सध्याच्या काळात आपलं नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवणं हा खूपच मोठा टास्क बनला आहे. आजकाल कमी वयातच लोकांचे केस पांढरे होताना दिसून येतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त ताण घेणं, केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करणं यामुळे केस जास्त प्रमाणात गळतात. आवळ्याच्या मदतीनं तुम्ही केसांना नैसर्गिकरित्या काळे बनवू शकता. काही मिनिटांत हा उपाय घरच्याघरी करता येईल. नियमित हा उपाय केल्यानं केसाचं सौंदर्य वाढण्यासही मदत होईल. (Home Remedies How Dried Amla Can Help You To Get Rid Of Grey Hairs Problem)
सुक्या आवळ्याचा देशी उपाय
हा उपाय करणं खूपच सोपं आहे. यासाठी तुम्हाला जास्त साहित्य लागणार नाही. फक्त तुम्हाला मोजकं साहित्य लागेल. ४ ते ५ सुके आवळे आणि १ कप पाणी घ्या. काळ्याभोर केसांसाठी तुम्हाला फक्त हे २ चं पदार्थ पुरेसे ठरतील.
हा उपाय करण्याची सोपी पद्धत
सगळ्यात आधी आवळे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घ्या. नंतर एका भांड्यामध्ये पाणी गरम करा आणि त्यात आवळ्याचे तुकडे घाला. नंतर ८ ते १० मिनिटं उकळवून घ्या. जोपर्यंत पाण्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत उकळवा. गॅस बंद करून पाणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. हे पाणी स्काल्प आणि केसांच्या मुळांना हलक्या हातानं लावून व्यवस्थित मसाज करा. नंतर केसांवर पुन्हा पाणी घाला. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यानं केसांना बरेच फायदे मिळतील.
हा उपाय बराच फायदेशीर ठरतो. सुकलेल्या आवळ्यात व्हिटामीन सी, एंटी ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होण्यास मदत होते. कमी वयात केस पांढरे होण्याचं कारण म्हणजे केसांना योग्य पोषण न मिळणं पण तुम्हाला काळजी करण्याचं काही कारण नाही. सुका आवळा केसांना केसांना अनेक पोषक तत्व देतो ज्यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो.
केस वेळेआधी पांढरे होणार नाहीत
आवळ्याचा हा उपाय मेलेनिन पिगमेंटला पुरक ठरतो. ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास मदत होते. याशिवाय सुक्या आवळ्याचा हा उपाय केमिकल फ्री, तसंच सोपा आहे.
रश्मिका मंदाना चेहऱ्याला असं लावते तरी काय? पाहा, तिच्या तेजस्वी-तजेलदार चेहऱ्याचं गुपीत...
केसांना नैसर्गिक चमक आणि मजबूती
जेव्हा तुम्ही या उपायाचा नियमित वापर करता तेव्हा केसांमध्ये प्राकृतिक चमक आणि सॉफ्टनेस येतो. केसांची चमक वाढवण्याासठी हा चांगला पर्याय ठरू शकतो. केसांची व्यवस्थित काळजी घेतल्यास तुम्ही केसांची चमक कायम टिकवून ठेवू शकता.
