त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली तर त्वचेचे तारुण्य जास्त दिवस टिकून राहण्यास नक्कीच मदत होते. आता व्यवस्थित काळजी घ्यायची म्हणजे त्यासाठी खूप काही महागड्या गोष्टी करायच्या असं मुळीच नाही. काही साधे सोपे घरगुती उपाय जरी केले तरी त्वचेचा ग्लो दिवसेंदिवस वाढू शकतो. त्वचेवर अकाली सुरकुत्या येणं कमी होऊ शकतं, तसेच पिगमेंटेशन, पिंपल्स याचाही त्रास कमी होऊ शकतो (How to Reduce Wrinkles and Fine Lines?). असेच सगळे फायदे देऊन त्वचेला नॅचरली बोटोक्स ट्रिटमेंट देणारा एक सोपा घरगुती उपाय पाहूया...(home hacks to get young skin and to get rid of wrinkles and fine lines)
त्वचेवर अकाली येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय
हा उपाय करण्यासाठी आपल्याला साधारण १ टेबलस्पून एवढ्या लवंग लागणार आहेत. या लवंग एका काचेच्या बरणीमध्ये ठेवा. त्यामध्ये ३ टेबलस्पून बेबी ऑइल घाला. आता त्यामध्ये २ चमचे एलोवेरा जेल, १ चमचा रोज वॉटर, अर्धा चमचा ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन बी ची एक कॅप्सूल घाला.
हनुवटीवर अचानकच केस वाढू लागले? ३ चुका टाळा, केस येणं आपोआप बंद होईल
आता हे सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे थोडेसे तेल घेऊन चेहऱ्याला मसाज करा. यानंतर चेहरा धुऊन टाकण्याची गरज नाही. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास चेहऱ्यावर खूप छान परिणाम दिसून येईल आणि त्वचेवरच्या बारीक सुरकुत्या कमी होतील.
हा उपायही करून बघा
असं म्हणतात की एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑईल हे बोटॉक्स ट्रीटमेंट घेण्याचा सगळ्यात सोपा आणि स्वस्त उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी ४ ते ५ थेंब एरंडेल तेल आणि तेवढेच खोबरेल तेल एकत्र करा.
डोक्यात कोंडा अजिबात होणार नाही, महिन्यातून फक्त एकदा ' या ' पद्धतीने केस धुवा, कोंडा गायब
आता हे तेल चेहऱ्याला लावून त्याने हलक्या हाताने चेहऱ्याला मालिश करा. हा उपाय केल्यास त्वचेवरच्या बारीक सुरकुत्या कमी होतात.
Web Summary : Fight wrinkles with this simple homemade oil. Clove, baby oil, aloe vera, rosewater, glycerin, and vitamin E combine for a natural Botox effect. Massage nightly for youthful, glowing skin. Erand oil and coconut oil mix also reduces wrinkles.
Web Summary : इस आसान घरेलू तेल से झुर्रियों से लड़ें। लौंग, बेबी ऑयल, एलोवेरा, गुलाब जल, ग्लिसरीन और विटामिन ई मिलकर प्राकृतिक बोटोक्स प्रभाव पैदा करते हैं। युवा, दमकती त्वचा के लिए रात को मालिश करें। एरंड तेल और नारियल तेल का मिश्रण भी झुर्रियाँ कम करता है।