केस गळण्याची समस्या दिवसेंदिवस खूप वाढत चालली आहे. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. जसं की आपल्या खााण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. त्यामुळे आहारात केसांसाठी गरजेच्या असणाऱ्या पौष्टिक घटकांची सातत्याने कमतरता असते. ऊन, धूळ, प्रदुषण यामुळेही केसांचं नुकसान होतं. अनेकांच्या घरी बोअरवेलचं पाणी असतं. त्यामुळेही केस गळण्याचं प्रमाण वाढतं. याशिवाय काही जणींना केसांवर कायम वेगवेगळ्या कॉस्मेटिक्सचा मारा करण्याची सवय असते. त्यामुळेही केस गळतात आणि त्यांची वाढ खुंटते. तुमच्या केसांच्या बाबतीतही असंच झालं असेल तर केसांची चांगली वाढ होण्यासाठी हा एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा (use of tulsi for long and strong hair). यामुळे केसांची मुळं पक्की होऊन केस दाट हाेण्यासही मदत होईल.(home hacks for fast hair growth)
केसांची चांगली वाढ होण्यासाठी घरगुती उपाय
आपल्या घरी इतर कोणती रोपं असो किंवा नसो पण तुळशीचं रोप मात्र हमखास असतं. तुळशीच्या रोपाला आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. आता तिच्या पानांचा वापर केसांसाठी कसा करून घ्यायचा ते पाहूया.. हा उपाय clumsy_sonaliiii या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
पावसाळ्यात बुटांचा कुबट घाणेरडा वास येतो? ३ उपाय- न धुता बुटांची दुर्गंधी जाईल एका झटक्यात
हा उपाय करण्यासाठी एका पातेल्यामध्ये १ वाटी पाणी घ्या. त्यामध्ये तुळशीची ८ ते १० पानं घाला. हे पाणी चांगलं उकळून घ्या आणि त्यानंतर ते गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. त्यामध्ये थोडं गुलाबजल घाला. त्यासाेबत व्हिटॅमिन ई कॅप्सूल घातली तर अधिक चांगलं. आता हे पाणी दिवसातून एकदा केसांच्या मुळाशी लावा आणि हलक्या हाताने मालिशय करा. केस धुण्याची गरज नाही. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास केस वाढण्यास मदत होऊ शकते.
हा उपायही करून पाहा..
कांद्याचा रसदेखील केसांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त ठरतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा हा उपायही करून पाहा. हा उपाय करण्यासाठी कांदा मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस काढून घ्या.
पावसाळ्यात अंगाला सारखी खाज येते- खाजवून जखमाही होतात? ५ उपाय- दरवर्षीचा त्रास गायब
तो गाळून घेतल्यानंतर त्यामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. आता हा रस केसांच्या मुळाशी लावा. त्यानंतर अर्धा ते पाऊण तासाने केस धुवून टाका. काही आठवडे नियमितपणे केल्यास केसांवर लवकरच खूप चांगला परिणाम दिसून येईल.