Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > १० मिनिटांत सोन्यासारखा उजळून निघेल चेहरा, चमचाभर मध 'असे' चेहऱ्यावर चोळा- टॅनिंग गायब 

१० मिनिटांत सोन्यासारखा उजळून निघेल चेहरा, चमचाभर मध 'असे' चेहऱ्यावर चोळा- टॅनिंग गायब 

Home Hacks for Instant Glowing Skin: त्वचेवरचं टॅनिंग कमी करून चेहऱ्यावर छान इंस्टंट ग्लो हवा असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा..(how to use honey for instant glowing skin?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2026 16:10 IST2026-02-05T16:09:44+5:302026-02-05T16:10:34+5:30

Home Hacks for Instant Glowing Skin: त्वचेवरचं टॅनिंग कमी करून चेहऱ्यावर छान इंस्टंट ग्लो हवा असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा..(how to use honey for instant glowing skin?)

home hacks for instant glowing skin, how to use honey for instant glowing skin, how to remove tanning and get instant glow  | १० मिनिटांत सोन्यासारखा उजळून निघेल चेहरा, चमचाभर मध 'असे' चेहऱ्यावर चोळा- टॅनिंग गायब 

१० मिनिटांत सोन्यासारखा उजळून निघेल चेहरा, चमचाभर मध 'असे' चेहऱ्यावर चोळा- टॅनिंग गायब 

आता लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. लग्न म्हटलं की त्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम असतातच. कार्यक्रमाच्या आधी प्रत्येकवेळी पार्लरमध्ये जाणं होतंच असं नाही. त्यामुळे मग टॅन झालेली त्वचा स्वच्छ, नितळ, उजळ दिसण्यासाठी काही उपाय घरच्याघरी अगदी कमीतकमी वेळात करता येतात. शिवाय हे उपाय करण्यासाठी काहीही खर्च लागत नाही (how to remove tanning and get instant glow?). त्यापैकी काही सोपे उपाय आपण पाहूया (Home Hacks for Instant Glowing Skin).. पार्लरमध्ये जायला वेळ मिळाला नाही तर अगदी १० मिनिटांत इंस्टंट ग्लो मिळविण्यासाठी या ब्यूटी ट्रिटमेंट्स नक्कीच उपयोगी ठरू शकतात.(how to use honey for instant glowing skin?)

 

१० मिनिटांत चेहऱ्यावर ग्लो आणणारा इंस्टंट उपाय 

१. हा उपाय करण्यासाठी आपल्याला मधाचा वापर तर करायचाच आहे पण त्यासोबतच एक खास पदार्थही घ्यायचा आहे. हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये चमचाभर मध घ्या.

दाट केसांसाठी सोपा उपाय- फक्त १ कांदा 'या' पद्धतीने लावा, ३० दिवसांत नवे केस उगवतील

त्या मधामध्ये १ चमचा अगदी बारीक वाटलेला गूळ घाला. गूळ आणि मध व्यवस्थित एकत्र करा. त्यानंतर चेहरा थोडा ओलसर करून घ्या. आता हा लेप चेहऱ्याला लावा. १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. बघा त्वचेमध्ये खूप छान बदल जाणवेल.

 

२. दुसरा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा मध घाला. त्यामध्ये १ चमचा दही घाला आणि १ चमचा लिंबाचा रस घाला. या मिश्रणाला आणखी जास्त इफेक्टीव्ह करण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर हळदही घाला.

फक्त ५०० रुपयांत घराला द्या लक्झरी लूक, 'हा' सोपा उपाय करा- घरात वाटेल फ्रेश, प्रसन्न

आता चेहरा थोडा ओलसर करून घ्या आणि मग हा लेप चेहऱ्याला लावा. त्यानंतर हलक्या हाताने त्वचेला थोडी मालिश करा. १० मिनिटांनी लेप थोडा सुकल्यासारखा झाला की मग चेहरा धुवून घ्या. टॅनिंग कमी होऊन त्वचेवर इंस्टंट ग्लो आलेला असेल. 

 

Web Title : 10 मिनट में शहद से पाएं सोने जैसा निखार, टैनिंग होगी गायब।

Web Summary : शहद के सरल घरेलू उपचारों से टैन त्वचा को तुरंत निखारें। शहद को गुड़ या दही और नींबू के साथ मिलाकर तुरंत चमक पाएं। ये उपचार पार्लर के सुविधाजनक विकल्प हैं।

Web Title : Get radiant skin in 10 minutes with honey face masks.

Web Summary : Quickly brighten tanned skin with simple homemade honey remedies. Combine honey with jaggery or yogurt and lemon for an instant glow. These treatments offer a convenient alternative to parlors.