Join us
Daily Top 2Weekly Top 5

सत्तरीतही कमालीच्या सुंदर दिसणाऱ्या हेमामालिनीच्या चमकत्या चेहऱ्याचं सिक्रेट, पाहा आवडीचा फेसपॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2026 15:17 IST

Hema Malini beauty secret: Hema Malini glowing skin: celebrity skincare secrets: हेमामालिनी त्वचेला काय लावते पाहूया.

वयाच्या चाळिशीनंतर आपल्या त्वचेत अनेक बदल होऊ लागतात. ६० व्या वर्षी चेहरा आणि मानेवरील त्वचा निस्तेज होऊ लागते.(Hema Malini beauty secret) जर आपण योग्य वयात त्वचेची काळजी घेतली नाही तर वृद्धत्वाची लक्षणे त्वचेवर दिसू लागतात. कोलेजनची पातळी कमी झाल्यावर त्वचा निस्तेज होते. (Hema Malini glowing skin)वय वाढतं तसं चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग, कोरडेपणा दिसणं साहजिक मानलं जातं. पण काही महिला अशा असतात की सत्तरीतही त्यांची त्वचा तिशीतल्या तरुणींसारखी टवटवीत, नितळ आणि तेजस्वी दिसते. ‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी आजही तिच्या ग्लोइंग स्किनमुळे चर्चेत आहे. महागड्या क्रीम्स, फेशियल किंवा केमिकल ट्रीटमेंटपेक्षा ती साबणाऐवजी एका खास घरगुती फेसपॅकचा वापर करते. तिची मुलगी ईशा देओल हिने तिच्या काही स्किन केअर रुटीनबद्दल माहिती शेअर केली आहे.  हेमामालिनी त्वचेला काय लावते पाहूया. 

फक्त ५ मिनिटांत घरीच करा नॅचरल सीरम, संत्रीच्या सालीचा देसी उपाय, चेहऱ्यावर येतो ग्लो- डागही जातील, पार्लरचा खर्चही वाचेल

हेमामालिनी आपल्या ग्लोइंग त्वचेसाठी चण्याच्या डाळीची पेस्ट लावते. यामध्ये मध आणि गुलाबजल मिसळून त्याचा फेस मास्क बनवा. २० मिनिटानंतर चेहरा सुकल्यावर कोमट पाण्याने धुवा. ही पेस्ट लावल्यानंतर चेहऱ्यावर चमक येते. तसेच कोरड्या त्वचेच्या समस्या दूर होतात आणि त्वचेतील छिद्र देखील स्वच्छ होतात. 

ग्लिसरीन आणि लिंबाचा रस एकत्र मिसळून त्वचेला लावण्याची पद्धत जुनी असली तरी आजही त्वचेसाठी तितकीच फायदेशीर आहे. ग्लिसरीनमध्ये मिसळून लिंबाचा रस लावा. लिंबूमध्ये असलेले घटक त्वचेचा काळेपणा दूर करतात आणि टॅनिंग कमी करण्यास होण्यास मदत होते. यामुळे त्वचेला चमक आणि घट्टपणा येतो. ग्लिसरीन त्वचा मऊ ठेवते. ज्यामुळे त्वचा अधिक सॉफ्ट होते. आपण हे रात्रभर लावून ठेवू शकतो आणि सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवू शकता. 

बदाम, ऑलिव्ह किंवा नारळाचे असं कोणतेही तेल चेहऱ्यावर लावा. हलक्या गोलाकार हाताने चेहरा चोळा. यामुळे आपल्या चेहऱ्याला मालिश होईल. हे तेल त्वचेला मॉइश्चरायझ आणि घट्ट करेल. व्हिटॅमिन ई ने समृद्ध असलेले हे तेल रक्ताभिसरण सुधारेल आणि कोलेजन वाढवण्यास मदत करेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Hema Malini's age-defying beauty: Secret homemade face pack revealed!

Web Summary : Hema Malini, even at 70, maintains youthful skin using a homemade face pack of chickpea flour, honey, and rosewater. She also uses glycerin and lemon juice for skin tightening and oil massages for moisturizing and improved circulation.
टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी