Join us

चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, ॲक्ने होतील छुमंतर, बघा भाग्यश्री सांगतेय तरुण त्वचेसाठी ब्यूटी सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2024 14:55 IST

How To Get Rid Of Wrinkles Or Fine Lines: वय वाढलं तरी त्वचा मात्र तरुण, चमकदार ठेवायची असेल तर अभिनेत्री भाग्यश्री सांगते आहे तो उपाय करा... (home remedies for acne free young skin by actress Bhagyashree)

ठळक मुद्देएवढे जास्त फायदे देणारा आणि सेलिब्रिटींच्या अतिशय आवडीचा असणारा हा चकटफू उपाय आठवड्यातून एकदा करून पाहायला हरकत नाही. 

सध्या उन्हाचा पारा खूप वाढला आहे. वाढत्या उन्हामुळे बऱ्याचदा असं वाटतं की थंडगार, हवेशीर ठिकाणी जाऊन बसावं. थंड थंड पाणी अंगावर घ्यावं... अशा कडाक्याच्या उकाड्यात बर्फ, फ्रिज या गोष्टी अतिशय सुखकारक वाटू लागतात. भाग्यश्रीदेखील असाच काहीसा उपाय सांगते आहे. आपल्याला माहितीच आहे की ती सोशल मिडियावर खूप जास्त ॲक्टीव्ह असते आणि तिच्या चाहत्यांसोबत काही टिप्स शेअर करत असते. यावेळी तिने त्वचा तरुण ठेवण्यासाठी, त्वचेवरचे पिगमेंटेशन, ॲक्ने कमी करण्यासाठी आणि त्वचेवर सुरकुत्या येऊ नयेत, यासाठी एक मस्त थंडगार- गारेगार उपाय सुचवला आहे. (home remedies for acne free young skin by actress Bhagyashree)

 

तिच्या व्हिडिओवरुन असं दिसत आहे की ती सध्या काश्मिरला पर्यटनासाठी गेलेली आहे. तिथे एक छान स्वच्छ पाण्याचा खळाळता ओढा आहे. ती पाणी बर्फामधून आल्याने अर्थातच खूप जास्त थंडगार आहे.

रामनवमी विशेष: बघा कशी करायची रामलल्लाच्या आवडीची खीर, झटपट होणारा सोपा नैवेद्य

भाग्यश्री सरळ त्या पाण्याच्या दिशेने खाली वाकली आणि तिने काही सेकंदासाठी तिचा चेहरा पाण्यात बुडवला. एवढंच नाही तर तरुण सुंदर त्वचा पाहिजे असेल तर तुम्हीही हाच उपाय तुमच्या घरीही करू शकता, असंही ती म्हणते आहे. हा उपाय घरी करायचा म्हणजे आईस फेशियल करायचं. बर्फाचं जे थंडगार पाणी असेल ते एका पातेल्यात घ्यायचं आणि त्या गारेगार पाण्यात आपल्याला सहज सहन होऊ शकेल तेवढ्या सेकंदांसाठी चेहरा बुडवून ठेवायचा. 

 

आईस फेशियल करण्याचे फायदे 

हा उपाय मध्यंतरी आलिया भट हिनेही सांगितला होता. तिने तिचा आईस फेशियल करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता आणि तिच्या गुलाबी चमकदार त्वचेचं हेच सिक्रेट आहे, असंही ती म्हणाली होती.

रामनवमी विशेष नैवेद्याचे ५ गोड पदार्थ- करायला सोपे, अतिशय चवदार आणि झटपट होणारे

आता भाग्यश्रीदेखील तेच सांगते आहे. या उपायामुळे रक्ताभिसरण चांगलं होऊन त्वचेवर ग्लो येतो. पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन असा त्रास कमी होतो. स्किन टाईटनिंगसाठी मदत होते आणि त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचं प्रमाण खूप कमी होतं. एवढे जास्त फायदे देणारा आणि सेलिब्रिटींच्या अतिशय आवडीचा असणारा हा चकटफू उपाय आठवड्यातून एकदा करून पाहायला हरकत नाही. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीभाग्यश्री