Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > रंग खेळताना 'असे' कपडे चुकूनही घालू नका, चारचौघांत आरपार फजिती होऊन रंगाचा होईल बेरंग

रंग खेळताना 'असे' कपडे चुकूनही घालू नका, चारचौघांत आरपार फजिती होऊन रंगाचा होईल बेरंग

Holi Celebration 2026: रंग खेळताना कपड्यांच्या बाबतीत काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी...(which types of clothes should be avoid for holi celebration?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2026 16:07 IST2026-03-02T16:07:01+5:302026-03-02T16:07:35+5:30

Holi Celebration 2026: रंग खेळताना कपड्यांच्या बाबतीत काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी...(which types of clothes should be avoid for holi celebration?)

Holi celebration 2026, how to wear clothes for holi celebration, which types of clothes should be avoid for holi celebration  | रंग खेळताना 'असे' कपडे चुकूनही घालू नका, चारचौघांत आरपार फजिती होऊन रंगाचा होईल बेरंग

रंग खेळताना 'असे' कपडे चुकूनही घालू नका, चारचौघांत आरपार फजिती होऊन रंगाचा होईल बेरंग

Highlightsहोळीला घरातले जुने कपडे घालायचे असतील तर जरुर घाला. पण ते खूप जीर्ण झालेले नको.

होळीच्या सणाची गोष्टच वेगळी असते. एरवी कोणताही सण आला की आपण नवनविन कपडे घालून छान तयार होतो. नटतो- सजतो. पण होळीच्या सणाला मात्र असं काहीच नसतं. रंग खेळायचा असला की घरात जितके जुने कपडे असतात तितके ते जास्त घातले जातात. कधी कधी तर होळीला घालण्यासाठी म्हणून जुने कपडे आवर्जून बाजुला ठेवले जातात. पण असे जुने कपडे घालण्यापुर्वी थोडा शांतपणे विचार करा आणि आपण निवडलेले कपडे खरंच रंग खेळण्यासाठी योग्य आहेत का हे तपासून पाहा (how to wear clothes for holi celebration?). कारण रंगात खेळताना, पाण्यात भिजल्यावर चारचौघांत आपली फजिती व्हायला नको.(which types of clothes should be avoid for holi celebration?)

 

रंग खेळताना कसे कपडे घालावे?

१. होळीला घरातले जुने कपडे घालायचे असतील तर जरुर घाला. पण ते खूप जीर्ण झालेले नको. कारण रंग खेळताना एकमेकांना पकडलं जातं, ओढून बळजबरीने रंग लावला जातो. असं सगळं होत असताना तुमचे कपडे जर खूप जीर्ण असतील तर ते फाटण्याची शक्यताही असते.

खूप तहान लागते- विसराळूपणाही वाढला? तुम्हाला असू शकतो 'हा' आजार, जगणं विस्कटणारा त्रास

२. अतिशय पातळ फॅब्रिक असणारे कपडे रंग खेळताना घालू नका. कारण यादिवशी एकमेकांवर ओला रंग टाकला जातो. अंगावर पाणी ओतलं जातं. अशावेळी पातळ कपडे असतील तर ते अंगाला घट्ट चिकटून बसतात. यामुळे चारचौघांत खूप अवघडल्यासारखं वाटतं. त्यामुळे शक्यतो जाड कापड असणारे किंवा कॉटनचे जाडसर कपडे घाला.

 

३. पांढऱ्या रंगाचे कपडे घालून रंग खेळणं हे फक्त टीव्हीमध्येच चांगलं दिसतं. कारण पांढऱ्या कपड्यांवर जर पाणी पडलं तर ते अजिबात चांगलं दिसत नाही. त्यामुळे पांढरेच काय पण हलक्या लाईट शेडचे कपडेही होळी खेळायला घालू नका. रंग खेळताना जाडसर कपडे घाला.

Holi Celebration 2026: रंग खेळायला येणाऱ्या पाहुण्यांसाठी करा खमंग कुरकुरीत मुगडाळ वडे, घ्या सोपी रेसिपी

४. आतमध्ये टीशर्ट आणि वरून आणखी एखादा ड्रेस.. असे एकावर एक कपडे रंग खेळायला घातले तर जास्त चांगलं. यामुळे अंगावर कितीही पाणी पडलं तरी अडचण येत नाही. 

 

Web Title : होली खेलते समय शर्मनाक स्थितियों से बचने के लिए इन कपड़ों से बचें।

Web Summary : होली के लिए सोच समझकर कपड़े चुनें! पुराने, पतले कपड़े और हल्के रंग पहनने से बचें। आरामदायक रहने और भीगने पर अजीब पलों से बचने के लिए कपड़ों को लेयर करें। मोटे कॉटन के कपड़े चुनें।

Web Title : Avoid these clothes while playing Holi to prevent embarrassing situations.

Web Summary : Choose Holi clothes wisely! Avoid worn-out, thin fabrics, and light colors. Layer clothes for comfort and prevent awkward moments when wet. Opt for thicker cotton.