Lokmat Sakhi >Beauty > आधीच गळणाऱ्या केसांचं रंगांमुळे होईल जास्त नुकसान! म्हणूनच रंग खेळण्यापुर्वी 'ही' काळजी घ्याच..

आधीच गळणाऱ्या केसांचं रंगांमुळे होईल जास्त नुकसान! म्हणूनच रंग खेळण्यापुर्वी 'ही' काळजी घ्याच..

Holi Hair Care Tips, Holi 2025: रंग खेळताना (Rang Panchami) केसांंचं नुकसान होऊ नये म्हणून या काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी..(Best Ways to Protect Your Hair From Colours in Holi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2025 10:56 IST2025-03-11T09:13:25+5:302025-03-11T10:56:31+5:30

Holi Hair Care Tips, Holi 2025: रंग खेळताना (Rang Panchami) केसांंचं नुकसान होऊ नये म्हणून या काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी..(Best Ways to Protect Your Hair From Colours in Holi)

Holi Hair Care Tips, Best Ways to Protect Your Hair This Festival, Pre and Post Hair care tips for Holi!  | आधीच गळणाऱ्या केसांचं रंगांमुळे होईल जास्त नुकसान! म्हणूनच रंग खेळण्यापुर्वी 'ही' काळजी घ्याच..

आधीच गळणाऱ्या केसांचं रंगांमुळे होईल जास्त नुकसान! म्हणूनच रंग खेळण्यापुर्वी 'ही' काळजी घ्याच..

Highlights रंग खेळण्यापुर्वी आणि खेळतानाही केसांची कशी काळजी घ्यावी ते पाहूया...

रंगपंचमीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे (Holi Celebration in Maharashtra). त्यामुळे बाजारपेठाही सध्या वेगवेगळे रंग, पिचकाऱ्या यासारख्या गोष्टींनी सजलेल्या आहेत. आता केसांचं, त्वचेचं जास्त नुकसान नको म्हणून हर्बल रंग वापरण्याचे आपण ठरवले असले तरी समाेरची व्यक्ती आपल्याला कोणता रंग लावेल हे काही सांगताच येत नाही. त्या केमिकलयुक्त रंगामुळे केसांचंही नुकसान होऊच शकतं (Holi Festival 2025 News in Marathi). आधीच केस गळण्याचे, पांढरे होण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे (Holi Hair Care Tips). त्यात जर रंग खेळताना दुर्लक्ष झालं तर केसांचं जास्त नुकसान होऊ शकतं (Best Ways to Protect Your Hair This Festival). म्हणूनच रंग खेळण्यापुर्वी आणि खेळतानाही केसांची कशी काळजी घ्यावी ते पाहूया...(Pre and Post Hair care tips for Holi)

 

रंग खेळताना केसांची कशी काळजी घ्यावी?

१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रंग खेळण्यापुर्वी केसांकडे थोडं विशेष लक्ष द्या. म्हणजेच रंग खेळायला जाण्यापुर्वी केसांना तेल लावणं खूप गरजेचं आहे. नेहमीपेक्षा थोडं जास्त तेल लावलं तरी चालेल. शिवाय केसाच्या मुळांपासून ते अगदी शेवटच्या टोकापर्यंत सगळीकडे व्यवस्थित तेल लागेल याची काळजी घ्या. यामुळे कोणताही रंग थेट तुमच्या केसांपर्यंत जात नाही.

चणे, राजमा भिजत घालायला विसरलात? घ्या सोपी ट्रिक- २ तासांत मऊसूत होईल कडधान्य 

२. केस मोकळे सोडून रंग खेळणं टाळा. यामुळे केसांमध्ये खूप रंग अडकून बसतो. त्यामुळे वेणी किंवा घट्ट अंबाडा घालूनच रंग खेळा.

३. रंग खेळताना जास्त उन्हात उभं राहाणं टाळा. ऊन आणि केमिकलयुक्त रंग यामुळे केसांचं जास्त नुकसान होऊ शकतं.

 

४. रंग खेळताना आपल्या डोक्यात कोणीतरी रंग टाकला आहे हे लक्षात आलं की लगेचच डोक्यावर पाणी ओता. यामुळे ओलसर रंग डोक्यातून लगेच निघून जाईल. तो केसांवर किंवा डाेक्याच्या त्वचेवर परिणाम करू शकणार नाही.

माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेनेंनी दिल्या स्किन केअर टिप्स, म्हणाले उन्हाळ्यात त्वचा चांगली ठेवण्यासाठी.

५. रंग खेळल्यानंतर केस धुताना केसांवर खूप जास्त शाम्पूचा मारा करू नका. केसांवर पाणी ओतून जास्तीतजास्त रंग काढून टाकण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर शाम्पू लावा.

६. तसेच केस धुतल्यानंतर त्यांना अवश्य कंडिशनर लावा. जर केसांना रंगामुळे खूप जास्त कोरडेपणा आला असेल तर अशावेळी केसांना काही वेळ कोरफडीचा गर लावून ठेवा आणि त्यानंतर केस धुवा. केस मऊ होतील. 
 

Web Title: Holi Hair Care Tips, Best Ways to Protect Your Hair This Festival, Pre and Post Hair care tips for Holi! 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.