डोळे आणि भुवया या दोन गोष्टी आपल्या चेहऱ्यामध्ये खूप बदल घडवून आणतात. आता डोळ्यांचा आकार कसा असावा, ही तर निसर्गाची देण. त्यात आपण काहीही बदल करू शकत नाही. पण भुवया मात्र आपण आपल्या आवडीने रेखीव करून घेऊ शकतो. पण काही जणींच्या भुवया मात्र अगदी बारीक, पातळ असतात. त्यामुळे त्या फारशा उठून दिसत नाहीत. आता आयब्रो पेन्सिल हा एक पर्याय आहे. पण त्यामुळे भुवया कृत्रिम वाटतात. म्हणूनच नैसर्गिकपणेच भुवयांचे केस वाढण्यासाठी पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा (how to get thick eyebrows?). हे उपाय केल्यामुळे विरळ असणाऱ्या भुवया छान दाट, काळ्याभोर होतील आणि त्यांना तुम्हाला हवा तसा रेखीव आकार देता येईल.(Home Hacks for Thick Eyebrows)
भुवया जाड, दाट होण्यासाठी घरगुती उपाय
१. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे कॅस्टर ऑईल. रात्री झोपण्यापुर्वी दोन थेंब कॅस्टर ऑईल तुमच्या हातावर घ्या. त्यामध्ये १ ते २ थेंब रोजमेरी तेल घाला. ही दोन्ही तेलं व्यवस्थित एकत्र करा आणि ती भुवयांना लावा. बोटाच्या टोकाने भुवयांवर, आजुबाजुला मालिश करा. यामुळे भुवयांवर नवे केस उगविण्यास निश्चितच मदत होईल.
तुम्ही स्वत:च ‘या’ पद्धतीने घरीच तयार करा केस गळणं ताबडतोब थांबवणारा शाम्पू, ३० दिवसांत पाहा फरक
२. व्हिटॅमिन ई कॅप्सूल फोडून घ्या. त्यामध्ये थोडं बदाम तेल घाला. या दोन्हींच्या मिश्रणाने आठवड्यातून ४ ते ५ वेळा भुवयांना मालिश करा. व्हिटॅमिन ई आणि बदाम तेल हे दोन्ही केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात.
३. कांद्याचा रस काढून घ्या. त्यात थोडं खोबरेल तेल घालून त्याने भुवयांना मालिश करा. कांद्यामध्ये असणारं सल्फर केसांची वाढ होण्यासाठी मदत करतं. पण हा उपाय करताना डोळ्यातून बरंच पाणी येऊ शकतं. त्यामुळे ते सहन झालं तरच हा उपाय करावा.
टरबूज घेता, पण ते पांचट निघतं? रसाळ, गोड टरबूजावर ‘या’ खुणा नक्की दिसतील, पाहून खरेदी करा
४. ताजा कोरफडीचा गर काढून घ्या आणि तो देखील आठवड्यातून ३ ते ४ वेळा भुवयांना लावा. यामुळेही भुवया छान दाट, जाड होतील.
