते.