सुंदर आणि तेजस्वी त्वचेसाठी महागड्या क्रीम्स किंवा ब्यूटी ट्रीटमेंट्सपेक्षा आपल्या रोजच्या आहाराची भूमिका खूप महत्त्वाची असते. आपण जे खातो त्याचा थेट परिणाम त्वचेच्या आरोग्यावर दिसून येतो. योग्य पोषणतत्त्वयुक्त अन्नपदार्थ त्वचेला आतून पोषण देतात, डलनेस कमी करतात आणि नैसर्गिक ग्लो वाढवतात. जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स, मिनरल्स आणि हेल्दी फॅट्स यांचा समतोल आहारात समावेश केल्यास त्वचा अधिक मऊ, तजेलदार आणि चमकदार दिसू शकते(natural ways to get glowing skin).
चेहऱ्यावर चमक येण्यासाठी आपण महागड्या क्रीम्स आणि पार्लर ट्रीटमेंट्सवर हजारो रुपये खर्च करतो, पण खरी सुंदरता ही केवळ बाह्य उपचारांवर अवलंबून नसते. खरंतरं, 'आपण जे खातो, तसेच आपण दिसतो.' आपल्या त्वचेचा पोत आणि नैसर्गिक ग्लो हा आपल्या रोजच्या आहारावर अवलंबून असतो. ग्लोइंग स्किनसाठी केवळ मेकअप पुरेसा नसतो, तर त्वचेला आतून पोषण मिळणे आवश्यक असते. इन्स्टाग्रामवरील '@thealphacoachapp' या अकाउंटवर अशा काही खाद्यपदार्थांची यादी शेअर करण्यात आली आहे, जे त्वचेला नैसर्गिक चमक मिळवून देण्यास मदत करू शकतात. आपल्या स्वयंपाक घरातील काही साधे आणि नैसर्गिक अन्नपदार्थ आपल्या त्वचेवर नैसर्गिक पद्धतीने ग्लो आणण्यासाठी (healthy foods for glowing skin) फायदेशीर ठरतात. जर आपल्यालाही काचेसारखी चमकणारी (foods for clear skin naturally) आणि निरोगी त्वचा हवी असेल, तर रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा ते पाहूयात.
१. संत्री :- हिवाळ्याच्या दिवसांत बाजारपेठेत संत्री भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. हे चवीला अतिशय चविष्ट असे फळ आहे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. तसेच, यामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे कोलेजनच्या निर्मितीमध्ये मदत करतात आणि सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणाऱ्या त्वचेच्या नुकसानापासून बचाव करतात.
२. अक्रोड :- दररोज अक्रोड खाणे मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर असते. यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन-ई भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही घटक त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. आपण रोजच्या आहारात अक्रोडचा समावेश करू शकता.
३. चिया सीड्स :- सुपर सीड्सचा पॉवरहाऊस लहान दिसणारे चिया सीड्स त्वचेसाठी मोठे काम करतात. यामध्ये असलेल्या ओमेगा-३ फॅटी ॲसिडमुळे त्वचेला आतून पोषण मिळते आणि कोरडेपणा दूर होतो. यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या आणि सूज कमी करण्यास मदत करतात. आहारात चिया सीड्सचा समावेश केल्यास तुम्ही पिंपल्स आणि अकाली वृद्धत्व यांसारख्या समस्यांना रोखू शकता.
४. डार्क चॉकलेट :- डार्क चॉकलेटमध्ये असणारे फ्लॅव्होनॉइड्स (Flavonoids) सूर्याच्या अतिनील किरणांमुळे होणारे नुकसान भरून काढण्यास मदत करतात. रक्तभिसरण सुधारल्यामुळे त्वचेला पुरेसे ऑक्सिजन मिळते, ज्यामुळे तुमचा चेहरा अधिक टवटवीत आणि तरुण दिसू लागतो.
५. टोमॅटो :- स्वयंपाकात रोज वापरला जाणारा टोमॅटो आपल्या त्वचेसाठी एखाद्या 'नॅचरल सनस्क्रीन'प्रमाणे काम करतो. टोमॅटोमधील लायकोपीन (Lycopene) हे घटक त्वचेला सूर्याच्या प्रखर उन्हामुळे काळवंडण्यापासून वाचवतात. तसेच, यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या रोखण्यास मोठी मदत मिळते.
