बऱ्याचदा असं होतं की त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन वाढायला लागतं. कारण आपल्याला त्वचेची पुरेशी काळजी घ्यायला तेवढा वेळच मिळत नाही. त्यामुळे मग त्वचा काळवंडून गेल्यासारखी, रापलेली दिसते. अशावेळी त्वचेचं हरवलेलं सौंदर्य पुन्हा मिळविण्यासाठी एक खूप सोपा उपाय अगदी घरच्याघरी करता येतो (besan face mask for instant glowing skin). हा उपाय नेमका कसा करायचा आणि त्यासाठी कोणतं घरगुती साहित्य वापरायचं ते पाहूया..(home hacks for instant glowing skin)
त्वचेवर ग्लो येण्यासाठी घरगुती उपाय
आपल्याकडे सौंदर्य खुलविण्यासाठी खूप आधीपासूनच बेसन पिठाचा वापर केला जातो. त्याचाच वापर करून आता आपण एक खास उपाय करणार आहोत.
केसांना 'या' पद्धतीने लावा मोहरीचं तेल, म्हातारपणीही केस राहतील लांब-काळेभोर-दाट
हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ ते दिड चमचा बेसन घ्या. त्यामध्ये १ चमचा दही आणि १ चमचा मध घाला.
त्यानंतर लिंबाच्या ताज्या रसाचे ५ ते ६ थेंब आणि चिमूटभर हळद घाला. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी या मिश्रणामध्ये ग्लिसरीन किंवा बदाम तेलाचे ४ ते ५ थेंब घालावे.
ऊन तापू लागताच भूक कमी झाली, करा १० मिनिटांत टोमॅटोची चटणी- चमचमीत चटणी भाजीपेक्षा भारी
आता हा लेप चेहऱ्याला लावा. त्यानंतर १० ते १२ मिनिटांनी लेप थोडा सुकला की हळुवारपणे चोळून काढून टाका. लेप काढताना चेहऱ्याला गोलाकार मसाज करा. त्यानंतर चेहरा धुवून छान मॉईश्चराईज करा. त्वचेमध्ये खूप छान बदल जाणवेल.
Web Summary : Reclaim your skin's beauty with this simple home remedy. Mix besan, yogurt, honey, lemon juice, and turmeric. Apply, massage gently after 10-12 minutes, and moisturize. See the difference!
Web Summary : इस आसान घरेलू उपाय से अपनी त्वचा की सुंदरता वापस पाएं। बेसन, दही, शहद, नींबू का रस और हल्दी मिलाएं। लगाएं, 10-12 मिनट बाद धीरे से मालिश करें और मॉइस्चराइज़ करें। फर्क देखें!