त्वचेचं सौंदर्य, तारुण्य जास्त दिवस टिकून राहावं असं वाटत असेल तर तिची रोजच्या रोज काळजी घेणं गरजेचं आहे. त्वचेची काळजी घेतली नाही तर मग टॅनिंग, डेडस्किन, पिंपल्स, पिगमेंटेशन यांचं प्रमाण वाढत जातं आणि त्वचा खूपच रापलेली, काळवंडलेली दिसू लागते. पण प्रत्येकीलाच पार्लरमध्ये जायला वेळ मिळेल असं नाही. म्हणूनच अशा सगळ्या जणींसाठी हा एक सोपा उपाय.. हा उपाय करायला अतिशय सोपा आहे. यासाठी तुम्हाला अजिबात खूप वेळ काढण्याची गरज नाही. फक्त आंघोळ झाल्यानंतर काही सेकंदाचा वेळ स्वत:ला द्या आणि चेहऱ्याला पुढे सांगितल्याप्रमाणे एक खास पाणी लावा..(home made toner for maintaining skin tightness) नियमितपणे हा उपाय केल्यास अवघ्या काही दिवसांतच त्वचेमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल. (how to get youthful skin)
त्वचेवरची चमक टिकवून ठेवण्यासाठी उपाय
हा उपाय करण्यासाठी आपण घरच्याघरी एक टोनर तयार करणार आहोत. ज्या काही महत्त्वाच्या स्किन केअर टिप्स असतात त्यामध्ये त्वचेचं टोनिंग होणं खूप गरजेचं असतं. त्वचेचं नियमितपणे टोनिंग केल्यास त्वचेचा टाईटनेट टिकून राहातो. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाणही कमी होतं.
डाेक्यावरचे केस गळाल्याने कपाळ खूप मोठं दिसतं? जास्वंदाच्या पानाफुलांचा हा उपाय- केस वाढतील भराभर
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे गुलाब पाणी, १ चमचा ॲलोव्हेरा जेल, २ चमचे काकडीचा गाळून घेतलेला रस आणि दाेन चमचे थंड झालेला ग्रीन टी घ्या. हे मिश्रण व्यवस्थित हलवून एकत्र करा आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. त्या बाटलीमध्येच केशराच्या ४ ते ५ काड्याही टाका. हे झालं तुमचं घरगुती टोनर तयार.
घरी तयार केलेल्या टोनरच कसा वापर करायचा
वरील पद्धतीने तुम्ही जे टोनर तयार केलेलं आहे ते दिवसातून १ किंवा २ वेळा तुमच्या चेहऱ्यावर लावा. आंघोळ झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पुसून घ्या आणि स्प्रे बॉटलने टोनर तुमच्या चेहऱ्यावर शिंपडून घ्या.
उरलेल्या पोळ्यांचा कुस्करा वातड होतो? खमंग कुस्करा करण्याची घ्या रेसिपी- पाहता पाहताच फस्त होईल
यानंतर १ ते २ मिनिटांचा वेळ जाऊ द्या. टोनर त्वचेवर सेट होऊ द्या आणि त्यानंतर त्वचेला मॉईश्चराईज करा. रात्री झोपण्यापुर्वी चेहरा धुवूनही तुम्ही हा उपाय करू शकता. काही दिवसांतच त्वचेमध्ये खूप छान बदल झालेला दिसून येईल. हे टोनर एकदा तयार करून फ्रिजमध्ये ठेवल्यास ते तुम्ही ८ दिवस वापरू शकता.