Join us  

घामोळे झाले? खाज येते? ३ उपाय- घामोळ्यांनी त्रस्त असाल तर मिळेल त्वरित आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2024 12:14 PM

Home Remedies For Rash Due to Sweating In Summer: घामोळे आल्यामुळे खूपच आग- आग होत असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा...

ठळक मुद्दे हा त्रास वाढू द्यायचा नसेल आणि लवकर कमी करायचा असेल तर काही घरगुती उपाय लगेचच करा.

उन्हाळ्याच्या दिवसांत खूप जास्त घाम येतो. अंगातली उष्णताही खूप जास्त वाढलेली असते. त्यामुळे मग या दिवसांत घाम आणि उष्णता या दोन्हींमुळे घामोळे येण्याचा त्रास अनेकजणांना होतो. खासकरून मानेला, गळ्याभोवती, काखेत, पाठीवर अशा ठिकाणी जास्त प्रमाणात घामोळ्या येतात. त्यांना भयंकर खाज येते. बऱ्याच जणांना तर खाजवल्यामुळे जखमाही होतात आणि तो त्रास जास्तच वाढत जातो (home remedies for rash due to sweating in summer). म्हणूनच हा त्रास वाढू द्यायचा नसेल आणि लवकर कमी करायचा असेल तर काही घरगुती उपाय लगेचच करा. यामुळे अंगावरचे पुरळ कमी होऊन त्याठिकाणी थंड वाटेल. (how to get rid of ghamole in marathi)

घामोळे आले असल्यास घरगुती उपाय 

 

१. चंदन

चंदन अतिशय शीतल, थंड असते. त्यामुळे चंदनाचा लेप अंगावरचे घामोळे कमी करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरतो.

उष्माघातामुळे तुमच्यासमोर अचानक कोणाला भोवळ आली तर? ५ गोष्टी तातडीने करा, डॉक्टर सांगतात...

हा उपाय करण्यासाठी चंदन पावडर एका वाटीत घ्या आणि त्यात थोडे गुलाबपाणी टाकून ती कालवून घ्या. आता हा लेप जिथे घामोळे आले आहेत, त्याठिकाणी लावा आणि १० ते १५ मिनिटांनी धुवून टाका. पुसण्यासाठी एखादा मऊ, सुती कपडा वापरा.

 

२. काकडीच्या फोडी

काकडीमध्ये पाणी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे काकडीचे काप करा आणि ते घामोळे आले आहेत त्या ठिकाणी ठेवून द्या. काकडीचा गर काढून तो थेट घामोळ्यांवर लावण्याचा उपायही तुम्ही करू शकता.

अरे बापरे.. एक प्लेट पाणीपुरी चक्क ३३३ रुपयांना! असं आहे काय त्यात? बघा व्हायरल पोस्ट 

यामुळेही त्या जागेवर होणारी जळजळ, खाज लगेच कमी होईल.

 

३. कैरी

कैरीच्या गराचाही खूप चांगला उपयोग घामोळ्यांचा त्रास कमी करण्यासाठी करता येतो.

प्रत्येक गृहिणीला माहिती असाव्याच अशा ७ सुपरस्मार्ट किचन टिप्स- काम होईल एकदम सोपं- झटपट

हा उपाय करण्यासाठी कैरी उकडून घ्या किंवा गॅसवर भाजून घ्या. यानंतर कैरीचा आतला जो मऊ झालेला गर असेल तो घामोळ्यांवर चोळा. १० ते १५ मिनिटांनी धुवून टाका. यामुळेही घामोळ्यांचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशलहोम रेमेडी