lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Beauty > कांद्याच्या रसामध्ये टाका फक्त ३ पदार्थ, केसांचं गळणं थांबून झटपट वाढतील- दाट होतील

कांद्याच्या रसामध्ये टाका फक्त ३ पदार्थ, केसांचं गळणं थांबून झटपट वाढतील- दाट होतील

Home Remedies For Getting Thick, Long And Healthy Hair: केस खूप गळत असतील किंवा केसांना अजिबातच वाढ नसेल, तर हा एक घरगुती उपाय करून पाहा.. (How to use onion juice for hair growth)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2024 11:19 AM2024-02-20T11:19:51+5:302024-02-20T11:20:34+5:30

Home Remedies For Getting Thick, Long And Healthy Hair: केस खूप गळत असतील किंवा केसांना अजिबातच वाढ नसेल, तर हा एक घरगुती उपाय करून पाहा.. (How to use onion juice for hair growth)

Home remedies for getting thick, long and healthy hair, How to use onion juice for hair growth, How to get rid of hair fall | कांद्याच्या रसामध्ये टाका फक्त ३ पदार्थ, केसांचं गळणं थांबून झटपट वाढतील- दाट होतील

कांद्याच्या रसामध्ये टाका फक्त ३ पदार्थ, केसांचं गळणं थांबून झटपट वाढतील- दाट होतील

Highlightsहा उपाय केल्यामुळे केसांची मुळं पक्की होऊन केस गळणं कमी होईल तसेच केसांची वाढही झटपट होईल. 

हल्ली कोणाचे केस खूप गळत आहेत, तर कुणाच्या केसांना अजिबातच वाढ नाही. कुणाचे केस खूपच राठ आहेत तर कुणी डोक्यातल्या कोंड्यामुळे हैराण आहेत. अशी केसांच्या बाबतीत प्रत्येकाची काही ना काही समस्या आहेच. केसांचं गळणं कमी करायचं असेल तर केस मुळांपासून मजबूत करणं गरजेचं आहे. शिवाय त्यांना योग्य पोषण मिळालं, तर त्यांची वाढदेखील चांगली होईल (How to get rid of hair fall). म्हणूनच आता केसांच्या वाढीसाठी हा एक सोपा उपाय करून पाहा. केसांसाठी कांद्याचा रस चांगला असतो, हे तर आपल्याला माहितीच आहे (How to use onion juice for hair growth). पण त्यात जर आणखी काही पदार्थ घातले तर त्यामुळे कमी दिवसांतच खूप चांगला परिणाम दिसून येतो. (Home remedies for getting thick, long and healthy hair)

 

केस गळणं कमी करण्यासाठी कसा वापरावा कांद्याचा रस?

केस गळणं कमी करण्यासाठी तसेच केसांची चांगली वाढ व्हावी, यासाठी कांद्याचा रस कशा पद्धतीने वापरावा, याविषयीची माहिती indianbeautysecrets या पेजवर शेअर करण्यात आली आहे.

मांड्या खूपच जाडजूड दिसतात- हिप्स फॅट पण वाढले? शिल्पा शेट्टी सांगतेय १ सोपा व्यायाम 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला लाल कांद्याचा रस वापरायचा आहे. कारण इतर कांद्याच्या तुलनेत लाल रंगाच्या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे केसांना अधिक फायदा होतो.

सगळ्यात आधी तर कांदा मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घ्या. यानंतर ही पेस्ट गाळणीने गाळून घ्या आणि कांद्याचं पाणी एका वाटीत काढा.

 

साधारण पाव वाटी कांद्याचं पाणी असेल तर त्यात २ टेबलस्पून कॅस्टर ऑईल, व्हिटॅमिन ई च्या २ टॅबलेट्स आणि ५ ते ६ थेंब रोजमेरी इसेंशियल ऑईल घाला. हे सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून एकजीव करा.

वेल्वेटच्या काळ्या साडीचे सोनेरी काठ- गळ्यात मोत्यांची माळ, बघा आलिया भटची हटके स्टाईल

त्यानंतर कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण आता केसांच्या मुळाशी लावा. साधारण १ तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.

हा उपाय केल्यामुळे केसांची मुळं पक्की होऊन केस गळणं कमी होईल तसेच केसांची वाढही झटपट होईल. 

 

Web Title: Home remedies for getting thick, long and healthy hair, How to use onion juice for hair growth, How to get rid of hair fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.