Lokmat Sakhi >Beauty > कितीही केमिकल लावा केसांतला कोंडा कमीच होत नाही? पाहा आजीच्या काळातला घरगुती उपाय-कोंडा गायब

कितीही केमिकल लावा केसांतला कोंडा कमीच होत नाही? पाहा आजीच्या काळातला घरगुती उपाय-कोंडा गायब

best homemade hair mask for dandruff: homemade hair mask for dry scalp: केसातील कोंडा कमी करण्यासाठी आजीबाईंचा हा घरगुती उपाय आपल्याला फायदेशीर ठरेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 13:13 IST2025-04-25T13:12:05+5:302025-04-25T13:13:04+5:30

best homemade hair mask for dandruff: homemade hair mask for dry scalp: केसातील कोंडा कमी करण्यासाठी आजीबाईंचा हा घरगुती उपाय आपल्याला फायदेशीर ठरेल.

Hair Mask for Dandruff home remedies for hair scalp hair falls issue Which homemade hair mask is best for dandruff | कितीही केमिकल लावा केसांतला कोंडा कमीच होत नाही? पाहा आजीच्या काळातला घरगुती उपाय-कोंडा गायब

कितीही केमिकल लावा केसांतला कोंडा कमीच होत नाही? पाहा आजीच्या काळातला घरगुती उपाय-कोंडा गायब

उन्हाळ्यात केसांची आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागते. घामामुळे केस ओले चिंब होतात.(Hair Care tips) ज्यामुळे टाळू अस्वच्छ होऊन केसात कोंडा होतो. केसांची नीट योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर कोंड्याची समस्या अनेकांना होतो. केसात कोंडा झाल्यानंतर केसात सतत खाज सुटते. (best homemade hair mask for dandruff)
अनेकदा कोंडा इतका वाढतो की, तो आपल्या कपड्यांवर देखील पडतो.(hair mask for dandruff and hair fall) सतत टाळूवर खाज सुटते ज्यामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे केसगळतीच्या समस्या देखील वाढतात.(home remedies for dandruff and hair loss) कोंडा झाल्यामुळे आपण अनेक महागडे केमिकल्स असणारे शॅम्पूचा वापर करतो. परंतु, यामुळे कोंडा कमी होण्याऐवजी तो अधिक वाढतो.(homemade hair mask for dry scalp) तसेच केसांचा पोत देखील बिघडतो. केसातील कोंडा कमी करण्यासाठी आजीबाईंचा हा घरगुती उपाय आपल्याला फायदेशीर ठरेल.(how to treat dandruff naturally) यामुळे कोंडा देखील कमी होईल आणि केसगळती थांबेल. 

केसगळती थांबेल! मनुक्याचे पाणी केसांसाठी संजीवनी, 'असे' वापरा- केस होतील घनदाट

साहित्य 

दही - १ कप 
कडुलिंबाचा रस - २ चमचे 
कोरफडीचा गर - २ चमचे 
रोझमेरी तेल - ५ ते ६ ड्रॉप्स 
लिंबाचा रस - १ चमचा

">

कृती 

1. सगळ्यात आधी कडुलिंबाची पाने थोड्या पाण्यात मिसळून मिक्सरच्या भांड्यात वाटून त्याचा रस काढा. 

2. आता एका भांड्यात दही, कोरफडीचा गर आणि कडुलिंबाच्या पानांचा रस घालून चांगले मिसळा. 

3. त्यानंतर रोझमेरी तेल आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. 

4. हा मास्क केसांच्या मुळांना आणि टाळूला योग्य पद्धतीने लावा. ३० ते ४० मिनिटे राहू द्या. 

5. कोमट पाण्याने किंवा शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. 


हा मास्क आपण केसातील कोंडा कमी करण्यासाठी वापरू शकतो. यामुळे टाळूला सतत होणारी खाज थांबेल. तसेच टाळूचे आरोग्य देखील सुधारेल. आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क केसांना लावायला हवा. नियमितपणे वापर केल्यास केसांना पोषण मिळेल आणि केसांतील कोंडा दूर होईल. 
 

Web Title: Hair Mask for Dandruff home remedies for hair scalp hair falls issue Which homemade hair mask is best for dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.