Join us

केसांची वाढ खुंटली? जास्वंदाचं जादूई तेल घरीच बनवून लावा, लवकर वाढतील-काळे होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 13:10 IST

Hair Growth Tips : जास्वंदाचं तेल बनवण्यासाठी जास्वंदाचं फूल, नारळाचं तेल, तुळस, ओवा यांची आवश्यकात असेल.

आजकाल चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्यातील अनियमितता, प्रदूषण यांमुळे केस खराब होण्याची समस्या उद्भवत आहे. वेळेआधीच केस पांढरे होण्याचं प्रमाणही  वाढलंय. प्रत्येकजण या समस्येचा सामना करत आहे. काळेभोर दाट केस मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या महागड्या उत्पादनांचा वापर करत आहेत. (How to make hibiscus hair oil at home) 

पण घरगुती उपायांप्रमाणे बाहेरच्या उपायांचा परीणाम दिसून येत नाही. केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती तेलाचा वापर करू शकता.यामुळे केस पांढरे होणं, केस गळणं रोखता येते. हे तेल बनवण्याची योग्य पद्धत आणि फायदे समजून घेऊया. हे तेल बनवण्यासाठी तुम्हाला बाजारात जाण्याची गरज नाही. (The Benefits Of Using Hibiscus Oil For Hair Growth)

घरच्याघरी काही पदार्थांचा वापर करून तुम्ही केस वाढवू शकता. जास्वंदाचं तेल बनवण्यासाठी जास्वंदाचं फूल, नारळाचं तेल, तुळस, ओवा यांची आवश्यकता असेल. नारळाच्या तेलात जास्वंदाचं फूल मिसळा आणि त्यात ओवा आणि तुळशीचा पीानं घालून व्यवस्थित गरम करा. थंड झाल्यानंतर एका भांड्यात काढून गाळून वेगळे करा. नंतर या तेलानं केसांवर मसाज करा.

हे तेल बनवण्यासाठी वापरलेली प्रत्येक गोष्ट अँटिऑक्सिडंट्सनी परीपूर्ण आहे. अजवाइनमध्ये अँटी-डँड्रफ आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, तर तुळशीमध्ये अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात जे टाळू स्वच्छ करण्यात मदत करतात. हे तेल केसांसाठी फायदेशीर आहे. याच्या वापराने केस काळे होतात. तसेच, जर तुम्हाला कोंडयाचा त्रास होत असेल तर या तेलाचा वापर केल्याने त्यातूनही सुटका होऊ शकते. हे तेल टाळूच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी देखील फायदेशीर ठरू शकते.

जास्वंदाच्या फुलाचं हेअर कंडिशनरही तुम्ही केसांवर वापरू शकता. हे कंडिशनर बनवण्यासाठी सगळ्यात आधी पाण्यात जास्वंद स्वच्छ धुवून पाण्यात भिजवून घ्या. यात पुन्हा पाणी घालून १ दिवसासाठी जास्वंद भिजवा.  १ दिवसानंतर जास्वंद आणि त्याचे लाल पाणी गाळून वेगळे करा. मिक्सरमध्ये ही फुलं घालून बारीक दळून  घ्या. जास्वंदाच्या फुलांची ही पेस्ट  सुरूवातीला वेगळ्या काढलेल्या लाल पाण्यात एकत्र करा नंतर एका स्वच्छ भांड्यात गाळून घ्या. गाळणीतील पेस्ट बदामाच्या तेलात मिसळा. प्रिजर्व्हेटिव्ह्जसाठी ३० ml बायो एंजाईम्स घालू शकता. तयार आहे जास्वंदाचं कंडिशनर.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी