Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > नारळाच्या शेंड्या टाकून देता? ५ भन्नाट फायदे, केसांसाठीही उपयोगी, हमखास यशस्वी उपाय

नारळाच्या शेंड्या टाकून देता? ५ भन्नाट फायदे, केसांसाठीही उपयोगी, हमखास यशस्वी उपाय

Coconut sprouts benefits: Coconut embryo benefits: Natural remedies for knee pain: नारळाच्या शेंड्यांचा आरोग्यासाठी कसा वापर होतो पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2026 09:30 IST2026-02-26T09:30:00+5:302026-02-26T09:30:02+5:30

Coconut sprouts benefits: Coconut embryo benefits: Natural remedies for knee pain: नारळाच्या शेंड्यांचा आरोग्यासाठी कसा वापर होतो पाहूया.

Health benefits of coconut peels How to use coconut peels for knee pain Coconut sprouts benefits for skin and hair Are coconut sprouts healthy to eat Traditional uses of coconut embryo | नारळाच्या शेंड्या टाकून देता? ५ भन्नाट फायदे, केसांसाठीही उपयोगी, हमखास यशस्वी उपाय

नारळाच्या शेंड्या टाकून देता? ५ भन्नाट फायदे, केसांसाठीही उपयोगी, हमखास यशस्वी उपाय

भारतीय घरांमध्ये नारळाचा वापर नियमितपणे केला जातो. अगदी पूजेपासून ते स्वयंपाकघरातील जेवण बनवण्यापर्यंत. ओल्या नारळाशिवाय कोणतंच काम होत नाही. ओल्या नारळाने पदार्थाला चव येते. डाळीत, भाजीत किंवा गोडाचे पदार्थ करताना ओल्या नारळाचा किस घातला जातो. नारळ फोडला की आपण त्यातील पाणी पितो, खोबरं खातो आणि नारळाच्या शेंड्या कचऱ्यात फेकून देतो. नारळ्याच्या शेंड्यामध्ये मुबलक प्रमाणात टॅनिन आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. या शेंड्यांचा वापर कसा करायचा, ज्यामुळे आपले पैसे वाचतील पाहूया. 

टिपिकल ब्लाऊज घालता आणि काकूबाई दिसता, पाहा हॉल्टरनेक कॉटन ब्लाऊजचे १० डिझाइन्स- उन्हाळ्यातली कुल स्टाइल

1. आपल्यापैकी अनेकांना माहितेय की नारळाच्या शेंडीचा वापर फक्त भांडी घासण्यासाठी होतो. पण याव्यतिरिक्त  नारळाच्या शेंड्या वापरण्यापूर्वी त्या व्यवस्थित साफ करुन घ्याव्यात, ज्यामुळे त्यातील माती निघून जाईल. तसेच हे नैसर्गिक असल्यामुळे सर्वात मोठा फायदा होतो. 

2. आपल्याला  गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर नारळाच्या शेंड्यांची राख रामबाण उपाय ठरते. या शेंड्या जाळून त्याची राख तयार करा. ही राख मोहरीच्या तेलात किंवा जास्वंदीच्या तेलात मिसळून गुडघ्यांना मसाज करा. यातील दाहशामक गुणधर्म रक्ताभिसरण सुधारुन वेदना कमी करतात. 

3. आपले केस पांढरे किंवा केमिकल्समुळे खराब झाले असतील तर नारळाच्या शेंड्यांची काळी राख लोखंडी कढईत गरम करा. ही राख कोरफड जेल किंवा खोबरेल तेलात मिसळून केसांना लावा. यामुळे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे होतात. तसेच केसांना मुळापासून पोषण मिळते. 

4. पिवळे पडलेले दात पांढरे शुभ्र करण्यासाठी नारळाच्या शेंड्यांची राख चांगला उपाय आहे. या राखेत थोडे सैंधव मीठ मिसळा. या मिश्रणाने दात घासल्यास दातांचा पिवळेपणा निघून जाईल. तसेच हिरड्यांमधील सूजही कमी होते. हे महागड्या टूथपेस्टपेक्षा भारी आहे. 

5. शेंड्यांचा मऊ भाग हा त्वचेसाठी स्क्रब म्हणून वापरता येतो. आंघोळीच्या वेळी साबणाऐवजी या धाग्यांचा वापर केल्यास त्वचेवरील मृत पेशी निघून जातात. यामुळे त्वचा मऊ होते आणि रक्ताभिसरण सुधारल्यामुळे त्वचेचवर चमक येते. 

6. नारळाच्या शेंड्या जाळताना त्यातून निघणारा धूर हा मच्छर किंवा जंत पळवण्यास होतो. शेंड्यांवर थोडे कडुलिंबाचे पान आणि भीमसेन कापून टाकून त्याचा धूर केल्यास डास पळून जातील. 

7. नारळ्याच्या शेंड्या आल्यासोबत उकळून त्याचा चहा प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते, जे यकृताच्या आरोग्यासाठी चांगले आहे. 
 

Web Title : नारियल के छिलके न फेंकें! 7 अद्भुत फायदे और उपयोग जानें

Web Summary : नारियल के छिलके, जिन्हें अक्सर फेंक दिया जाता है, आश्चर्यजनक लाभ प्रदान करते हैं। वे जोड़ों के दर्द से राहत दिला सकते हैं, बालों को प्राकृतिक रूप से काला कर सकते हैं, दांतों को सफेद कर सकते हैं और त्वचा को एक्सफोलिएट कर सकते हैं। छिलके जलाने से मच्छर भाग जाते हैं। छिलके से बनी चाय वजन घटाने में मदद करती है और रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाती है।

Web Title : Don't Discard Coconut Husks! Discover 7 Amazing Benefits and Uses

Web Summary : Coconut husks, often discarded, offer surprising benefits. They can relieve joint pain, naturally darken hair, whiten teeth, and exfoliate skin. Burning husks repels mosquitoes. A tea made from husks aids weight loss and boosts immunity.