केस गळण्याची समस्या (Hair Fall) आजकाल प्रत्येकालाच उद्भवते. केस गळती कमी करण्यासाठी बरेच उपाय करूनही हवातसा परिणाम दिसून येत नाही. बाजारात मिळणाऱ्या केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करण्याऐवजी तुम्ही घरगुती उपाय करून केस गळणं कायमंच रोखू शकता. (Hair Growth Tonic In 20 Rupees Fenugreek Seeds)
यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. हे होममेड हेअर टॉनिक तयार करण्यासाठी तुम्हाला २० रूपयांचे मेथी दाणे लागतील. केसांच्या आरोग्यासाठी मेथीचा वापर करून हा उपाय कसा करायचा समजून घेऊ. (Hair Tonic For Hair Growth)
हा उपाय करण्यासाठी साहित्य काय काय लागेल?
१० ते २० रुपयांचे मेथी दाणे
रोजमेरीची पानं
सुकलेले आवळे
अळशीच्या बीया
नारळाचं तेल
हेअर टॉनिक तयार करण्याची सोपी पद्धत कोणती
हे हेअर टॉनिक तयार करणं खूपच सोपं आहे. यासाठी भांड्यामध्ये २ चमचे मेथीचे दाणे, रोजमेरीची पानं, सुकलेले आवळे, अळशीच्या बिया एकत्र करून घ्या. त्यात १ ग्लास पाणी घाला. नंतर हे सर्व पदार्थ व्यवस्थित उकळवून घ्या. मग यात २ चमचे नारळाचे तेल मिसळा. हे मिश्रण गाळून एका कंटेनरमध्ये भरून घ्या. तयार आहे हेअर ग्रोथ टॉनिक.
हे हेअर टॉनिक केसांना कसं लावावे?
हे हेअर टॉनिक तुम्ही कापसाच्या साहाय्यानं केसांना लावू शकता. ज्यामुळे केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते तसंच हेअर फॉलही कमी होतो. याशिवाय केस हेल्दी आणि काळेभोर राहण्यास मदत होते.
मेथीमुळे केसांना काय फायदे होतात?
मेथीमध्ये उच्च प्रमाणात प्रोटीन आणि निकोटिनिक एसिड असते जे केसांच्या मुळांना मजबूत बनवते. यामुळे केस गळण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होते.
कोंड्यापासून सुटका
मेथीमध्ये एंटी फंगल आणि एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. जर तुम्हाला कोंड्याचा त्रास असेल तर मेथीची पेस्ट टाळूला लावल्यानं खाज आणि कोंडा दूर होण्यास मदत होते.
केसांची वाढ वाढवण्यासाठी
केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक घटक मेथीमध्ये असतात. जे टाळूतील रक्ताभिसरण सुधारतात ज्यामुळे नवीन केस येण्यास आणि केसांची लांबी वाढण्यास मदत होते.
