त्वचेची पुरेशी काळजी घेणं झालं नाही तर मग आपोआपच तिच्यावर डेडस्किन, टॅनिंग व्हायला लागतं. त्यामुळे मग त्वचा काळवंडून जाते. शिवाय चेहराही रापलेला, रखरखीत दिसू लागतो. म्हणूनच त्वचेचं सौंदर्य जर खुलवायचं असेल तर काही घरगुती पदार्थ नक्कीच उपयोगी येऊ शकतात. त्या पदार्थांमुळे टॅनिंग, डेडस्किन जाऊन त्वचेवर छान चमकही येते. त्या पदार्थांपैकीच एक आहे कॉफी. कॉफीमध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स आणि इतर घटक त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करतात आणि शिवाय त्वचेवर छान ग्लो आणतात (how to use coffee powder for glowing skin?). ॲण्टीऑक्सिडंट्समुळे स्किन रिपेअरिंगचे कामही खूप जलद आणि उत्तम होते (home hacks for glowing skin). त्यामुळे आठवड्यातून एकदा कॉफीचा पुढे सांगितलेल्या पद्धतीने उपयोग करून पाहा.(use of coffee for removing tanning and dead skin)
टॅनिंग, डेडस्किन काढून त्वचेवर छान चमक येण्यासाठी कॉफीचा उपयोग कसा करावा?
१. सगळ्यात पहिल्यांदा तर एका वाटीमध्ये १ चमचा कॉफी पावडर घ्या. त्यामध्ये २ चमचे दही घाला. दही आणि कॉफी व्यवस्थित एकत्र करा.
टाइमलेस ब्यूटी-वर्षानूवर्षे नवीकोरी चमकत राहील शिफाॅन साडी, फक्त लक्षात ठेवा ३ सोप्या गोष्टी
आता हा लेप चेहऱ्याला लावा आणि ५ ते ६ मिनिटे हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने त्वचेला मालिश करा. यामुळे त्वचेवरची सगळी धूळ, ड्राय स्किन, डेड स्किन, टॅनिंग कमी होण्यास मदत होईल. यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका.
२. आता पुढील उपाय करण्यासाठी आपल्याला कॉफीचा फेसमास्क तयार करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा कॉफी पावडर घ्या. त्यामध्ये चिमूटभर हळद, १ चमचा गव्हाचं पीठ आणि १ चमचा कच्चं दूध घाला. हे सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करून घ्या.
महाशिवरात्री: इंस्टंट भाजणीच्या थालिपीठाची सोपी रेसिपी, पोटाला दमदार- ॲसिडीटी, अपचन मुळीच होणार नाही
आता हा लेप चेहऱ्यावर लावा. ७ ते ८ मिनिटे लेप चेहऱ्यावर तसाच राहू द्या. त्यानंतर तो हलक्या हाताने चोळून काढून टाका. यानंतर चेहरा धुवून व्यवस्थित मॉईश्चराईज करा. बघा तुम्हाला त्वचेमध्ये खूप छान बदल दिसून येईल. हा उपाय १५ दिवसांतून एकदा करायला हरकत नाही.
Web Summary : Coffee can remove tan and dead skin, revealing glowing skin. Mix coffee with yogurt for a scrub, or with turmeric, flour, and milk for a face mask. Use weekly for best results.
Web Summary : कॉफी टैन और डेड स्किन हटाकर निखरी त्वचा प्रदान करती है। स्क्रब के लिए कॉफी को दही के साथ मिलाएं, या फेस मास्क के लिए हल्दी, आटे और दूध के साथ। सर्वोत्तम परिणामों के लिए साप्ताहिक उपयोग करें।