Lokmat Sakhi >Beauty > इशा देओलने सांगितलं हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट, त्वचा टॅन झाल्यास वापरतात 'हा' खास पदार्थ...

इशा देओलने सांगितलं हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट, त्वचा टॅन झाल्यास वापरतात 'हा' खास पदार्थ...

Hema Malini's Beauty Secret: तुम्हालाही हेमा मालिनींप्रमाणे वाढत्या वयातही सुंदर- तरुण दिसणारी त्वचा हवी असेल तर त्यांचा हा खास उपाय करायला अगदी आतापासूनच सुरुवात करा..(skin care tips by Hema Malini)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2025 14:37 IST2025-03-17T14:37:07+5:302025-03-17T14:37:54+5:30

Hema Malini's Beauty Secret: तुम्हालाही हेमा मालिनींप्रमाणे वाढत्या वयातही सुंदर- तरुण दिसणारी त्वचा हवी असेल तर त्यांचा हा खास उपाय करायला अगदी आतापासूनच सुरुवात करा..(skin care tips by Hema Malini)

hema malini's beauty secret, home remedies of hema malini and isha deol for skin care, skin care tips by hema malini | इशा देओलने सांगितलं हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट, त्वचा टॅन झाल्यास वापरतात 'हा' खास पदार्थ...

इशा देओलने सांगितलं हेमा मालिनींचं ब्यूटी सिक्रेट, त्वचा टॅन झाल्यास वापरतात 'हा' खास पदार्थ...

Highlightsहेमा मालिनी यांच्या सौंदर्योपचारांची माहिती सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बॉलीवूडमधल्या ज्या काही सदाबहार अभिनेत्री आहेत त्यामध्ये एक नाव अगदी आवर्जून घ्यावं लागेल आणि ते नाव म्हणजे हेमा मालिनी..हेमा मालिनी यांनी त्यांचा काळ तर गाजवलाच.. पण आजसुद्धा त्यांचं सौंदर्य भल्याभल्यांना अचंबित करतं. वाढत्या वयाच्या खाणाखुणा त्यांच्यामध्येही दिसतात, पण त्याचा त्यांच्या सौंदर्यावर खूपच हळूवार परिणाम होत असावा असं वाटतं. कारण त्यांच्या वयापेक्षा त्या कितीतरी जास्त तरुण आणि सुंदर दिसतात (Hema Malini's Beauty Secret). हेमा मालिनी किंवा त्यांच्या काळातल्या ज्या काही अभिनेत्री आहेत त्यांचा विश्वास अजूनही घरगुती सौंदर्योपचारांवर आहे. त्यामुळेच तर एका मुलाखतीमध्ये जया बच्चन यांनीही त्या वापरत असलेले घरगुती तेल, चेहऱ्यासाठी फेसमास्क याविषयीची माहिती दिली होती (skin care tips by Hema Malini). आता पुन्हा एकदा हेमा मालिनी यांच्या अशाच पद्धतीच्या सौंदर्योपचारांची माहिती सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(home remedies of Hema Malini and Isha Deol for skin care) 

 

त्वचा टॅन झाली असल्यास हेमा मालिनी करतात 'हा' खास उपाय

हेमा मालिनी यांना कोणते घरगुती सौंदर्योपचार आवडतात याविषयी माहिती सांगणारा इशा देओल हिचा व्हिडिओ mamaraazzi या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

नाश्त्यासाठी इडल्यांचे ६ पौष्टिक आणि झटपट होणारे प्रकार- घरातले सगळेच आवडीने खातील

यामध्ये इशा सांगते की आई आमच्या अंगाला नेहमीच बेसन लावायची. ती म्हणते की ती असं का करायची ते मला माहिती नाही. पण नियमितपणे तिचा हा उपक्रम चाललेला असायचा. जवळपास सगळ्याच भारतीय घरांमध्ये बेसनाचा किंवा डाळीच्या पिठाचा वापर केला जातो.

पोटऱ्या, मांड्यांवरची चरबी खूप वाढली? ५ मिनिटांचा सोपा व्यायाम, पायांचा बेढबपणा कमी होईल

ते एक प्रकारचं नॅचरल स्क्रब असतं असं मानलं जातं. जेव्हा आपण बेसनाचा फेसपॅक लावतो तेव्हा त्वचेवरचं टॅनिंग, डेडस्किन निघून जाते आणि त्वचा छान मऊ होऊन तिच्यावर चमक दिसते. 

 

हेमा मालिनी करत असलेल्या दुसरा उपाय म्हणजे ग्लिसरीन आणि लिंबू एकत्रितपणे त्वचेला लावून मसाज करणे. इशा असं सांगते की आई शुटिंगवरून आल्यावर रोज रात्री हे पदार्थ अंगाला लावायची.

प्यार दिवाना होता है..!! वयातलं मोठ्ठं अंतर झुगारून एकमेकांच्या प्रेमात बुडालेले बॉलीवूड कपल्स

कारण त्यामुळे त्वचेवर दिवसभर धूळ बसून जे टॅनिंग झालेलं असतं ते सगळं या उपायाने निघून जातं. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्वचा टॅन होण्याचं प्रमाण वाढलेलं आहेच. त्यामुळे कधी तरी हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही. 


 

Web Title: hema malini's beauty secret, home remedies of hema malini and isha deol for skin care, skin care tips by hema malini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.