कित्येक जणी अशा असतात की त्यांच्या चेहऱ्यावर कायम पिंपल्स असतात. मासिक पाळी जवळ आल्यानंतर शरीरातले हार्मोन्स बदलतात. त्यामुळे हा त्रास जाणवतो. पण काही जणींचा चेहरा मात्र कायम पिंपल्सने भरलेलाच दिसतो. पिंपल्स जातात आणि त्यांचे डाग नंतर चेहऱ्यावर २ ते ३ महिने तसेच राहतात. पिंपल्स आणि पिगमेंटेशन वाढणे निश्चितच सौंदर्यासाठी मारक ठरते. म्हणूनच आता पिंपल्स घालविण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा. हा उपाय केल्याने तुमचं शरीर डिटॉक्स होईल (home hacks to get rid of pimples). शरीर आतून स्वच्छ झालं की त्याचा चांगला परिणाम आपोआपच त्वचेवरच दिसून येतो आणि पिंपल्स कमी होतात.(how to reduce pimples and pigmentation?)
चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यासाठी काय उपाय करावा?
चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करून त्वचेवर नॅचरल ग्लो यावा यासाठी नेमका काय उपाय करायला पाहिजे याची माहिती beautybychitwan या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये जो उपाय सांगितला आहे तो सुरुवातीला काही दिवस करून पाहा. जर काही त्रास झाला नाही तर हा उपाय तुम्ही नेहमीच करू शकता.
हा उपाय करण्यासाठी १ काकडी घ्या. दुधी भोपळ्याच्या साली काढून त्याचे १ वाटीभर बारीक काप करून घ्या.
दसरा स्पेशल: फक्त झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं घेऊन काढा सुंदर रांगाेळी, ७ सोप्या डिझाईन्स..
१ आवळा, अर्धा इंच आल्याचा तुकडा, पुदिन्याची ७ ते ८ पाने आणि १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा मोरिंग पावडर असे साहित्यही आपल्याला लागणार आहे.
भोपळा, काकडी, आलं, मोरिंग पावडर, पुदिन्याची पानं असं सगळं मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या.
गाळणीने हे मिश्रण गाळून घ्या. त्यानंतर त्यात पाणी घाला. सगळ्यात शेवटी त्यामध्ये लिंबू पिळा आणि सकाळी रिकाम्या पोटी हा ज्यूस प्या.
आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा रस प्या. भोपळा, काकडी या सगळ्याच पौष्टिक पदार्थांचा खूप चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर तर दिसून येईलच, पण आरोग्यासाठीही हा ज्यूस खूप फायदेशीर ठरेल.