Lokmat Sakhi >Beauty > हेमामालिनी साबण वापरत नाही, १ देसी उपाय ठेवतोय त्वचा तरुण, सत्तरीतही सुंदर...

हेमामालिनी साबण वापरत नाही, १ देसी उपाय ठेवतोय त्वचा तरुण, सत्तरीतही सुंदर...

Hema malini beauty secrets : Hema malini natural skincare routine : Hema Malini’s favourite skincare home remedy for getting hydrated glowing skin : हेमा मालिनी त्यांच्या स्किनकेअर रुटीनमध्ये एक खास गोष्ट करतात, ज्यामुळे आजही त्या दिसतात सुंदर दिसतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2025 12:30 IST2025-09-26T12:12:26+5:302025-09-26T12:30:12+5:30

Hema malini beauty secrets : Hema malini natural skincare routine : Hema Malini’s favourite skincare home remedy for getting hydrated glowing skin : हेमा मालिनी त्यांच्या स्किनकेअर रुटीनमध्ये एक खास गोष्ट करतात, ज्यामुळे आजही त्या दिसतात सुंदर दिसतात...

Hema Malini’s favourite skincare home remedy for getting hydrated glowing skin Hema malini beauty secrets Hema malini natural skincare routine | हेमामालिनी साबण वापरत नाही, १ देसी उपाय ठेवतोय त्वचा तरुण, सत्तरीतही सुंदर...

हेमामालिनी साबण वापरत नाही, १ देसी उपाय ठेवतोय त्वचा तरुण, सत्तरीतही सुंदर...

बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आजही आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडतात. बॉलिवूडमधील सदाबहार (Hema Malini’s favourite skincare home remedy for getting hydrated glowing skin) अभिनेत्रींच्या यादीमध्ये हेमा मालिनी यांचे नाव आवर्जून घ्यावेच लागेल. यावयातही  वयातही त्यांचे सौंदर्य आणि फिटनेस एखाद्या तरुणीला लाजवेल (Hema malini natural skincare routine) असाच आहे. हेमा मालिनी यांनी वयाची सत्तरी ओलांडूनही त्यांची त्वचा इतकी चमकदार आणि तजेलदार कशी असा प्रश्न अनेकींना पडतो. वय वाढूनही त्याचा परिणाम त्यांची त्वचा किंवा चेहऱ्यावर लगेच दिसून येत नाही(Hema malini beauty secrets).

हेमा मालिनी आजही त्यांच्या वयापेक्षा कितीतरी जास्त तरुण दिसतात. हेमा मालिनी आपल्या त्वचेची काळजी घेताना कोणतेही आर्टिफिशियल उपाय करण्याआधी घरगुती व नैसर्गिक उपायांना जास्त प्राधान्य देतात. हेमा मालिनी त्यांच्या स्किनकेअर रुटीनमध्ये एक खास गोष्ट करतात ती म्हणजे, त्या आंघोळीसाठी कधीही साबण वापरत नाही. त्याऐवजी त्या नैसर्गिक घटकांचा वापर करणेच योग्य मानतात. त्यांच्या या एका खास सिक्रेटमुळेच या पारंपरिक पद्धतीमुळे त्वचा नेहमीच मऊ, तजेलदार आणि नैसर्गिक चमकदार राहते. त्वचेसाठी  कोणताही साबण न वापरता हेमा मालिनी नेमका कोणता घरगुती उपाय करुन त्वचेची काळजी घेतात ते पाहूयात... 

हेमा मालिनी त्वचेसाठी साबण न वापरता करतात 'हा' खास उपाय... 

हेमा मालिनी यांनी त्यांच्या अनेक मुलाखतीमध्ये, त्यांचे स्किन केअर रुटीन शेअर केले आहे. त्या त्वचेसाठी साबणाचा वापर करत नाहीत. साबणाऐवजी त्या बेसन आणि दुधावरील साय यांचे एकत्रित मिश्रण वापरणे पसंत करतात. 

त्वचेसाठी हा नॅचरल उपाय नेमका कसा करावा ?  

एक वाटी बेसन घ्या. त्यात २ चमचे दुधावरील ताजी साय मिसळा. चमच्याने मिश्रण कालवून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. मग कोमट पाण्याने धुऊन टाका. 

पांढऱ्या केसांना 'या' पद्धतीने लावा घरगुती तेल! होतील काळेभोर घनदाट - एकही पांढरा केस दिसणार नाही...

चहा पावडरचा सुपरहिट हेअर कलर! केसांवर येईल सुंदर रंग - पार्लरचा खर्च वाचेल असा बजेट फ्रेंडली उपाय... 

त्वचेसाठी हा नैसर्गिक उपाय करण्याचे फायदे... 

१. बेसन :- बेसन त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते, नॅचरल क्लिंझर म्हणून त्वचेसाठी फायदेशीर. नैसर्गिक पद्धतीने टॅन काढून त्वचेला उजळपणा देते. 

२. दुधाची साय :- त्वचेला नैसर्गिक मॉइश्चरायझर देते यामुळे कोरडी व राठ झाली त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते. सोबतच त्वचेला पोषण देऊन नैसर्गिक चमक आणते.

बेसन आणि दुधावरील सायीचा हा अस्सल घरगुती पारंपरिक उपाय हेमा मालिनी यांच्या त्वचेला आजही तितकेच सुंदर व तजेलदार ठेवण्यास फायदेशीर ठरतो.

Web Title : हेमा मालिनी का सुंदरता रहस्य: साबुन नहीं, बस एक प्राकृतिक उपाय।

Web Summary : बॉलीवुड की हेमा मालिनी 70+ की उम्र में भी साबुन से परहेज कर जवां त्वचा बनाए रखती हैं। इसके बजाय, वह मुलायम, चमकदार रंग के लिए बेसन और दूध की क्रीम का घरेलू मिश्रण इस्तेमाल करती हैं, जो उनकी शाश्वत सुंदरता का रहस्य है।

Web Title : Hema Malini's age-defying beauty secret: No soap, just a natural remedy.

Web Summary : Bollywood's Hema Malini maintains youthful skin at 70+ by avoiding soap. Instead, she uses a homemade blend of gram flour and milk cream for a soft, glowing complexion, revealing her timeless beauty secret.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.