काही अपवाद सोडले तर बहुतांश महिला अगदी नियमितपणे आयब्रोज करतात. कारण त्यामुळे चेहरा लगेचच स्वच्छ, रेखीव दिसू लागतो. चेहऱ्याला लगेच छान आकार आल्यासारखा वाटतो आणि चेहरा लगेचच फ्रेश दिसू लागतो. त्यामुळे बाकी कोणत्या ब्यूटी ट्रिटमेंट्स नाही केल्या तरी अगदी नियमितपणे फक्त आयब्रोज करणाऱ्या महिलांची संख्या खूप आहे. पण काही जणींना आयब्रोज केल्यानंतर खूप त्रास होतो. भुवयांच्या आजुबाजुची त्वचा लगेचच सुजल्यासारखी होते आणि लालेलाल होऊन जाते. शिवाय खूप जळजळ होते. हा त्रास कमी करण्यासाठी पुढे सांगितलेले काही उपाय नक्कीच उपयोगी ठरू शकतात.(home hacks to to get relief from irritation and redness around eyebrows after threading)
आयब्रोज केल्यानंतर चेहरा लाल होऊन सुजू नये म्हणून उपाय
१. ॲलोव्हेरा जेल
भुवयांच्या आजुबाजुची त्वचा खूप नाजूक असते त्यामुळे ती लगेचच सुजते. अशावेळी त्याठिकाणी ॲलोव्हेरा जेल लावणं फायद्याचं ठरू शकतं. कोरफडीचा थंडपणा जळजळ होणाऱ्या त्वचेला लगेच शांत करतो. त्यामुळे आयब्रोज केल्यानंतर लगेचच त्याठिकाणी ॲलोव्हेरा जेल लावा.
१० दिवसांत दिसाल १० वर्षांनी तरुण, ‘हे’ घरगुती तेल म्हणजे तारुण्याचं वरदान- चेहऱ्यावर जादू
२. बर्फ
दुसरा उपाय म्हणजे बर्फ. बर्फाचा थंडावा देखील जळजळणाऱ्या त्वचेला शांत करू शकतो. तसेच भुवयांच्या आसपास बर्फ लावण्याचा आणखी एक फायदा म्हणजे त्या ठिकाणी सूज येत नाही. त्यामुळे जेवढ्यावेळ सहन होईल तेवढाच वेळ भुवयांच्या आजुबाजुला बर्फ फिरवा. बरं वाटेल.
३. चंदनाचा लेप
आपल्याला माहितीच आहे चंदनामध्ये शितलता असते. त्यामुळे चंदनाचा लेपही तुमच्या भुवयांच्या भाेवती होणारी जळजळ कमी करण्यासाठी मदत करू शकतो.
Valentines Day 2026 : ‘ती’ तुम्हाला हो म्हणेलच, द्या ही हार्टशेप अंगठी- प्रेमात पाडणारी सुंदर भेट
बाजारात विकत मिळणारी चंदनाची पेस्ट लावण्यापेक्षा चंदनाचे खोड सहानीवर उगाळून त्याचा लेप लावल्यास अधिक चांगले.
